चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथा
सासूबाई म्हणतील तसं... भाग १
©® एकता माने
लग्नानंतर घराची दारं नववधूसाठी उघडली जातात; पण त्या दारातून आत येताना तिच्या हातात कितीही सोन्याच्या बांगड्या असल्या, कितीही शुभेच्छा आणि मंगलाष्टकांचे सूर कानाशी घुमत असले तरी तिच्या मनात एक प्रश्न नेहमी उमटतो,
‘मी या घरात कशी सामावेन?’
‘मी या घरात कशी सामावेन?’
नेहमीप्रमाणेच ही कहाणीही तिथूनच सुरू झाली होती.
अन्वीचं लग्न झालं आणि ती नवीन संसाराची सुरुवात करण्यासाठी मुंबईतल्या जुन्या पण प्रतिष्ठित वाड्यात आली. घरात खूप माणसं होती. सासरेबुवा, सासूबाई, पती अमेय, अमेयच्या दोन बहिणी. घरातला गजबजाट नेहमी सुरू असायचा. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस तर तिला आपल्या सासरवाडीत असलेल्या प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी जाणून घेण्यातच गेले. अन्वी माहेरी फार लाडकी मुलगी होती. अभ्यासात हुशार, नोकरी करणारी, व्यवहारी आणि आत्मविश्वासू; पण लग्नानंतर हे सगळं कुठेतरी पुसलं गेल्यासारखं वाटू लागलं. कारण घरात प्रत्येक गोष्ट ठरायची ती म्हणजे
'सासूबाई म्हणतील तसं…'
'सासूबाई म्हणतील तसं…'
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त सासूबाईंचाच हुकूम चालायचा.
“अन्वी, भाजीला जरा कमी तेल घाल. आमच्या घरी जास्त तेल चालत नाही.” सासूबाई स्वयंपाकघरातल्या टेबलावर बसून सांगत होत्या.
त्यांचा आदेश ऐकून अन्वीने मान डोलावली.
“हो आत्याबाई, आता कमी तेल वापरेन.”
“हो आत्याबाई, आता कमी तेल वापरेन.”
काही वेळातच...
“अगं, आमच्या घरात जेवण आधी सासरेबुवांना वाढायचं असतं. तसं बघ.”
अन्वी हसून म्हणाली,
“नक्की, लक्षात ठेवीन.”
“नक्की, लक्षात ठेवीन.”
अन्वीच्या प्रत्येक कामामध्ये सासूबाई काही ना काही चुका काढत होत्या. तिला आपल्या घरातले नियम सांगत होत्या. अन्वी पण शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची; पण तिने कधीही उलट बोलण्याचा प्रयत्न केला नाही.
कपडे धुणं कसं, फुलं देवाला अर्पण करताना मंत्र कसे म्हणायचे, पतीसमोर कसं वागायचं, बाहेरची मंडळी आली की काय बोलायचं,.. सगळंच ठरायचं.
अशाच प्रकारच्या सगळ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी अन्वीला तिच्या सासूबाई सांगायच्या आणि तिला त्यांच्या सांगण्याप्रमाणेच वागावे लागत होते.
सुरुवातीला अन्वीने सगळं पाळलं. तिला वाटलं,
‘हे नातं आहे, जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. सासूबाई अनुभवी आहेत, त्यांना माहिती असेल.’
‘हे नातं आहे, जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. सासूबाई अनुभवी आहेत, त्यांना माहिती असेल.’
पण जसजसा वेळ जात होता तसतशी तिच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. तिला वाटू लागलं,
‘माझं मत? माझी इच्छा? मीही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मग प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे कशी वागू शकते?’
‘माझं मत? माझी इच्छा? मीही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मग प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे कशी वागू शकते?’
एका दुपारी अमेय ऑफिसमधून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता.
अन्वीने त्याला विचारलं,
“आज ऑफिसमध्ये खूपच काम होते वाटतं. तुमच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत आहे. तुम्ही आराम करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते.”
“आज ऑफिसमध्ये खूपच काम होते वाटतं. तुमच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत आहे. तुम्ही आराम करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते.”
तेवढ्यात सासूबाई मागून म्हणाल्या,
“अगं, आमच्या घरी संध्याकाळी कॉफी नाही पीत. दूध प्यायचं असतं.”
“अगं, आमच्या घरी संध्याकाळी कॉफी नाही पीत. दूध प्यायचं असतं.”
अन्वी थोडं हसून थांबली; पण अमेयला जाणवलं की तिच्या डोळ्यांत किंचित नाराजी आहे. त्याने काही न बोलता दूध घेतलं.
हळूहळू अन्वीचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. ती ऑफिसमध्ये छान बोलकी असायची; पण घरी येताच गप्प होत असे. कारण काहीही बोललं की लगेच,
“तसं आमच्या घरात नाही.”
“हे असं करायचं नसतं.”
“सासूबाई म्हणतील तसं कर.”
असेच काही ना काही वाक्य तिला ऐकायला मिळत होते आणि मग ती शांत होत होती.
क्रमशः
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा