भेटलीस तू मला..!

Best Friends Day Special.
दूर राहूनही का तू
मज जवळ वाटतेस,
स्वप्न नसूनही का तू
मला खरीच भासतेस;
न्याहाळते मी नेहमी
तुझी हसरी क्षणचित्रे,
आठवतात मला आपल्या
सहवासातील स्मृतिचित्रे,
हा माझा स्वभाव की सवयच
मला माहित नाही...
मी उभारले तुझ्या आधारामुळेच; 
तुझी मी सावलीच जणू काही! 
तू आलीसच माझ्या आयुष्यात
एक आशेचा किरण घेऊन,
फुलले हे माझे जीवन
जसे नवा गंध लेवून.....!

©️®️ अबोली डोंगरे.