अलक क्र 3

अलक रचना
अलक - 3

वृद्धत्वाने जखडलेल्या आजाराने तो आज बिछान्यावर तसाच पडून होता.
त्याला भूक लागली तस आपल्या मुलग्याला आवाज दिला.
मुलगा ओरडत ओरडत आला व म्हणाला शांत बसू द्या ना कळत नाही का आमच काम चालू आहे आणि आम्ही जेवताना वाढतोच कि तुम्हाला जरा धीर धरत चला कि.
आज त्याला बिछान्यावर काही वर्षांपूर्वी पडलेल्या त्याच्या बाबांची आठवण झाली व त्यांना किती वेदना झाल्या असतील याची जाणीव झाली.

©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी

🎭 Series Post

View all