तो तिला म्हणाला , " माझ्याशी लग्न करून तुला पश्चाताप तर नाही ना होत . तू श्रीमंत घरातली , सर्व सुख सोयी तुझ्या पायी लोळण घालायच्या आणि इथे ..बघ पाऊस पडल्यावर बसायलाही जागा नाही , तुला हवा तर तुझा निर्णय तू बदलू शकतेस अजूनही वेळ गेलेली नाही . "
ती जरा रागात तोंड वाकडे करून , " का रे असं बोलतो ! त्या माणुसकी रहित श्रीमंती पेक्षा तुझ्या प्रामाणिकपणाची श्रीमंती मला जास्त किंमती वाटते आणि मला विश्वास आहे एक दिवस नक्कीच तुझ्या मेहनतीने आणि प्रेमाने आपण दोघे मिळून आपल्या स्वप्नांचा महल बनवू आणि आपल्या प्रेमाला जिंकून दाखवू ,फक्त विश्वास ठेव माझ्यावर आणि माझ्या निर्णयावर . "
तीच बोलणं ऐकून नकळत हसणे त्याच्या ओठावर आले आणि आपसूकच बोलला , "
" सोबत तुझी आहे तर मला काय उणीव
अंधारात सुध्दा असते प्रकाशाची जाणीव
तू बस हसून दे हातात हात सखी
प्रत्येक संकटावर करेन मी मात सखी ! "
अरुणा महेश जाजू
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा