अलक 1

अलक रचना
खूप दिवस वाटत होत की आपण अलक प्रकार ट्राय करावा म्हणून आज छोटासा प्रयत्न केला

अलक 1.

पूजेची लगबग चालली होती आज मंदिरात अभिषेक सुरू होता. ती मात्र आपल्या बाळाला शोधत होती. एकिकडून जोरात ओरडण्याचा आवाज आला त्या बरोबर ती त्या दिशेने गेली. तिथे अभिषेकासाठीच दूध ते भुक्यावलेल तीच दोन वर्षाच लेकरू पीत होत. बाकिचे मात्र संतापले आणि त्याला तिथून दूर ढकलू लागले तस तीने त्याला लगबगीने आपल्या जवळ घेतले व नंतर तीच ते दोन वर्षाच पोर मात्र तिच्या मांडीवर बसून शिवलिंगावर होणारा दुधाचा अभिषेक पाहून डोळ्यांनीच आपली भूख मिटवू लागल.

🎭 Series Post

View all