चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथा
सासूबाई म्हणतील तसं... भाग २
©® एकता माने
रविवारचा दिवस होता. घरात सगळे आराम करत होते. अन्वीने ठरवलं की दुपारी खास पाव-भाजी करायची. ती बाजारातून ताजी भाजी घेऊन आली. उत्साहाने स्वयंपाकाला लागली.
तेवढ्यात सासूबाई किचनमध्ये आल्या.
“अगं, आमच्या घरात पाव-भाजी कधी करत नाहीत. साधं जेवण झालं की झालं. हे असे जिभेचे चोचले आमच्या घरात कोणालाही आवडत नाही.”
“पण आई, आज रविवार आहे. सगळ्यांना काहीतरी वेगळं खायला आवडेल. मी केली तर बघा, छान होईल.” अन्वीने शांतपणे आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला.
आपल्या बोलण्याला प्रत्युत्तर दिलेले पाहून सासूबाईंचा चेहरा कठोर झाला.
“मी नाही म्हटलं की नाही. आमच्या घरात असं कधीच केलं नाही. म्हणजे नाही!” सासूबाईंनी गंभीर स्वरात तिला सांगितले.
संपूर्ण घर शांत झालं. कोणीही अन्वीच्या बाजूने बोलायला पुढे आले नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं; पण तिने स्वतःला सावरलं. शेवटी आपल्या सासूबाईंचे ऐकून अन्वीने सगळ्यांसाठी साधा स्वयंपाक केला. सगळ्यांची जेवणं झाली. अन्वी आपले काम करून आपल्या रूममध्ये आली; पण आज मात्र तिचं मन खूपच नाराज झालं होतं.
त्या रात्री अमेयने तिला विचारलं,
“काय झालं गं? तू आज खूप शांत आहेस.”
“काय झालं गं? तू आज खूप शांत आहेस.”
अन्वीने हुंदका दाबत उत्तर दिलं,
“अमेय, मी जे काही करते ते चुकीचं का होतं? माझं मत महत्त्वाचं नाही का? मला काही वेगळं करायचं असलं, थोडं नवीन आणायचं असलं तरी फक्त एकच उत्तर मिळतं की सासूबाई म्हणतील तसं... मी कोण आहे मग? फक्त ऐकणारी? मी या घराला आपलं घर मानून वागते. आपल्या माणसांसाठी प्रेमाने काहीतरी करायचा प्रयत्न करते; पण सगळं व्यर्थ!”
“अमेय, मी जे काही करते ते चुकीचं का होतं? माझं मत महत्त्वाचं नाही का? मला काही वेगळं करायचं असलं, थोडं नवीन आणायचं असलं तरी फक्त एकच उत्तर मिळतं की सासूबाई म्हणतील तसं... मी कोण आहे मग? फक्त ऐकणारी? मी या घराला आपलं घर मानून वागते. आपल्या माणसांसाठी प्रेमाने काहीतरी करायचा प्रयत्न करते; पण सगळं व्यर्थ!”
अमेय शांतपणे ऐकत राहिला. मग म्हणाला,
“अन्वी, मला कधी लक्षातच आलं नाही की तुला इतका त्रास होत आहे. आईचं म्हणणं नेहमी मान्य करायची आपली सवय आहे; पण तुझं खरं आहे. तुझंही मत महत्त्वाचं आहे.”
“अन्वी, मला कधी लक्षातच आलं नाही की तुला इतका त्रास होत आहे. आईचं म्हणणं नेहमी मान्य करायची आपली सवय आहे; पण तुझं खरं आहे. तुझंही मत महत्त्वाचं आहे.”
आपली बायकोही या घरातली एक महत्त्वाची सदस्य आहे आणि तिचे विचारही जपले पाहिजेत असा अमेय मनामध्ये विचार करू लागला. अन्वी तिची माहेरची माणसं, तिचं घर सोडून आपल्या सोबतीने या घरात आली आहे त्यामुळे तिची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं विचारचक्र त्याच्या मनात सुरू होतं.
दुसऱ्या दिवशी अमेयने सासूबाईंसोबत चर्चा केली.
“आई, तुला माहितीये ना, अन्वी ऑफिसमध्ये जबाबदारी सांभाळते. तिथे तिचं ऐकलं जातं; पण इथे येताच तिला एकही गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करता येत नाही. असं केलं तर तिचा आत्मविश्वास कमी होईल. तुम्हाला तिचं सुख महत्त्वाचं नाही का?”
सासूबाई थोडा वेळ शांत राहिल्या. आज जेव्हा आपल्या वागण्यावर आपल्या मुलानेच प्रश्नचिन्ह उभं केलं, ते ऐकून मात्र त्यांच्या मनामध्येही चलबिचल निर्माण झाली होती.
“बाळा, मी जे काही सांगते ते घराच्या रुढींप्रमाणे असतं.” सासूबाईंनी शांत आवाजात उत्तर दिले.
“आई, मान्य आहे तू आपल्या घराच्या पूर्वीपासूनच्या चालत आलेल्या सगळ्या रूढी, परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेस; पण जर आपल्या घरामध्ये एक नवीन सदस्य येतो आणि थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न करतो तर आपणही काळानुसार आपल्या वागण्यामध्ये थोडा बदल केला तर त्यात काहीही वावगं नाही. तू जेव्हा या घरामध्ये नवीन लग्न करून आली होतीस तेव्हा तुला या घरातल्या रूढी, परंपरा माहीत होत्या का? तेव्हा तुझ्याही मनामध्ये काही वेगळे विचार असतील, तुझ्या माहेरच्या काही वेगळ्या सवयी असतील. तुलाही त्याप्रमाणे वागायला आवडले असते ना?” अमेयने आपल्या आईला शांत आणि तितक्यात प्रेमळ शब्दांमध्ये समजावण्याचा प्रयत्न केला.
क्रमशः
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा