पहाटे ४ वाजता अलार्म वाजला आणि सकाळचे नित्यकर्म उरकून मी एक अनोखा प्रवास करण्यासाठीच्या तयारीला लागले.
मागील चार दिवसांपासून डोक्यात असंख्य विचारांचे कंगोरे फेर घालत असताना एक तीव्र काळजी ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तशी वारंवार हे सारं म्हणजे ही तयारी,हा प्रवास,ही सफर थांबवण्यासाठी इशारे देत होती.अर्थात ते साहजिक होतेच म्हणा, कारण एका स्पेशल मुलाला घेऊन कॅम्पिंग करणे अजिबात सोपे नव्हते.तरीही एका स्पेशल मुलाची आई असल्याने तसेच परावलंबनातून स्वावलंबनाकडे पाईक होण्याचा शिरस्ता अंगी असल्याने कुठेतरी हे धाडस (माझ्यासाठीचा लढा) करावंच असे मन ठासून सांगत होते.मग संजय राऊत(डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स, झाडानी) यांचे,”आम्ही तुमच्या स्पेशल मुलासाठी साऱ्या सोयी उपलब्ध करून देऊ.तुम्ही फक्त या.काहीही विपरीत घडणार नाही.आम्ही आहोतच तसे काही झाले तर!”, हे बोल वाळवंटात उभ्या एखाद्या छोट्याशा टुमदार पालवीसारखे आशादायी ठरले आणि विचारांच्या द्वंद्वाच्या लढाईत तीव्र काळजी मागे पडली अन् मनातील धाडस प्रबळ झाले.

हो नाही करता करता मी ,मिस्टर आणि माझा मुलगा एका अद्भुत प्रवासाला निघालो.पहाटेच्या प्रहरी आमच्यासह आणखी चार कुटुंबं कारने निघालो.नाशिक - मुंबई - सातारा ( झाडानी सातारा जिल्ह्यात आहे)असा मार्ग ठरला.मग आम्ही संजय राऊत(डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स, झाडानी) यांना आम्ही आमच्या ईप्सित स्थळी मार्गस्थ झालो आहोत असे कळवले.नंदू लाखे (इस्टेट मॅनेजर) यांनी
आम्हाला १५ दिवस आधीच कँपिंगच्या तयारीसाठी लागणारे साहित्य( थर्मल सूट , ट्रेकिंग शूज, टॉर्च, बॅटरी पॉवर बँक्स, स्वेटर इ),येण्याचा मार्ग, चेक इन, चेक आउट टायमिंग असा तपशील पाठवलेला होता.त्यानुसार आमचा चेक इन टाईम दुपारी दोन होता आणि चेक आउट टाईम सकाळी दहा होता.तिथे आम्ही दोन रात्री आणि तीन दिवस थांबणार होतो.

आता कॅम्पिंग म्हणजे काय? कॅम्पिंग ही मनुष्यासाठी एक मनोरंजक क्रिया आहे, आऊटिंगचा भाग आहे ज्यात सामान्यतः मनुष्याचे समूह असतात. यामध्ये तंबू किंवा स्वयंसिद्ध असलेले वाहन निवाऱ्यासाठी वापरले जाते.
आमचा प्रवास नाशिक ते मुंबई (१६५किमी) आणि मुंबई ते झाडानी(३००किमी) असा होता.आमच्या प्रवासाचा तपशील होता,
खेड स्टेशनपासून रघुवीर घाटातून- खोपी- उचट वाघवळे- लमाज - निवली अकल्पे - डारे - अहिर मुराच्या १ किमी आधी डाव्या बाजूच्या मार्गाने उत्तेश्वर येथे त्यांनतर अकल्पे मुरा, लमाज मुरा- दादानी नी मग झाडानी.
खेड स्टेशनपासून रघुवीर घाटातून- खोपी- उचट वाघवळे- लमाज - निवली अकल्पे - डारे - अहिर मुराच्या १ किमी आधी डाव्या बाजूच्या मार्गाने उत्तेश्वर येथे त्यांनतर अकल्पे मुरा, लमाज मुरा- दादानी नी मग झाडानी.
आम्हाला झाडानीला पोचण्यासाठी आधी तपोला किंवा तेतली गावात यायचे होते.
दोन्हीही गावांपासून झाडानीला जाण्यासाठी तराफा ( तराफा म्हणजे पाण्यावर आधार असलेली चटई ,वाहतुकीसाठी कोणतीही सपाट रचना किंवा दोन बोटींवर घातलेला ताफा असतो) होता.त्यात ही तराफा सेवा बंद होण्याच्या आत आम्हाला तिथे दुपारी २ ते ४ यावेळेत पोहोचायचे होते कारण तराफा सेवा बंद झाल्यावर प्रवासी गेले तर झाडानीला पोहोचण्यासाठी जास्तीचे ४ तास लागतात.

ठरलेल्या मार्गाने येताना कास पठार लागले. तेथील विविध रानफुलांचे विहंगम दृष्य पाहून माझ्या मेंदूतील न्युरोन्स असंख्य सकारात्मक लहरींनी जणू काही प्रज्वलित झाले आणि प्रवासामुळे क्षीण झालेले माझे शरीर उत्साहाने प्रफुल्लित झाले.आम्ही तपोला,जिल्हा-सातारा येथे पोचलो.(सातारा हे नाव शहरालगत असणाऱ्या सात किल्ल्यांवरून पडले आहे)तराफ्यात बसून आम्हाला कोयना नदीचा प्रवाह पार करून पलीकडे दादानी या गावात जायचे होते.तिथून झाडानीला २० किमी कच्चा रस्त्याने ४×४ एस यू व्ही,जीप, इनोव्हा,टेम्पो ट्रॅव्हलरने आपण प्रवास करू शकतो.त्यानुसार आम्ही सर्व स्त्रिया आणि लहान मुले इनोव्हा गाडीत तर माणसे आणि मोठी मुले टेम्पो ट्रॅव्हलरने झाडानीच्या दिशेने निघालो.
तिथे पोचल्यावर ते तंबू पाहून मनात बालपणापासून असलेली व्याघ्रभीती उचंबळून आली.परंतु तंबूच्या सभोवती कठोर कुंपण असल्याची ग्वाही संजय सरांनी सर्वांना दिली.तेव्हा कुठे मी सुटकेचा निःश्वास सोडला.मुलाला खाऊ घालून दिवसभर प्रवासाने थकलेली मी आणि सगळेच जेवण करून लवकरच निद्रेच्या अधीन झालो.रात्रभर मी ,माझा मुलगा आणि मिस्टर एका मोठ्या डबलबेड गादीवर आरूढ होतो,कारण सांगितलेल्या सुविधांची शाश्वती सत्य होती.बाकीच्यांसाठी स्लीपिंग बॅगची सोय होती.आम्ही हिवाळ्यात गेलो होतो त्यामुळे वाटले की खूप थंडी असेल पण नाशिकच्या थंडी पुढे ही थंडी फिकीच भासली.
दुसऱ्या दिवशी स्थलांतरित करता येणारी मोबाईल स्नानगृहे पाहून मला प्रचंड आनंद झाला. कारण कॅम्पिंगमध्ये सकाळचे नित्यकर्म कसे करावे हा यक्षप्रश्न सतावत होताच. आम्ही चेस, आर्चरी (धनुष्य बाणाने निशाणेबाजी),गाण्याच्या भेंड्या अशा गोष्टींत रमलो.माझा मुलगा देखील निसर्गाचा वरदहस्त डोक्यावर असल्याप्रमाणे शांततेत सहकार्य करत होता.त्यामुळे आपला निर्णय योग्य ठरला याची मला शाश्वती मिळाली.मन एखाद्या स्वच्छंदी फुलपाखराला कैदेतून मुक्त केल्यागत स्वैराचार करू लागले.मी खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात माहेरी आल्याप्रमाणे वागत होते.
परंतु हा आनंद जितका हवाहवासा वाटत होता त्याहीपेक्षा जास्त प्रसन्नता स्वतःच्या हाताने तेथील किचनमध्ये जेवण बनवून लेकराला खाऊ घालण्यात वाटत होती. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की झाडानी येथील लोक मनाने अत्यंत नितळ आणि काळजीवाहू आहेत कारण माझ्या मुलाची परिस्थिती पाहता त्यांनी मला जणू काही आम्ही तिथे असेपर्यंत निरंतर सेवा देण्याचा पण केला होता.आमच्यासाठी जेवण स्वतः संजय सर करत तर कधी त्यांच्या हाताखाली असणाऱ्या, पाककलेचा जन्मजात यशस्वी टिळा लावलेल्या निपुण स्त्रिया करत.प्रेक्षणीय स्थळे म्हणून आम्ही भात्रज गढ किंवा शिवटोक,सनसेट पॉइंट,शिव मंदिर,रात्रीची सफारी,स्टार गेझिंग हे सारे पाहिले अन् ते जणू आमच्यात कायमस्वरूपी गोंदले गेले.
याशिवाय आम्हा बायकांच्या मनीचे गूज, चिल्यापिल्यांचा मुक्त चिवचिवाट,दोन दिवसांपैकी एका दिवशी झाडानीच्या जंगलात केलेला स्वयंपाक(झुणका भाकरी,लोणचे,ताजी केळी,भात)अहाहा! आजही मनाच्या गाभाऱ्यात या आठवणी खोलवर रुतलेल्या असल्याने हा अनुभव कालचाच असल्याची जाणीव करून देण्यात १०० % यशस्वी ठरतात.
अशाप्रकारे कॅम्पिंगचा परमोच्च आनंद लुटून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तरीही एक अनामिक ओढ नेत्रांना मागे वळून पाहण्याचा आदेश देत होती.शेवटी कुठल्याही प्रवासाला सुरुवात असते तसाच शेवटही ठरलेलाच असतो नाही का?तसेच मनाला सावरत आम्ही नाशिकला निघालो.
या सर्व प्रवासात माझा शारीरिक विकलांग मुलगा चमत्कारिकरित्या स्थिर,शांत राहिला.त्याला कुठल्याही वेदना झाल्या नाहीत.खरं सांगू का?प्रवासाच्या सुरुवातीला देवावर जेवढा मी विश्वास ठेवला तेवढाच निसर्गावर देखील ठेवला.त्यामुळेच हे सारे चित्र मागील ३- ४ दिवसांत जसे मी कल्पिले होते तसेच रेखाटले गेले होते.हा प्रवास,ही अलौकिक कॅम्पिंग सफर म्हणजे माझ्या मुलाला परावलंबनातून स्वावलंबनाकडे नेण्याच्या माझ्या लढ्यात माझ्या हातात प्रेरणेची ज्योत
तेवत ठेवणारी एक मशाल म्हणून आजही मला भासते.
तेवत ठेवणारी एक मशाल म्हणून आजही मला भासते.
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा