Login

आयुष्यात महत्त्व

सोबतीचे महत्त्व
तुझ्यासवेच सखी
प्रेमाला मिळे अर्थ
तू नसता सोबती
जगणे वाटे व्यर्थ

तुझे माझ्या आयुष्यात
महत्त्व आहे गं राणी खूप
संकटातही चेहरा पाहता
मला लढण्यास येतो हुरूप

जन्मापासून मृत्यूपर्यंत
तुझी आहे मोलाची साथ
सामंजस्याने नि संवादाने
गैरसमजाला देऊ लाथ

रागावून दूर जरी झालीस
तरी तुझीच ओढ लागते
नियतीही अतूट बंधनासाठी
त्यागाची कारणे मागते

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.