# रहस्य कथा
राजेशने पुढच्या भेटीतच सारिकाला लग्नाचं विचारून टाकलं. तिलाही तो आवडला होताच. एक दिवस त्यांनी लग्नाचा निश्चित करून लग्न करून घेतले.
लग्न झाल्यानंतर सारिकाने एक दिवस राजेशला आपल्या घरी नेलं. तसें तिच्या घरी कुणी नव्हते. तिला आई नाही ना वडील नाही. एकटीच आपली रहात होती.
तिचे घर पार गावाबाहेरच्या एका कोपऱ्यात होते. तिकडे रिक्षावालाही कोणी फिरत नसायचा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर दुसरे गाव होते. रिक्षावाले ही अर्धा किलोमीटर अंतरावर सोडत होते. विचारलं तर सांगत असायचे की आम्ही त्या घरापर्यंत जात नाही म्हणून तेव्हा मात्र राजेशला हे काही समजले नव्हते.हें असे का म्हणून...?
नेमके असे काय होते त्या घरात की कोणी तिकडे जायला घाबरत असायचे..? तसं घराकडचा रस्ता थोडा ओसाडच होता. रहदारी नव्हती, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बाभळाची दाट काटेरी झाडे होती.
छोटस चार-पाच खोल्यांचं घर होते ते. घर कसलं जुन्या दगडाचा छोटासा बंगलाच होता तो. अगदीच पुरातन काळात असलेल्या दगडांनी चिरेबंदी बांधलेला. चार ही बाजूंनी मस्त मोकळ अंगण आणि त्या भोवतीचे ते झाडांचे कुंपण. खरं तर राजेशला ते बिलकुल आवडल न्हवते. येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या थकल्या भागलेल्याला तर दोन तीन मिनिट एखाद्या झाडाखाली विसावास घ्यावासा वाटला तर त्याला आत तरी येता यायला नको म्हणून घराच्या बाजूस काटेरी झाडें लावलेले.घर तर अतुन आलिशान होते. पण बाहेर तितकेच भयानक दिसत होते. लग्न झाल्यानंतर अगदीच कुंपण नाही पण ते फाटुक तरी काढायला पाहिजे असं त्याला वाटत होते. आत येताच त्याला तो आतला परिसर अतिसुंदर जाणवला.
"आssहा कसल सुंदर घर आहे गं तुझं...? आणि इथे तर काही असं घाबरण्यासारखं दिसतही नाही फक्त तो अर्धा किलोमीटरचा रस्ता सोडला तर... राजेश सारिकाला म्हणाला.
" काय गं सरू....तुझे हें घर तूझ्या बाबांनी इतक्या दूर का गं बांधले...? नाही म्हणजे अगदीच गावाला सोडून आहे म्हणून विचारल. इकडे अगदीच शांत वाटते कुणी दिसत नाही. कसला आवाज नाही, कुणी येत नाही जात नाही. मग तुला कसे गं जमते इकडे रहायला...?"
घराच्या फाटकाच्या जवळच एक लाकडी झोपाळा टांगलेला होता. त्याच्याच पलीकडे एक भले मोठे अवाठव्य झाड होते आणि तेही विस्तीर्ण पसरले होते. त्याच्याकडे बघितल्यावर जणू काही वाटत होते की ते त्याच्या कवेत घेऊन गिळणार की काय..? नेमके ते झाड कुठले असावे हेच समजतं नव्हते.
ते दोघी आत आल्यावर ते लाकडी फाटुक आपोआप बंद होत होते. बहुतेक बाहेरून हवेचा झोत आला असावा त्यामुळे ते आपोआप बंद होत असावे.
बघताच क्षणी अतिवेकाने वाऱ्याचा झोत आत आला, आणि त्या भल्या मोठ्या अवाढव्य झाडाच्या फांदया सळसळ करू लागल्या. काही तरी विचित्र घडणार असावे असे वाटतं होते. पण त्या वाऱ्याच्या झुडकीन त्याचा जिवात जीव आला होता.
सारिकाने आत जाऊन हॉल मधले लाईटचे बटण दाबले, तसें लाईट लागली. त्याच क्षणी समोर ठेवलेल्या तीन सुंदर मुर्त्या त्याच्या नजरेत पडल्या. दिसायला अतिशय सुरेख त्यांना बघून असे वाटे की त्या फार पूर्वीच्या असाव्यात. त्यांना पाहून राजेशला त्यांना घेऊन जाण्याचा मोह अनावर झाला. त्याने लगेच सारिकाला सांगितले.
"अगं सरू, किती सुंदर आहेत गं ह्या मुर्त्या..!आपल्या घरी नेऊ आपण, ज्या घरी आपण रहाणार आहोत ना तिकडे अति सुंदर दिसतील ह्या. "
"हो ना... खरं आहे तुझे. त्या कुणाला नाही आवडतं बघ ना...कुणीही घरी आले की त्यांना त्या आवडतात. पण मी आजवर कुणाला देऊ दिल्या नाहीत. "खरं तर त्यांचे रहस्य फक्त सारिकालाच माहित होते.
त्यांच्या सुंदर दिसण्या मागे काही तरी खास असे रहस्य होते.
सारिकाने जातांना त्याला त्या तीन मुर्त्या देऊन टाकल्या, आज तेथून विनशाला सुरवात होणार होती. सैतानाला आज परत एकदा कुणाचा तरी बळी घ्यायची वेळ जवळ आली होती.
*********
लग्नझाल्या नंतर काही दिवसांनी राजेश आणि सारिका त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये रहायला आले होते.
असेच एके दिवशी सकाळची ती कोवळी किरणे सारिकाच्या रेशमी केसांवर पडत होती. त्या किरणात न्हाऊन निघालेले तिचे ते सुंदर असे रूप राजेश एका कानिवर अंग करून बेडवर झोपल्या झोपल्या न्हाळत बसला होता. झोपेतून उठतांना ही एखादी स्त्री एवढी सुंदर दिसत असावी का... खरं तर ती होतीच सुंदर पण त्या सुंदरते मागे खुप काही गुपित रहस्य होते.
**********
कथेचा पुढील भाग क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
**********
काय असेल तिच्यात सुंदरते मागचे रहस्य...? आणि काय असेल त्या मुर्त्यामधील रहस्य...?
बघूया कथेच्या पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा