"पण आई, मी कशी दिसते हे तू सांगितलं नाहीस?" नमूचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते.
सावित्री नमूकडे एकटक पाहत होती. गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, चाफेकळी नाक, नाजूक जिवणी. 'सगळे म्हणतात, ही अगदी हिच्या आईसारखी दिसते म्हणे. असो, आपल्याला काय घेणं - देणं?' काही न बोलता ती खोलीतून बाहेर आली.

"आई.." नमूची हाक तिच्यापर्यंत जणू पोहोचली नव्हती. ती धावत, डोळे पुसत आपल्या आवडत्या झोपळ्याच्या कुशीत विसावली. 'आई अशी का वागते?' याचं कोडं तिला काही केल्या सुटत नव्हतं.
"मावशी, साहेबांचा काय हाल-हवाल?" कधी नव्हे ते सावित्री स्वयंपाक घरात आली.
"ते ठीक आहेत."
"बस् इतकंच?"
सावित्रीच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मावशी गडबडल्या.
"तसं नाही. पण हल्ली ते फारसं बोलत नाहीत. रात्री घरी उशीरा येतात. जेवणाकडे लक्ष नसतं. सतत कामाचाच विचार करतात. नमूचा विषय निघाला की मात्र .." बोलता, बोलता मावशींनी जीभ चावली.
"तसं नाही. पण हल्ली ते फारसं बोलत नाहीत. रात्री घरी उशीरा येतात. जेवणाकडे लक्ष नसतं. सतत कामाचाच विचार करतात. नमूचा विषय निघाला की मात्र .." बोलता, बोलता मावशींनी जीभ चावली.
"पुढे काय? बोला लवकर." सावित्रीचा आवाज चढला.
"नमूच्या बाबतीत लगेच हळवे होतात साहेब. ते साहजिकच आहे. पण युवराजांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे."
"आणि आमच्यावर?"
"ते मी कसं सांगू बाईसाहेब?" मावशी काहीशा लाजून म्हणाल्या.
"तुम्ही का लाजताय? आता इतकं सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून विचारलं. खरंतर साहेबांचं हे दुसरं लग्न आणि माझं पहिलंच. मग त्यांना अनुभव हवा ना? पण तसं दिसत नाही. आम्हा दोघांपेक्षा तिच्यावरच जीव ह्यांचा. असं होतं तर लग्नच करायचं नव्हतं. मावशी, तुमचा संसार झालाय. याचा बराच अनुभव पाठीशी असेल. या विषयावर कधीतरी बोला साहेबांशी.
मान्य आहे, तुमचे यजमान काहीही करत नाहीत. तुम्ही आणि रामा, दोघं माय - लेक मिळून घर चालवता. तुम्हाला काय कळणार म्हणा, संसाराच्या गोष्टी! नुसता अनुभव असून काय फायदा? संसार दोघांनी सावरला तर टिकतो. नाहीतर ही आमच्यासारखी गत होते."

"असं म्हणू नका बाईसाहेब, डोईवरचे केस उगीच का पांढरे झाले! आमच्या ह्यांनी जेव्हा करायचं तेव्हा समदं केलं. पण कधी वेळ वाईट असते. दोष आपलाच आहे असं समजून त्या दिवसापासून ह्यांनी ड्राइव्हरचं काम सोडलं. आधी रामाच्या जागी हे ड्रायव्हर म्हणून काम करायचे. पण काळ वाईट म्हणायचा, त्या रात्री हे वहिनीसाहेबांना आणायला गेले अन्.."
"आणि काय मावशी?" शरद दारात उभे असलेले पाहून मावशी चपापल्या. त्यांची नजर करडी बनली होती.
"आज न सांगता लवकर आलात. पान वाढू दे ना?" सावित्री पुढे होत म्हणाली. "मावशी, साहेबांचं पान वाढा."
"नको. फारशी भूक नाही. खाणं झालं आहे. तू जेवलीस?" शरद.
"हो. तुम्ही यायची वेळ निश्चित नसते म्हणून जेवण करून घेतलं. शिवाय बाळालाही खाऊ घालायचा असतो."
"हम्म. तेही खरंच म्हणा. नमू जेवली?" शरद.
"जेवली असेल." सावित्री चोरट्या नजरेने मावशींकडे पाहत म्हणाली. तशी मावशींनी नकारार्थी मान हलवली. हे बघून शरदच्या चेहऱ्यावर राग तराळला. अवघ्या काही क्षणात तो निवळला अन् ते खोलीत निघून गेले.
"तुम्ही हल्ली घरचं का जेवत नाही. रात्री उशीरा घरी येता म्हणे. सतत कसल्या विचारात असता! धड घरात लक्ष असतं ना ऑफिसच्या कामात. मी माहेरी गेल्यावर साधा फोनही केला नाहीत तुम्ही. माझ्या बाळाची विचारपूस देखील केली नाहीत. त्या पोरीची इतकी काळजी तुम्हाला. तिच्याकडे लक्ष द्यायला घरात इतकी माणसं आहेत. आम्ही तुमचे कोणीच नाही का?" पाठोपाठ आलेली सावित्री चिडून म्हणाली.
"नमू माझी मुलगी आहे आणि युवराज माझा मुलगा, हे माझ्या ध्यानात आहे. पण तू माझी बायको आहेस हे विसरलीस, याचं दुःख वाटतं. जशी तू बाळाची काळजी घेतेस तशी नमूची विचारपूस सुद्धा करत नाहीस. आत्ताही ती जेवली की नाही, याकडे लक्ष देण्याचं साधं कर्तव्य तरी केलंस? नवरा म्हणून माझ्याकडे तरी कुठे लक्ष असतं तुझं? शरद उपहासाने हसले.
"तुझ्या डोक्यात सतत बाळाचा विचार असतो. त्याचं मन रमवतेस, त्याच्याशी खेळतेस, गप्पा मारतेस. तशाच जीव नमूला का लावत नाहीस? एक बाप म्हणून याची काळजी वाटते, इतकंच."
"तुझ्या डोक्यात सतत बाळाचा विचार असतो. त्याचं मन रमवतेस, त्याच्याशी खेळतेस, गप्पा मारतेस. तशाच जीव नमूला का लावत नाहीस? एक बाप म्हणून याची काळजी वाटते, इतकंच."
"माझं बाळ या घराचा वारस आहे. माझ्या पोटचं पोर आहे ते. निर्मोही माझी मुलगी नाही. कसा जीव लावू तिला? म्हातारपणी आपल्याला मुलाच्याच आधाराने राहायचं आहे. निर्मोही मुलगी आहे. ती काय आज ना उद्या लग्न करून सासरी निघून जाईल. तिच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च आपल्यालाच करायचा आहे. एकदा का ती सासरी गेली की माहेरचा अन् तिचा संबंध संपला. मग ती आपल्याला कशाला विचारते?"
"सावित्री, काय बोलतेस हे? मला दोन्ही मुलं सारखीच आहेत. दोघांचा खर्च करायला मी समर्थ आहे. त्याचा विचार तू करू नको आणि एका आईला मुलीला जीव कसा लावावा हे काय शिकवायला लागतं? मनात असलं की सगळं करता येता. आपण जीव लावला तर समोरचा माणूस आपल्यावर तितकंच प्रेम करतो. राहता राहिला प्रश्न वारसाचा, ही प्रॉपर्टी युवराज आणि नमू दोघांच्या वाटणीची असेल. ही वाटणी कशी करायची हे मी बघून घेईन. ती काळजी तू करू नको." बोलण्याला भलतचं वळण लागलेलं पाहून मावशींचं मन कळवळलं.
'बाईसाहेब साहेबांसाठी काय करतात? घरची कर्ती स्त्री किंवा एक बायको म्हणून कधी साहेबांच्या आवडीचं जेवण बनवत नाहीत की केलेलं स्वतःच्या हाताने वाढून देत नाहीत. मग पुरुष माणसांच्या तोंडी घास कसा लागायचा? ना कधी जवळ बसून प्रेमाने विचारपूस करतात. सतत त्यांच्या कसल्या ना कसल्या अपेक्षा, मागण्या पूर्ण कराव्या लागतात साहेबांना. बाईसाहेबांना आपल्या नवऱ्याविषयी ओढ वाटत असेल का? की सारख्या तक्रारी, गाऱ्हाणी, राग, लोभ इतकंच व्यक्त करता येत त्यांना? त्यांचं खरं प्रेम फक्त बाळावर आहे. नमूला आईचं प्रेम देणं दूर राहिलं, पण एक स्त्री म्हणून समजून घेऊ नये याचं दुःख वाटतं.'
"साहेब, थोडं जेवून घ्या. घरचं अन्न असं रोज वाया जाणं चांगलं नव्हे. अशाने अन्नपूर्णा रुसते म्हणतात." मावशी ताट घेऊन खोलीत आल्या.
"नको. खरंच भूक नाही." शरद टाळाटाळ करत असलेले पाहून त्या सावित्रीकडे वळल्या.
"बाईसाहेब, तुम्ही तरी सांगा. पुरुष माणसानं असं उपाशी पोटी राहू नये."
"बाईसाहेब, तुम्ही तरी सांगा. पुरुष माणसानं असं उपाशी पोटी राहू नये."
"आता मी तरी काय बोलणार? आमचं कोण ऐकतो? बाहेर खाऊन आले असतील तर कशाला जेवतील? रामा जेवला नसेल तर हे ताट त्याला द्या. निदान घरचं जेवण त्याच्या तरी पोटात जाईल."
"तुम्ही सांगून तर बघा. साहेब ऐकतील तुमचं."
"नको म्हंटल ना, तिच्या काळजीने पोट भरलंय माझं. मावशी, जा तुम्ही. रामाही जेवला नाहीय." शरद नमूच्या खोलीकडे वळले.
"नमू, अजून जेवली नाहीस?" शरद तिच्या जवळ बसत म्हणाले. ती चित्र रंगवण्यात दंग होती. घर, त्यापुढे अंगण, घराच्या आवारात छोटी फुलझाडं, दारात बाळाला घेऊन उभी असलेली आई, बाबांना निरोप देत होती अन् छोटी मुलगी एका बाईच्या हाताला धरून तिथेच बाजूला उभी होती. तिने काढलेलं हे चित्र बघून शरदचा चेहरा गंभीर बनला. 'नमूला सगळं जाणवतं. पण ती काही बोलत नाही.'
"तुम्ही आल्यावर जेवणार म्हणून हट्ट करत होती. किती समजावलं तरी ऐकेना. आता दोघं मिळून जेवून घ्या. रामाला ताट दिलंय. तो जेवेल. पण आधी साहेब जेवतील म्हणून तोही थांबलाय." मावशी दोन ताटं घेऊन आल्या. नमूसोबत साहेबांनी दोन घास खाल्ल्यानंतर त्या समाधानाने माघारी वळल्या. 'वहिनीसाहेबांचा अपघात ह्यांच्या हातून झाला नसता तर हे कर्ज उतरवण्यासाठी मी इथे थांबलेच नसते.' मावशी डोळे पुसत स्वयंपाक घर आवरू लागल्या.
नमूला झोपवून शरद खोलीत आले तेव्हा सावित्री गाढ झोपली होती. शेजारी झोपलेला युवराज चुळबूळ करत होता. शरद त्याला हळुवार उचलून बाहेर घेऊन आले. बाहेरचं थंड वारं झोंबायला नको म्हणून त्याच्या अंगाभोवती दुपटं घट्ट गुंडाळून ते झोपाळ्यावर बसले. हवेच्या हेलकाव्याने बाळाला लगेच झोप लागली. शरद मात्र बराच वेळ त्याला कुशीत घेऊन तसेच बसून होते. मध्येय त्यांचं लक्ष बाळाकडे जायचं. त्याचं रूप ते डोळ्यांत साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. 'युवराज अगदी आईच्या वळणावर गेलाय. दिसण्याच्या बाबतीत ठीक आहे. पण स्वभावाने मात्र सावित्रीच्या वळणावर जाऊ नयेत म्हणजे मिळवलं.'
'आज रमा असती तर सगळ्याच गोष्टी वेगळ्या असत्या. नमूला आईचं प्रेम मिळालं असतं. हक्काने मी तिला मनातल्या भावना, विचार सांगू शकलो असतो. दमून, थकून -भागून तिच्या मांडीवर डोकं ठेऊन मन मोकळं केलं असतं. पण सावित्रीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरीही बंध जुळत नाहीत. ती अशी का वागते? याचं कोडं काही केल्या उलगडत नाही. तिने पैसा, ही प्रॉपर्टी पाहून माझ्याशी लग्न केलं की तिचं लग्न होत नव्हतं म्हणून केवळ तडजोड केली? आता प्रश्नाचं उत्तर देणार तरी कोण? तिला फक्त आपलं बाळ नि स्वत्व तेवढं प्रिय आहे. बाकी संसारी असूनही ती संसारात लक्ष घालत नाही.
बस्, किती विचार करायचा? मनाला तशी सवय जडली आहे. एकदा का विचारात मन गुंतलं की बाहेरच्या जगापासून फारकत घेता येते, अलिप्त राहता येतं. मात्र पुरुषांना बाहेरच्या गोष्टींपेक्षा घरातल्या गोष्टी अधिक त्रास देतात हे मात्र खरं.' भिंतीवर लावलेल्या रमाच्या तसबिरीकडे शरदचं लक्ष अधून - मधून जात होतं.

बाहेर गारठा वाढत होता. बंगल्यावर लक्ष ठेवण्यासाठी रामा अधून -मधून फेऱ्या घालायचा. कारण बंगला काहीशा रिकाम्या जागी बांधला होता. आजूबाजूला असणारी घरं लांब अंतरावर वसलेली होती. मनुष्य वस्ती फार तुरळक प्रमाणात होती. दूरवर अस्पष्ट दिसणारी झाडांची रांग बघत शरद विचारांच्या तंद्रीत हरवून गेले होते.
"साहेब, झोपला नाहीत ते?" रामा बंगल्याच्या मागच्या आवारातून येत म्हणाला.
"साहेब, झोपला नाहीत ते?" रामा बंगल्याच्या मागच्या आवारातून येत म्हणाला.
"हे काय, निघतोच आहे. युवराज आज आमच्या कुशीत झोपलेत. त्यांचा विचार करता, करता भान राहिलं नाही. या पंधरा दिवसांत त्यांचा सहवास मिळाला नाही ना. खूप आठवण येत होती त्यांची. म्हंटल, बापाची कुशी विसरली का ते पडताळून बघावं." शरद हसत म्हणाले.
"बापाची कूस अशी कोण विसरतंय व्हय? साहेब, रात्र वर आली. झोपा जावा." रामा तिथेच कुंपणाजवळ घुटमळला.
"इतकीच आठवण येत होती तर एखाद्याने आठवणीने फोन केला असता किंवा ओढीने भेटायला, न्यायला तरी आला असता. अर्ध्या रात्री असं लहान लेकराला घेऊन बाहेर बसणं बरं नव्हे. आणा त्याला इकडे." सावित्री बाळाला ओढून घेऊन आत निघून गेली. हे पाहून रामा आपल्या वाटेला लागला. शरद मात्र काही न बोलता तसेच झोपाळ्यावर बसून झोके घेत राहिले. त्याचा आवाज रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करत असला तरी त्यांना त्याची पर्वा नव्हती.
--------------------------------------------------------
--------------------------------------------------------
"अगं, न उमलेली फुलं काढू नये. जी फुलं मोठी दिसतात तिच काढायची. ही बघ, अशी.." मावशी आणि नमू उमलेली गुलाबाची फुलं काढत होत्या.
"घे , हे तुझ्या केसांत माळ. एक आईला दे आणि बाकी देवघरात नेऊन बाबांकडे दे."
"आई, हे फुल तुझ्यासाठी. तुझ्या मोठ्या केसांत छान दिसेल अगदी." नमू आनंदाने म्हणाली आणि बाकीची फुलं द्यायला आत धावली.
शरद देव पुजेला सुरुवात करत होते. त्यांना इतकी सारी फुलं पाहून आनंद झाला. 'चला, आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर झाली म्हणायची.' त्यांचं मन प्रसन्न झालं.
"हे फुल तुला हवं का? घे. तुझ्या ताईने दिलंय. शुंदल आहे ना! अगदी माझ्या गोडुल्या बाळासारखं." सावित्री युवराजच्या हातात गुलाबाचं फुल देत बोबड्या बोलीत बोलत होती. ते ऐकून बाळ आणखी हसत होतं. एकदम त्याने तिच्या हातातल्या फुलाकडे झेप घेत ते हातात घट्ट आवळून धरलं अन् क्षणात त्या फुलांच्या पाकळ्या गळून पडल्या.
नमू लांबूनच घडला प्रकार पाहत होती. 'आईने हे फुल बाळाला देण्याऐवजी केसांत माळलं असतं तर? ती आणखी छान दिसली असती.' ती हिरमुसली.
"अरेरे, फुल पडलं की. असं करतात का? चला, एक फेरी मारून येऊ." आलेल्या रामाकडे युवराजने झेप घेतली. हल्ली गाडीतून फिरायची भारी सवय लागली होती त्याला. त्यामुळे रामा दिसला की तो गाडीत बसायचा हट्ट करी.

"चला, आम्हाला नाही पण युवराजांना तरी गाडीत बसायचं भाग्य लाभतंय. ते काही कमी नव्हे." सावित्री ओठांचे कोपरे वाकडे करत म्हणाली.
"तसं नाही बाईसाहेब, त्यामागची कारणं वेगळी आहेत. आता आम्ही पडलो चाकर! सगळ्या गोष्टी कशा सांगणार तुम्हाला?" गाडीजवळ जाताच युवराजला खूप आनंद झाला. कडेवर बसून तो एकदम उसळ्या मारू लागताच रामा गडबडला.
"आई, याला घे. मी गाडीत बसल्यावर मग मांडीवर दे. भलतेच दंगेखोर झालेत बाळराजे." मावशी गालातल्या गालात हसत होत्या.
"रामा काकाला म्हणावं, आता एक काकू आणा. बाळ झालं की आपोआप सवय होईल. मग कळेल, बाळाचा आवाज, हसणं, खिदळणं कित्ती गोड असतं ते!"

हे सारं लांबून बघणारी सावित्री देखील त्यांच्या हास्यात सामील झाली. रामा आणि बाळ दोघे फिरायला गेले अन् शरद लगबगीने बाहेर आले.
"गेले का दोघं? आधीच उशीर झालाय. बरं मावशी, दोन दिवसांनी नमूच्या शाळेला सुट्टी लागेल. दरवर्षीप्रमाणे तिला तिच्या आजी - आजोबांकडे सोडायला जावं लागेल. जाताना सोबत काहीतरी छानसं खायला करून ठेवा. चिवडा, लाडू किंवा इतर काहीही चालेल. ते सावित्रीला विचारून ठरवा आणि करा. जाताना रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही."

"तुमचं ठरलंच आहे तर मी काय सुचवणार? साहेबांनी सांगितलंय तेच करा. उगीच माझ्यामुळे बेत बिनसला, असं व्हायला नको." सावित्री.
"साहेब, ते काय सांगावं लागतं? दरवर्षी प्रमाणे मी करेन ते." मावशी सावित्रीकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या.
"तूही सोबत आली असतीस तर बरं झालं असतं. रमेचे आई - बाबा तुझी आठवण काढत होते. म्हणाले, वयानुसार आम्हाला येणं होत नाही. आमच्या दुसऱ्या लेकीला अन् बाळाला घेऊन या. म्हणजे त्यांची भेट होईल, कौतुक करता येईल."
"शरद, आमचा संबंधच काय? मी का येऊ? तुमच्या पहिल्या बायकोचे ते आई - वडील, निर्मोहचे सख्खे आजी - आजोबा. तिचं कौतुक करा म्हणावं. आमच्याबद्दल इतकं प्रेम असतं तर बाळाच्या जन्मावेळी आले असते दोघं, कौतुक करायला."
"सावित्री, तोंड सांभाळून बोल. वयानं, मनानं मोठे आहेत ते. मला आई -वडील नाहीत. त्यांच्या जागी मी त्यांना आई -बाबा मानतो, हे वेगळं सांगायला हवं का? यायचं नसेल तर येऊ नको. पण त्यांना बोल लावलेले मी खपवून घेणार नाही."
इतक्यात गाडी आली म्हणून शरद पुढे गेले. सावित्री बाळाला घेऊन आत निघून गेली.
'काय करावं? दिवसें दिवस हिचं वागणं, बोलणं बेताल होत चाललं आहे. एका घरंदाज स्त्रीला हे शोभतं का? दरवेळी फक्त स्वतः चाच विचार करायचा. जणू हिला एकटीला मन आहे आणि आम्ही बोललेलं काहीही ऐकून घ्यायला, सहन करायला मोकळे आहोत. हे लग्न करून चूक तर केली नाही ना आपण?'

"साहेब, लग्नाबाबत काय विचार आहेत तुमचे?" रामा शरदची तंद्री भंग करत म्हणाला.
"लग्न हे समोरच्या व्यक्तीला पारखून, ओळखूनच करावं. त्याच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वात आधी त्याचा भूतकाळ माहिती करून घ्यावा. त्याची कौटुंबिक, सामजिक माहिती काढावी. यासाठी लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींची वारंवार भेट व्हावी." शरद एका दमात सगळं बोलून रिकामे झाले.
"वा! एकदम बेस. आमच्या आईला गडबड लागली आहे. हल्ली सारखी मागं लागते. कधी एकदा सून घरी येते असं झालंय तिला.
पण साहेब, पोरगी मनासारखी मिळायला हवी. तिचं आणि आपलं सूत जमायला हवं. शिवाय तिचं आणि सासुंचं देखील जमायला हवं. मग संसार एकदम सुखाचा होईल. बरोबर ना?" रामा हसत हसत म्हणाला.
पण साहेब, पोरगी मनासारखी मिळायला हवी. तिचं आणि आपलं सूत जमायला हवं. शिवाय तिचं आणि सासुंचं देखील जमायला हवं. मग संसार एकदम सुखाचा होईल. बरोबर ना?" रामा हसत हसत म्हणाला.
"ते खरं असलं तरी तुझं आणि तुझ्या बायकोचं आधी पटायला हवं, कुठेतरी एकमत व्हायला हवं. सासुशी फारसं जमलं नाही तरी हरकत नाही. पण तुमचा संसार एकमताने व्हायला हवा." शरद मनापासून बोलत होते.
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून रामाला कसंतरीच वाटलं. 'उगीच हा विषय काढला. आधीच साहेब दुखावले गेलेत. त्यात आपण बोललो.'
"साहेब, इतकं मनावर घेऊ नका. माझं लग्नाचं वय उलटून निघालं आहे, असं आई आणि वडिलांना वाटतं म्हणून विचारलं."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा