"लीना, माझ्या आईची अडचण होते का तुला ? हेच तुझ्या आईबद्दल मी बोललो असतो तर?" निशांत तावातावाने लीना वर ओरडत होता.
"काय बोलणार तू माझ्या आईबद्दल? सांग. ऐकायचंच आहे मला." लीना हाताची घडी घालत बोलली.
"काय ऐकायच आहे तुला? मला दिसत नाही का, माझी आई आली की लगेच तोंड पडत तुझ, थकवा यायला लागतो तुला. चिडचिड होते. काल तू आईला चक्क भांडी घासायला सांगितले? तुझी आई आली की बरी गोड गोड बोलतेस. छान राहतेस. चांगले चांगले पदार्थ बनवते. विसरू नकोस हे घर माझेही आहे. माझ्या आईशी सुद्धा तु चांगलेच वागले पाहिजेस."
"मी त्यांच्याशी चांगलेच वागते. पण तुला त्यांचे वागणे दिसत नाही. कितीही झाले तरी तु त्यांचा श्रावणबाळ ना? थोडे घरात लक्ष घालत जा म्हणजे कळेल."
"हो ,आता मी ही कामे करतो, घरात लक्ष घालतो, घरकाम करतो, बायकांकडे लक्ष देत बसतो." निशांत उपहासाने बोलला.
"मी असे म्हणत नाही, पण तू दिवसभर घरात नसतोस. जरा डोळे उघडून बघत जा काय चालू आहे घरात. मला वाटले तुला सगळे समजून येते."
" मी काय समजून घेऊ? स्वतःच्या आईचा अपमान? सगळ्या बायका सारख्याच. जरा म्हणून सासूला जीव लावणे नाही. आई सांगत होती मला, जराही तिच्याशी बसून बोलत नाहीस की तिला वेळ देत नाहीस. कधीकधी तर तिला कामे सांगत असतेस. ती काय तुझी कामे करायला येते का इथे?"
" अरे पण मी कसे बोलू त्यांच्याशी? जराही उसंत मिळत नाही मला. आणि कामे मी कधीतरी सांगते मला खूप त्रास झाला की. तुला सगळे दिसतेच ना."
" काहीही काय बोलतेस लीना? तुझी आई आल्यावर कसा तुला वेळ मिळतो ? तेव्हा बरी उसंत मिळते. बरेच दिवस मनात होते, आज बोलूनच टाकतो, तुम्ही बायका कधी नवऱ्याच्या आईला आपले मानू शकत नाही. तुम्हाला नवरा बैल हवा असतो आणि त्याचे आई-वडील नको असतात." असे म्हणून तो तावातावाने रूममध्ये निघून गेला.
लीनाला कळून चुकले, की याला फार स्पष्टीकरण देण्यात अर्थ नाही.
दोन तीन दिवस निशांत लीनाशी बोलला नाही.
लीनाने खूप प्रयत्न केला, त्याच्याशी बोलायचा. पण तो माझ्या आईला वेगळी वागणूक मिळते म्हणून चिडून बसला होता.
लीनाने खूप प्रयत्न केला, त्याच्याशी बोलायचा. पण तो माझ्या आईला वेगळी वागणूक मिळते म्हणून चिडून बसला होता.
लीनाने तिच्या परीने निशांतला समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याला समजावणे सोडून दिले.
काही दिवसांनी तिच्या सासूबाई गावी निघून गेल्या आपली आई जणू काही आपल्यावर नाराजच होऊन गेली , असे वाटून निशांत लीनाशी तुटक तुटक वागत होता.
काही दिवसांनी तिच्या सासूबाई गावी निघून गेल्या आपली आई जणू काही आपल्यावर नाराजच होऊन गेली , असे वाटून निशांत लीनाशी तुटक तुटक वागत होता.
काही दिवस असेच गेल्यानंतर लीनाची आई त्यांच्याकडे राहायला आली. त्यांना दारात पाहून तर निशांतने नाकच मुरडले आणि त्यांचे आदरातिथ्य न करता तो तसाच रूममध्ये निघून गेला. ते पाहून लीनाच्या आईला वाईट वाटले. त्यांना वाटले की काहीतरी बिनसले आहे. त्या उसने हसू आणत घरात आल्या. लीनाच्या नजरेतून ते सुटले नाही.
रूममध्ये आल्यानंतर लीनाची आई तिला म्हणाली, "बाळा, मी आलेले जावईबापूंना आवडलेले दिसत नाही. माझा गुडघ्यांचा दवाखाना जवळच आहे, म्हणून येत असते बाकी मला फार यायला आवडतच नाही बघ."
तिचा असा कळवळीचा स्वर ऐकून लीनाला गलबलून आले. ती तिला म्हणाली," आई, हे घर जितके निशांतचे आहे तितकेच माझेही आहे. आम्ही दोघांनी या घरासाठी आपली जमापुंजी वापरली आहे. त्यामुळे तू अजिबात संकोच करू नको इथे राहायला. तुला वाटेल तितके दिवस तू इथे राहू शकतेस." असे म्हणून ती निशांतला जाब विचारायला गेली.
"निशांत, आईसमोर तोंड पाडायची काय गरज होती? ती काही कायमची आपल्याकडे येत नाही. तिचा दवाखाना इथून जवळ आहे म्हणून येते. आणि माझी आई आहे ती आणि हे घर माझेही आहे. तू तिच्याशी असे वागू शकत नाहीस."
" हो का? मी वागू शकत नाही , पण तू वागू शकतेस. होय ना? तू देखील अशीच तोंड पाडतेस माझी आई आल्यावर. त्यामुळे तक्रार करू नकोस." असे म्हणून बेडवर टॉवेल फेकून निशांत बाहेर निघून गेला.
लीना तिथेच बसून राहिली. स्वतःच्या आईला आणि निशांतच्या आईला वेगवेगळी वागणूक देण्यामागे काहीतरी कारण होते. ते निशांतला समजत नव्हते आणि तो ऐकूनही घेत नव्हता. आता काय करावे? या विचारात तिला एक युक्ती सुचली. त्या रात्री तिने निशांतशी बोलायचे ठरवले.
रात्री ती त्याला म्हणाली," निशांत , तुला असे वाटते ना की मी दोन्ही आईंना वेगवेगळी वागणूक देत आहे ? ठीक आहे. तुझे जर म्हणणे खरे ठरले तर तू मला हवी ती शिक्षा दे, पण आता माझे फक्त एकच म्हणणे ऐक."
"बोल " राकेश तिरकस बघत बोलला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा