दिवाळी जवळ आली होती. सोसाइटीच्या प्रत्येक घरातून फराळाच्या पदार्थांचा सुवास दरवळत होता.मधुराची घरची साफ सफाई आटोपली होती आता तिने मोर्चा स्वयंपाक घरा कड़े वळवला. तेवढ्यात कामिनी ताई आल्या...
कामिनीताई :- काय करतेस तू..
मधुरा :- फरळाची तयारी करत होते आई...
कामिनिताई :- असुदे तू तुला नाहीच जमणार... तसही तुला काहीच जमत नाही..
मधुराला वाईट वाटले. ती आपल्या खोलीत निघून गेली. गेल्या वर्षभरा पासून कामिनी ताई व सदाशिवराव त्यांचा मुलगा प्रथम व सुन मधुरा कड़े राहायला आले होते. मधुराच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते. ती जॉब करायची पण covid -19 मुळे तिचा जॉब गेला... आणि मावस दिराच्या लग्नासाठी आलेले सासु -सासरे देखील इथेच अडकले. मधुरा सगळी काम मन लावून करायची पण सासूबाई प्रत्येक कामत खोट काढायच्या. जॉब मुळे तीला कामाची फारशी सवय नव्हती पण शिकण्याची जिद्द मात्र होती.. तुला काही जमत नाही... हे सासूबाइंच बोलण तिला खटकायच. खोलीत रडत बसायची
पण आता मात्र तीनी ठरवल रडत बसायच नाही... स्वयंपाक घरात गेली
कामिनिताई :- तू का आलीस परत...
मधुरा :- फराळाच बनवायला....
कामिनिताई :-तुला कुठे काही येत...
मधुरा :-तुम्ही कधी खाल्लत का माझ्या हातच फराळाच
कामिनी ताई :- नाही
मधुरा :-मग आधी खाऊन तर बघा.... नंतर नाही जमल तर म्हणाल तस करेल.. अस म्हणत तिने सासुबाईना हॉल मधे पाठवले आणि यूट्यूब ला गुरु मानुन लागली कामाला..
सदाशिवराव :- वा सुनबाई शंकरपाले, चिवड़ा, चकली सगळ अगदी एक नंबर झाल बघा...
कामिनी ताई :-हम्म्म, बर झालय.. तसही....
मधुरा :- सासुबाई मला सगळ येत.. हा तुमच्या इतका अनुभव आणि चव नसेल कदाचित पण मला येत ????????
त्यानंतर सासुबाइनि पालूपाद म्हणणे सोडून दिले ????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा