अग्निकन्या......एक अनोखी गाथा

शापाला वरदानात बदललेल्या एका स्त्रीची गाथा
सदर कथा ही पूर्णतः काल्पनिक आहे केवळ मनोरंजन म्हणून वेगळ्या पद्धतीची अशी रचना करण्याचा प्रयत्न केला आहे..

      ती नुसती धावत होती. अंधाऱ्या वाटेवर एकटीच तीच तिलाच कळत नव्हत कि आपण अस का धावत आहोत. पायाखाली तर जमीन आहे अस सुद्धा जाणवत नव्हत तिला फक्त काळोखाच्या गर्तेत चाललोय असच भासत होत तिला. चारी बाजूंनी तिचाच आवाज तिला ऐकू येत होता. पण ती तर शांतच होती. एक शब्दही तोंडातून काढत नव्हती. पण तरीही तिचाच आवाज तिच्या कानात घुमत होता. समोर तर काही मार्गच दिसत नव्हते काळे ढगच सगळीकडे पसरलेत अस भासत होत. म्हणूनच ती कोठे धावत चालले हे कोणालाच सांगता येण्यासारखे नव्हत. अंधार तर फारच भयाण होता.
      अचानकच तिचाच एक हात तिच्याच गालावर येवून जोरात आदळला. त्यासरशी तीच्या गालावर चार बोट उठली. ती बोट तर इतक्या जोरात आदळली कि गालातून रक्तच निघाल बाहेर तोवर तिचाच दुसरा हात जोरात त्याच जागी आदळला. या सगळ्यात तीच धावण मात्र सुटल नव्हत. ती धावतच होती.
      नंतर तिचे पाय तिला पुढे पळण्यापासून अडवू लागले व मागे ओढत नेऊ लागले. ते तीचेच पाय आहेत काय? अशी शंकाच उपस्थित होत होती तिला. तरीही ती धावत होती पण कोणापासून धावत होती तेच तिला कळत नव्हत. कदाचित ती स्वतः पासूनच धावत होती.
      धावत धावत पुढे जाण्याऐवजी तिचे पाय तिला मागेच नेत होते तोवर हे चालू असतानाच जोरात आकाशातून वीज येऊन तीच्या अंगावर कोसळली. तिच्या शरीराने जागच्या जागी पेट घेतला. आता मात्र ती जोरजोरात ओरडू लागली. पण आश्चर्य म्हणजे शरीराने पेट घेतल्यावरही तीचा मृत्यू काही होईना. तीच शरीर जळतच होत. पण राख होतच नव्हत. त्यामुळे अग्नी पण शमत नव्हता तिला तर त्या वेदना इतक्या असह्य झालेल्या कि एकदास मृत्यू येऊ दे अस झालेल.
      पण अग्नी शांत होतच नव्हता. हळूहळू त्या घडणाऱ्या घटनेने धरणीला हादरे जाणवू लागले. ती जोरजोरात हलू लागली. जणू काय भूकंपच येऊ लागला. तरीही तिची आग काय शमेना. ते पाहून वाराही बेभान सुटला. पण त्या वाऱ्याने ती आग विझण्याऐवजी अधिकच भडकू लागली. इतकी भडकली कि दुसर कोण तीच्यापासून 5 कि.मी जरी उभ असेल तरी जळेल. व क्षणार्धात त्याच्या देहाची राख होईल. पण तीच्या देहाची मात्र राख पण होईना.
      काही वेळात वरच आभाळ पण भरून आल व अतीवृष्टी होवू लागली. सगळीकडे पाणीच पाणी झाल पण तो अग्नी मात्र शांत होईना. तो तर पावसाचे थेंब पडू लागले म्हणून तिच्या शरीराच्या आत शिरला. आता मात्र तिला वेदनेचा जास्तच प्रमाणात तीव्र झटका बसू लागला. तीच्या शरीराची लाही लाही होवू लागली. पण नंतर तिच्या त्या जाणीवाच विरल्या. जणू काय ती ती राहिलीच नाही. तर त्या अग्नीप्रमाणे अग्नीच झाली.
      हळूहळू सगळच शांत होवू लागल. तिच्या शरीराने वेगळच रूप घेतल. आधी खूपच सावळी दिसणारी ती सूर्याचा प्रकाश पडल्यावर सृष्टी जशी प्रकाशमान दिसते. तशी ती तेजस्वी कांतीने झळकू लागली. तीचे केस खूपच लांब झाले. तिचे डोळे निळसर झाले. तिच्या आवाजात कणखरतेसोबतच कोमलता जन्मून आली. तीच्या कानात, गळ्यात अग्नीसारखे भडक रंगाचे अलंकार झळकू लागले. ती आधीची ती राहिलीच नाही. ती अग्निसारखी अग्निमय अग्नीकन्या झाली.
      ती परत ज्या गावातून बाहेर पडलेली त्याच गावाकडे पावले टाकत. मंद गतीने चेहऱ्यावर जगाला वेड लावेल अस हास्य फुलवत जावू लागली. हळूहळू गावाची सीमा तिच्या डोळ्यात दिसू लागली. तस अग्निमय ज्योतीला म्हणजेच सूर्याकडे बघत त्यातल्या अग्निला वंदन करत. ती ने सीमेवरून आत प्रवेश केला आणि त्यासोबतच एक नवी गाथा उदयास आली.

धाव धाव धावूनी
चूकविले काळाचे गणित
मिळल्या शाप वाणीला
बदलले वरदानात

शोषून वीजेच्या अग्निला
अग्नी कन्या ती झाली
अन्याय अत्याचाराला 
जाळण्या अग्नी ती झाली

सुसाट सुटला वाराही
हतबल तिच्यापुढे झाला
नभात दाटल्या वर्षानेही
ओंजळीत ठाव मांडला

भक्ती पाहून मनाची
देवही झाले नतमस्तक
कार्य गती जगाची
बनले तिचेच मस्तक

भूत - भविष्य जाणण्याची
शक्ती तिच्यात रूजली
तिच्या रूपे दुर्गेची
सावली भूलोकी आली
कांती सामावून अग्नि
अग्निकन्या हो आली
अग्निकन्या हो आली

कथा कल्पनेच्या विश्वावर रंगवण्याचा प्रयत्न करत आहे काही चूकले असेल तर क्षमस्व पण केवळ मनोरंजन म्हणून वाचावी ही विनंती....


🎭 Series Post

View all