अर्धा कप चहा
सकाळ होताच त्यांची सगळ्यांनी घाई सुरू झाली..
सासूबाईने आवाज दिला, मंगल अग आता सगळ्यांचा चहा ठेव आणि बाकी उद्योग लवकर लवकर उरकून घे..
मंगल स्वतःच्या चहासाठी तयारी करत असताना सासूबाईने जे सांगितले ते ऐकून आधी सर्वांसाठी चहा ठेवायला गेली आणि चहा ठेऊन उकळी आल्यावर आधी सासऱ्यांचा काळा बिना साखरेचा चहा बाजूला ओतला ,मग त्यात साखर टाकून एक कप काळा अद्रक वाला चहा सासुसाठी बाजूला काढला ,मग दूध घालून दोन कप नवरा आणि दिर यांना ओतला...आणि शेवटी जास्त पत्ती वाला कडक चहा आजेसासू ला ओतला...
नवरा तितक्या समोरच्या खोलीतून बाहेर आला ,त्याला चहाच्या वाफा पाहून आणि बायकोचा चेहरा पाहून चहा लगेच घ्यावा वाटला...आज खास झाला आहे चहा ,असाच रोज करत जा...नाहीतर रोज काही ना नाही कमी असतेच ,त्याने तिच्या मूड कडे बघून मुद्दाम टोमणा मारला..
ती रागात बघू लागली ,रोजच असाच तर चहा होत असतो ,रोज हेच म्हणत असतोस हे बोलून तुला काय रे अघोरी आंनद होतो.? तुला कधी तरी वाटते का सगळ्यांना चहा देणारी बायको ती कधी चहा घेत असेल..? ती कधी निवांत चहा घेत असेल..? तुला तर स्वतःच भागलं ,स्वतःच्या घरच्यांचे भागले सगळ्यांनी चहाचे छान कौतुक केले म्हणजे भारी वाटते...उगाच कॉलर टाईट होते..माझ्या बायकोने केला आहे म्हणते फुशारकी मिरवतोस.. पण त्यामागे कधी तरी स्वयंपाक घरात रोज सगळ्यांचे थाट पुरवणारी ही स्वयंपाकिन कधी चहा घेते ह्याची खबर घेतली आहेस का कधी..? तेव्हाच खरी कॉलर टाईट कर...खरे तर ती काय करते ,कधी कसा चहा घेते ,तिला कसा चहा आवडतो..हे कधी जाणून घेतले आहेस का तू ??? पण इथे तर आई खुश ,बाबा खुश ,भाऊ खुश ,आजी खुश हीच एक मोठी गोष्ट आहे तुझ्या लेखी...असू दे मला तुला सांगण्यात आता कसला ही रस नाही...तू त्यांना खुश ठेव ,मी त्यातच खुश..?
त्याने लगेच तिच्या रागाला डावलून परत मुद्दाम तिला आवाज दिला ,अग आईचा चहा झाला का ? बाबांचा चहा झाला का ?? दादाचा चहा झाला का ?? आजीचा चहा झाला का ?? माझा ही घेऊन येतेस का..?
तिला आता पटले की नवऱ्याला किती ही मनातले सांगा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही ,मागे ही झाला नाही..? ज्याला सांगून ही कळत नाही त्याला आपले भाव ,आपले मन ,आपले दुःख ,आपल्या वेदना काय कळतील ?? त्याचे संपूर्ण आयुष्य तर घरातले खुश तर मी खुश ह्याच एका गोष्टीवर आधारलेले आहे ,ह्यांच्या कडून काही अपेक्षा करणे खरंच चुकीचे आहे...ओढून ताणून कोणी नवऱ्याचे प्रेम काळजी मिळवू शकत नाही हेच सत्य आहे..
तिने स्वतःचा चहा तयार करण्यासाठी ठेवलेले दूध पुन्हा पातेल्यात टाकून दिले आणि पुढच्या कामाला लागण्या आधी बाहेर बसलेल्या सगळ्यांना चहा देऊन आली.. नवरा तिच्या कडे बघतच होता ,तो तिचा चेहरा पडलेला आहे हे पाहून ही म्हणाला ,बघा तुमची सून आहे म्हणून तुमच्या चहाची काळजी केली जाते नाहीतर आई तुला आयुष्यभर कधी चहा वेळेवर मिळाला नव्हता...चहा तर सोड तू सगळ्यांच्या नंतर टोपल्यात उरलेली भाकर खाल्लेली मी पाहिली आहे...पण मी ठरवले आहे आजपासून सुधा ही आपल्या सोबत तिचा चहा घेत जाणार ,आणि जोपर्यंत तिचा कप इथे नसणार तोपर्यंत मी ही चहा घेणार नाही...आता सध्या तर तिने चहा आणला नाही पण जर माझा हा निर्णय पक्का आहेच तर आज आत्ता पासूनच ती आपल्या सोबत बसून चहा घेणार म्हणजे घेणार...हो ना आई..??
अरे हो आम्ही कुठे काय म्हणतो ,खरं तर सुनेने म्हणजे घरच्या अन्नपूर्णा देवीने स्वतःसाठी सर्वप्रथम चहा घेऊन मग आम्हाला द्यावा...मी सून होते तेव्हा नेहमी हेच म्हणायचे पण करणे कधी जमले नाही ,पण आता सुधा हे तुझ्या पासून सुरू करू आपण..आईने अशीच खोटी कथा जोडून दिली आणि सुनेचे मन राखले..
सासूबाई असे म्हणतात मुलगा म्हणाला ,आई तुझी आज्ञा आणि माझा ध्यास आजच पूर्ण होतील..
राहुदेत मला हे नकोय...मी माझ्या ठरलेल्या वेळेला चहा घेईल...
तिचा राग बघून लगेच त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्या कपतील अर्धा चहा रिकाम्या कपात ओतला...आणि तिला सांगितले आधी ,सर्वांच्या आधी तू चहा घेशील मगच आम्ही चहा घेऊ...देवीला चहाचे नैवेद्य पोहचला की मग आम्ही सुरुवात करू..
त्याच्या ह्या बोलण्यावर सगळे हसू लागले होते ,त्यांना ही प्रसंगाचे भान होते जाणीव होती म्हणून सगळ्यांनी मुलाच्या आणि आईच्या हुकुमाचे पालन केले होते..
असेच जर सर्व कुटुंब असतील तर मन मुटाव होणार नाहीत...कोणी तिला सांभाळून घेतले तर ती तर दुप्पट सांभाळून घेईल हो ना..
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा