चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: ४
कविताच्या हट्टापायी प्रमोद तयार झाला. मग बराच वेळ त्यांनी एकमेकांच्या सहवासात घालवला. प्रमोदकडून तो स्वर्गीय आनंद उपभोगून कविताला तृप्त झाल्यागत झाले होते. तिच्या मनासारखे झाले होते. वेळ पण पुष्कळ झाल्याने कविता आणखी काहीही न बोलता तिथून निघून गेली.
" कविता, काय बोलणार मी तुझ्या या धाडसापुढे. पण तू कुणा दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालण्याआधी मी या जगात नसेन." कविताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून प्रमोद बोलत होता. पण ते ऐकण्यासाठी कविता तिथे नव्हती. ती तर कधीच निघून गेली होती.
लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतशी सुनिताच्या मनाची घालमेल वाढत होती. एक महिना उलटला होता, पण कविताची मासिक पाळीची तारीख अजून झाली नव्हती. एरवी महिना संपायच्या आत दोन-तीन दिवस आधी तिची तारीख होत होती. पण या महिन्यात तसे घडले नसल्याने. सुनिताने एक दोनवेळा कविताला विचारण्याचा प्रयत्न केला. पण, तिने तो विषय मुद्दामहून टाळला होता.
सुनिताच्या काळजाची धाकधूक वाढली होती. तिने कॅलेंडर बघितले. कविताच्या मागील तारीख तिने बघितली जी लग्नाचा मुहूर्त शोधतेवेळी नोंद केली होती.
"कविता..." सुनिताने कविताला आपल्या खोलीत बोलवले.
"काय आई ?" कविता सुनिताची नजर चुकवत म्हणाली.
"ही काय भानगड आहे? " सुनिताने विचारले.
"कोणती ?" कविता परत नजर चुकवत म्हणाली.
"मला काय म्हणायचे तुला चांगले ठाऊक आहे. पण तुला स्पष्ट विचारते. भानगड हीच की, तुझी महिन्याची तारीख अजून कशी काय नाही झाली ?" सुनिताने थेट प्रश्न केला.
कविताला माहीत होते की, आईला आज नाहीतर उद्या संशय येईल. पण असे एकदम विचारल्याने ती गोंधळली. पण स्वतःला सावरत म्हणाली,
"आई तुला जो संशय आहे तो खरा आहे. आई, मी तुझ्या व बाबांचा शब्द राखण्यासाठी लग्न करत आहे, पण मी माझे सर्वस्व कधीच प्रमोदला मानले आहे व त्याच्याशिवाय मी अन्य कुणाचा विचार करू शकणार नाही. तुम्हा दोघांच्या नावाला काळीमा लागू नये, म्हणून मी पळून जाऊन लग्न केले नाही. तेव्हा मी तुला एक स्पष्टच सांगते, तू जर हे बाबांना सांगितलेस व या विषयाचा गाजावाजा झाला तर मी माझे जीवन संपवून टाकेन व मला नाही वाटत माझे लग्न लागेपर्यंत प्रमोद पण जिवंत राहील."
"आई तुला जो संशय आहे तो खरा आहे. आई, मी तुझ्या व बाबांचा शब्द राखण्यासाठी लग्न करत आहे, पण मी माझे सर्वस्व कधीच प्रमोदला मानले आहे व त्याच्याशिवाय मी अन्य कुणाचा विचार करू शकणार नाही. तुम्हा दोघांच्या नावाला काळीमा लागू नये, म्हणून मी पळून जाऊन लग्न केले नाही. तेव्हा मी तुला एक स्पष्टच सांगते, तू जर हे बाबांना सांगितलेस व या विषयाचा गाजावाजा झाला तर मी माझे जीवन संपवून टाकेन व मला नाही वाटत माझे लग्न लागेपर्यंत प्रमोद पण जिवंत राहील."
कविताचे हे स्पष्ट बोल ऐकून सुनिता क्षणभर स्तब्धच झाली. तिला काय बोलायचे तेच समजले नाही. काहीवेळ ती तशीच बसून होती. एका बाजूने नवरा व एका बाजूने पोटची पोर. कुणाला काही सांगायला पण वाव नव्हता.
एकदाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पाडला. संतोषरावांनी लग्नाच्या तयारीत काही म्हणून काही कसर ठेवली नव्हती. संतोषच्या एकुलत्या एक कन्येचा हळदी समारंभ म्हणून सगळे खूश होते. खूश नव्हत्या त्या फक्त दोघी, कविता व सुनिता. नाही म्हणायला सुनिताने सगळ्यांचा पाहुणचार ऊठ-बस सगळे व्यवस्थित केले होते. पण तिला काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटत होते. ती जिच्यासाठी हे सगळे करत होती, तीच या सगळ्यांपासून फार दूर होती. कविताचे शरीर या सगळ्या हळदी समारंभात व्यग्र होते, पण तिचे मन कुठे होते हे तिलाच माहीत नव्हते.
लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी लवकर मुहूर्त असल्याने वधूला घेऊन लग्नासाठी जाण्यास मंडळी लवकर बाहेर पडली.
सातेरीच्या देवळात पाया पडली व शाळेशेजारून गाडी जाताना पिंपळाच्या झाडाखाली संतोषला लोकांची गर्दी दृष्टीस पडली. संतोषने गाडी थांबवण्यास सांगितली व जवळच असलेल्या इसमापाशी चौकशी केली.
सातेरीच्या देवळात पाया पडली व शाळेशेजारून गाडी जाताना पिंपळाच्या झाडाखाली संतोषला लोकांची गर्दी दृष्टीस पडली. संतोषने गाडी थांबवण्यास सांगितली व जवळच असलेल्या इसमापाशी चौकशी केली.
"काय रे गणेश, काय झाले ही एवढी गर्दी कशासाठी?" संतोषने विचारले.
"अरे संतोष, तू कशाला थांबलास इथे ?" इतक्यात त्याचे लक्ष गाडीत गेले, गाडीत कविता होती.
"अरे तुझ्या मुलीचे लग्न आहे ना, तुम्ही जा लवकर, तुम्हाला उशीर होईल लग्नाला, आम्ही पोहोचतो नंतर." गणेश सांगू लागला.
"अरे पण सांगशील तरी काय झाले ते व ही एवढी गर्दी कशाला?' संतोषने पुन्हा विचारले.
"अरे तो वरच्या वाड्यावरचा प्रमोद आहे ना, तोच रे तो त्याचा व तुझा काही दिवसाआधी देवळात वाद झाला होता. त्याने रात्री गळफास लावून आत्महत्या केली. काल संध्याकाळपासून हातात दोरी घेऊन फिरत होता. कुणी विचारले तर म्हणत होता की, मी आज आत्महत्या करणार म्हणून. लोकांना मस्करी वाटत होती, पण त्याने केलंही तसंच.".
'फक्त एक गोष्ट तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, या संसारात सरळ मार्गाने व सुखी जगणे कठीण आहे, पण मरणे सोपे आहे. फार चांगला मुलगा होता, कुणाच्या कसल्याही भानगडीत पडत नव्हता. एक तुझ्याशी तो वाद सोडला तर आणखी कुणाशी त्याचे वाजलेले मी तरी ऐकले नाही. कोण म्हणतं त्याची काय तरी भानगड होती. खरे काय अन् खोटे काय देवालाच माहीत. पण तुम्ही जा... जा लवकर गाडीत वधू असताना अशा जागी फार वेळ राहू नये." गणेश उत्तरला.
हे ऐकून सुनिताच्या काळजात गोळा आल्यागत झाला पण करणार काय, ती काहीही बोलू शकत नव्हती, तिला कविताने सांगितल्याप्रमाणे प्रमोदने तसेच केले होते.
तिने एक कटाक्ष कवितावर टाकला. पण कविताचा चेहरा निर्भाव होता. तिने काळीज आधीच घट्ट केले होते. तिला आधीच माहीत होते की, हे होणारच होते. फक्त बातमी येण्याचा अवकाश होता.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा