राधा सर्व सामान्य स्त्रियांसारखी एक गृहिणी होती. तिचं जग तिच्या दोन मुली- रिद्धी, सिद्धी आणि सासू सासरे व निखिल (नवरा) इतकंच होत. छोटस पण सुखी जग????.सुखी संसार होता.
राधा सुशिक्षित होती पण अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष गृहिणी तसेच प्रेमळ आई व सून होती. तिचे दैनंदिन जीवन सुरू पहाटे सगळ्यांच्या आधी होत असे. पहाटे उठून थोडा स्वतःसाठी योगा, मग मुलींची शाळेची तयारी,निखिल व आई बाबांसाठीं योग्य नाश्ता, निखिलचा डब्बा.... मग तिची भरतनाट्यमची प्रॅक्टिस,जेवण, दुपारी मुलींचा अभ्यास, पुन्हा सगळ्यांसाठी जेवण,सासू सासऱ्यांची नित्याची औषधे......अशी तिची दैनंदिनी असे!!!!
घरातील सगळ्यांचा दिवस राधा पासून सुरू होत असे आणि मावळत पण राधाने, जणू राधा म्हणजे त्या घरातील जीव होता...निखिलचे राधा शिवाय एक पानही नसे हालत...... ऑफिसची बॅग, रुमाल, चावी, पाकीट सगळे राधा त्याला हातात देते असे म्हणून कि काय फक्त राधा ............राधा हा जप चालू असे त्यांचा...........
त्या दोघांमध्ये प्रेम व मैत्रीचे नाते होते, निखिल तिला सतत आर्जवे करत असे अग आपण तुझ्यासाठी नृत्य अकॅडमी चालू करूया, जेणे करून तुला तुझी कला जोपासता येईल, पण ती त्याला सतत सांगत असे आता नको बघू नंतर कधी तरी....नृत्य कलेत गुंतले तर घरात, मुली आणि आई बाबा यांच्या कडे दुर्लक्ष होईल असे म्हणून ती टाळत असे........
राधा आणि सासूचे नाते मैत्रीचे नाते होते, सगळ्यांशी प्रेमाने बोलणे, प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर, सासू सासरे, नणंद आणि इतर सगळ्यांशी सलोख्याने वागणारी, बिल्डिंगच्या वॉचमन ते अगदी घरी येणार दूधवाला,कोपऱ्यावरच्या भाजीवाला पर्यंत सगळे राधाशी आदराने बोलत कारण साऱ्या या लोकांशी सुध्दा आपुलकीने बोलत असे.अशी ही राधा सगळयांना आपलस करणारी व माणुसकी जपणारी......
रिद्धी व सिद्धीच्या शाळेत जाऊन त्यांच्या टिचर सोबत त्यांचा अभ्यास आणि होणारी प्रगती ह्या सगळ्या गोष्टी ती नीट लक्ष देत असे, त्यांचा दुपारी अभ्यास करून घेणे सारे उत्तम प्रकारे पाहत होती......एक प्रेमळ आई, हुशार सून आणि गृहिणी या साऱ्या भूमिका ती बजावत उत्तम होती पण मनाच्या कोपऱ्यात ती स्वतःला कुठेतरी हरवून बसली होती............ती एक भरतनाट्यम कलाकार होती, तिला कॉलेजमध्ये असताना उत्तम नृत्यासाठी खूप बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळाली होती, तिचे स्वप्न होते स्वतःची एक भरतनाट्यम नृत्य अकॅडमी सुरू करावी, तिचे नाव आणि तिची कला यांनी तिची ओळख असावी, तिची ही नृत्य कला म्हणजे तिचा जीव होता........पण निखिल सोबत तिचे लग्न झाले आणि घर,मुली, जवाबदारी या सगळ्यात तीचे स्वप्न हरवले व तिची नृत्य करणारी पाऊले कुठेतरी थबकली होती........!
दुपारी सहज ती मोबाईल चाळत होती आणि अचानक तिची नजर तिच्या कॉलेजच्या एक नृत्य स्पर्धेच्या पोस्टवर गेली व ती पोस्ट बघून तिच्या अंतर्मनाच्या कोपऱ्यातून ते गाण्याचे स्वर, घुंगरूचे आवाज तिला साद घालू लागले, तीचा भूतकाळ तिच्या डोळ्या समोर येऊन गेला........कशी ती आणि तिचे नृत्य ......एकरूप होऊन ती नाचत असे .....सगळे क्षणार्धात तिला आठवले अन......तिचे डोळे पाणावले..अश्रू तिला अनावर झाले........दरवाज्याची बेल वाजली.....ती भानावर आली.
राधा ......अग ये राधा ..सासूने आवाज दिला!!! बाळा कोण आले आहे बघ ग!!!! तिने दरवाजा उघडला पाहाते तर काय तिची बालमैत्रीण व कॉलेजची सखी समिधा आली होती........... पूर्वी समिधा, राधा व निखिल एकाच कॉलेजमध्ये होते......तिच्या येण्याने जणू काही राधा अगदी रिचार्ज झाली.........त्यांच्या गप्पा रंगल्या......तिने या नृत्य स्पर्धे विषयी समिधाला सांगितले.....
बघू पुढे काय होते राधाचे!!!
@श्रावणी देशपांडे
लेख आवडला तर अभिप्राय द्या!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा