अबोला......

कवितासंग्रह...
नको ना धरू तु अबोला
होतो मग त्रास या मनाला
मिळतो न ठाव ठिकाणा
तुझ्या मग मायेचा ओलावा

अंधारून जाते मग वाट
प्रकाशाला उरी लपवून
जखमांचा उठतो मग घाट
त्या अंधार वाटेत धडपडून

सोबतीतला तुझा हात
शोधू लागते मग मन
करपल्या या जगण्यात
चव आणण्या नव्याने


🎭 Series Post

View all