# रहस्य कथा
झोपेतून उठतांना ही एखादी स्त्री एवढी सुंदर दिसत असावी का... खरं तर ती होतीच सुंदर पण त्या सुंदरते मागे खुप काही गुपित रहस्य होते.
********
राजेशने त्या तीन मुर्त्या आपल्या घरात आणून ठेवल्या होत्या. एके दिवशी एके रात्री तेव्हा सारिका आपल्या मैत्रिणीकडे गेलेली असते. त्या दिवशी रात्री तो ऐकटाच होता. बाहेर गळद अंधार पडलेला होता आणि त्यातच तो रातकिळ्याचा आवाज सर्वत्र रात्र भंग करत होता. राजेश आपल्या बेडरूममध्ये ऐकताच झोपून होता. अचानक त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. तसा तो दचकून उठला. जवळच असलेला टेबल लॅम्प लावला. जवळच्या खिडकीजवळ कोणीतरी हालचाल करताना त्याला दिसले.
"कोण असावे बरे एवढ्या रात्री...?बघू तर...!"
हळूच जाऊन खिळकीचा पडदा बाजूला सरकावला. समोरचे ते पिंपळाच्या झाडाच्या फ़ांद्या गदागदा हालत होत्या तिकडे कुणी असल्याचा भास होत होता. एकंदरीत वातावरण खुप भयाण दिसत होते पण तसें काहीच न्हवते. त्याने परत पडदा ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याची नजर समोर एका स्त्रीवर गेली. ती तश्या वातावरणात एकटीच रस्त्याने चालत होती. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेता तिच्या सोबत आणखी कुणी असावे. थोड्याच अंतरावर एक लहान बालक रडत होता. ती त्याच्याकडेच जात असावी. चालता चालता ती मधेच थांबत होती. आपल्या बाळाला आवाज देत होती. कदाचित ती त्याला शोधत असावी. तिच्या आवाजाने बाळ आणखीनचं रडून लागले. तसा त्याच्या रडण्याचा अंदाज घेत ती त्याच्या पर्यत येऊन पोहोचली. कोण असावी ती स्त्री...? आणि एवढ्या रात्री काय करत असावी इकडे एकटीच...? राजेशच्या बेडरूमचा लाईट अचानक बंद झाला.तसें त्याने मागे वडून बघितलं तर त्याला जाणवलं आपल्या खोलीत कुणीतरी आहे. परत एक नजर खिळाकीतून बाहेर टाकली. ती स्त्री कुठे गेली असावी...? पण ती आता त्याला दिसेंनाशी झाली होती आणि ते बालक ही...
आत्ता तर राजेशला आणखीनच भिती वाटू लागली. जे काही त्याच्या अवतीभवती होते ते अगदीच त्याच्या जवळ येऊन पोहोचले होते. अचानक एक हात मागून त्याच्या खांद्यावर पडला तसा तो दचकला . आता तर त्याला मागेवळून बघायची ही भिती वाटतं होती. क्षणभर ते स्वप्न असावे की खरे खुरे... नाही हें स्वप्न नाहीच. नक्कीच काही तरी आहे. पण नेमके काय..? याचा अंदाज तो लावू शकत न्हवता. भर थंडीत ही त्याला दरदरुन घाम फुटला होता. तो बाथरूमच्या दिशेने जायला लागला. तो दरवाजा उघडणार तोच त्याला बाथरूममध्ये भयानक असे काही दिसलें.त्याने बाथरूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला, चेहरा धुण्यासाठी तो बेसिंगजवळ आला हळूच अलगत नळ फिरवला तर नळातून रक्त येत होते. ते बघून तर तो आणखीनच घाबरला. बेडरूममध्ये धावत जाऊन त्याने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. अंगावर ब्लॅंकेट ओढून गच्च डोळे लावून घेतले. खरं तर डोळ्यात तेव्हा झोप न्हवतीच पण थोड्याच वेळात सकाळ होणार होती. हा भयानक प्रकार तो सारिकाला आणि रिताला सांगतो पण त्यांना हें खोटेच वाटत होते. असेच दिवसामागे दिवस निघून गेले.
त्याला एक दिवस सारिका त्या मुर्त्याशी बोलतांना दिसते. पण त्याला वाटते की ती अशीच टाइमपास म्हणून बोलत असावी. त्या मुर्त्यांना तिचे बोलणे सारे काही समजतं होते. त्या तीन मुर्त्यामध्ये एक मूर्ती एका स्त्रीची होती, दुसरी एका लहान गोंडस बाळाची आणि तिसरी होती एका मुलीची. त्या मुर्त्याच्या मागे एक रहस्य होते ते म्हणजे त्यानं चा निघून गेलेला भूतकाळ त्या थोड्या वेळाकरिता जगत होत्या. खरं तर त्यांचा विनाश पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्तीकडून निश्चित होता.
त्या मुर्त्यांना खरोखरची केस होती. तसेच नीट निरखून पाहिलं तर त्यांना नखें देखील होती. त्यांच्या डोळ्यांना एक अनोखी चकाकी होती. बघितल्यावर वाटे की त्या आपल्याकडे टक लावून बघत असाव्यात.
*********
कथेचा पुढील भाग क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
**********
काय असेल तिच्यात सुंदरते मागचे रहस्य...? आणि काय असेल त्या मुर्त्यामधील जिवंत होण्याचं रहस्य...?कोण असेल ती स्त्री आणि ते बाळ...? जाणून घेण्यासाठी वाचत रहा कथेचा पुढील भाग...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा