अपहरण

वास्तववादी
दिक्षाला न्यायला आज कोणी आले नव्हते. आज तिच्या बाबांना यायला जमल नाही. कारण ऑफिसमध्ये अचानकच एक महत्त्वाची डिल आली होती. दिक्षाची आई लहानपणीच तिला कायमची सोडून गेलेली. पण तिच्या बाबांनी तिला कधीच आईची कमी भासू दिली नाही. तशी दिक्षा अभ्यासात खूपच हूषार होती नेहमी पहिला नंबर यायचा तिचा. तिच्या बाबांसाठी तर दिक्षा हेच त्यांचे जग होत.
दिक्षाचे बाबा मुंबई मधील एका मोठ्या कंपनीत HR होते ते कामाला ईश्वरासमान मानायचे. त्यांच्या दिक्षाकडून पण खूप अपेक्षा होत्या. ते दिक्षाला नेहमी मोठी स्वप्न पाहायला शिकवायचे.
त्यांनी दिक्षाला आणायला सोडायला एक ड्रायव्हर पण नेमलेला पण तो खूप विचित्र वागायच. तिला कोठेही हात लावायच म्हणून दिक्षाने बाबांना ड्रायव्हर काका नकोत अस सांगून त्यांना कायम बंद केलेले. तेव्हापासून ती चे बाबा स्वतः हाच तिला न्यायला यायचे. चुकून कधीतरीच ती एकटी यायची.
आज पण तिला एकटीलाच जाव लागणार होत. ती मस्त गाणी गुणगुणत चालली होती. आज तिचा दिवस खूप छान गेलेला. गेल्या महिन्यात त्यांच्या शाळेत क्रीडा स्पर्धा झालेल्या त्यात तिचा पहिला नंबर आलेला. त्या आनंदात ती घरी चालली होती. कधी एकदा घरी जावून ही बातमी बाबांना सांगेन अस झालेल तिला. ती भर भर चालत होती.
पण तिला याची मात्र भनक नव्हती कि कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. ती तशीच पुढे चालली होती. तिच्यावर नजर ठेवलेल्या माणसाने बाजूच्या माणसाला इशारा केला.
तो दिक्षा जवळ जावू लागला. त्याने बाबा कोठे आहेत मी त्यांचा जूना मित्र आहे अस सांगितल.
दिक्षाला पण थोड बर वाटल आता त्यांच्यासोबत तर घरी जाता येईल म्हणून .
ती म्हणाली चला कि मग घरी बाबांची पण भेट होईल. तो तयार झाला. त्याने खिशातली कॅडबरी काढली आणि तिला खायला दिली.
तिला पण कॅडबरी खूप आवडायची. ती ने कसलाही विचार न करता ती लगेच खायला घेतली.
थोड्या वेळाने तिला ती च डोक जड वाटायला लागल आणि ती तशीच चक्कर येवून खाली पडली. मगाशी लपलेला तो माणूस पण मागावरच होता तो पटकन तेथे आला त्या दुसऱ्या माणसाला पैसे दिले आणि दिक्षाला घेवून निघून गेला.
दिक्षा शुद्धीवर आली आणि आजूबाजूला बघू लागली तर नुसता अंधारच होता आणि तिच्यासारखीच काही मुल मुली हात पाय बांधलेल्या अवस्थेत होते. ती आपण कोठे आलो याचा विचार करत होती तोच समोर तिचे ड्रायव्हर काका आले.
ती विचारु लागली तुम्ही इथे कसे आणि बाबांचे मित्र कोठे गेले. सोडा मला घरी जायच.
ते मोठ्याने हसत म्हणाले अरेरे तुला घरी जायचय. अग पण तू घरीच आहेस कि आजपासून हेच तुझ घर.
दिक्षाला समजल की आता आपण चांगलेच अडकलोय ती तशीच रडत राहिली.


शिकवण:
कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये.
नेहमी सतर्क राहिले पाहिजे.

©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी


🎭 Series Post

View all