नमस्कार ईरा वाचकहो, आशा करते सगळे सुरक्षित आहात.मी लवकरच एक कथा काही भागांत सादर करणार आहे. ही कथा वास्तविक आणि काल्पनिक गोष्टींचा सांगड घालून सादर करणार आहे. ह्या कथेचा कोणाशी काही संबंध नाही. आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
\"
\"अनुभव एक किस्से अनेक- प्रवास परतीचा.\"
तिच्या शेवटच्या विमानप्रवासात तिने मागितलं मरण...
अरे अरे...घाबरू नका. तर आपल्या कथेतील तिचे नाव आहे... वल्लरी. बर अस काय झालं असेल जे तिने इतके अशी इच्छा जिवाच्या आकांताने देवा कडे मागितली असेल?
वर्षभरापूर्वीची गोष्ट, तिला कामा निमित्ताने का होईना बाहेरची दुनिया फिरता येणार होती. कामच तीच तसं होत. आज इथे उद्या तिथे. जसे विमानाने उड्डाण केले तसे तिने एक दीर्घ मोठ्ठा श्वास घेतला. सगळे समस्या तिने मागे सोडून गेली नवीन आयुष्य जगायला.
काम तसे नवीनच. रोज नव नवीन जागेला भेट देत नवीन लोकांना भेटून त्यांच्या संस्कृती , भाषा, आवडीनिवडी जाणून घेत. जगभरातल्या लोकांसोबत तीच काम चालू असे. अर्थात तिथे सुद्धा राजकारण चालायच पण मर्यादित. मित्र आणि कुटूंबापासून दूर खायचे हाल असले तरी आनंदी होती \"वल्लरी\".
सगळ्याना दिसायला आनंदी होती वल्लरी पण आतून पार तुटून गेलेली होती. कित्येक वेळा रात्र - रात्र रडून काढायची. ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तीच व्यक्ति तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होती.
नशिबाने तिला खूप समजून घेणारा मित्र निक आणि एलोरा नावाची मैत्रीण मिळाली. ज्यांच्या सोबत ती सुखदुःख वाटायची. त्यांना कळून चुकलं नक्की कुठे अडकली आपली प्रिय वल्लू. तिला योग्य तो मार्ग दाखवत एकच वाक्याने जादू केली. \" तू जितकी जास्त पळशील समस्येपासून, तेवढी जास्त तुला ती त्रासदायक होईल. एकदाच तू सामना कर आणि लढ मग बघ गोष्टी कशा त्या- त्या जागी जातात\". तात्पुरते का होईना वल्लरी ला उभारी मिळाली.
दिवस घरी जाण्याचा उजाडला. धाकधूक, उत्सुकता आणि घरी कधीच न पोहोचायची इच्छा. सगळाच मिश्र भावना होत्या. कामाचा कालावधी संपला. घरी तर जावे लागणार होते. विमानतळावर पोहोचून सगळे सोपस्कार पार पाडले. दोन विमाने बदलून ती मुंबई ला पोचणार होती.
बोर्डिंग ची वाट बघत फोन वर चॅटिंग करत होती. तिचा आत्मा तळमळला जेव्हा प्रेम केलेल्या व्यक्तीने प्रवास साठी शुभेछा देण्याऐवजी जिव्हारी लागतील असे शब्द बोलले. जेव्हा दुसरी उड्डाण साठी वल्लरी तयारीत होती ...
तेव्हा तिने प्रचंड मनापासून देवाला प्रार्थना केली की, \" देवा विमान अपघात होऊ दे. मला नाही पोहोचायचे घरी. त्रास होतोय खूप. \" पण दुसर्याच क्षणी तिच्या मानाने विचार केला की, \" आई, वडिल , भावंडांची काय चूक? ते तर माझी उत्सुकतेने वाट बघत आहेत. ह्या माझ्यासोबतच असलेल्या प्रवाशांची काय चूक? नको देवा, रद्द करा माझी प्रार्थना . सॉरी \".
वल्लरी ला फार हुरहुर लागून राहिली संपूर्ण प्रवासात अशी मागणी मागितल्या मुळे. शेवटी विमान उतरले आणि तिला बरे वाटले. तिने मनाशी निर्णय केला जे काही आहे मी हे लढून हे सोडवणार आहे.
अशी ही आपली कथेची नायिका वल्लरी. बघूयात हळूहळू नक्की काय झाले आणि तिने कसे मात केली.
क्रमशः
©पूजा आङेप.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा