रिंकी तिला पाणी आणायला जाते आणि तिला पाणी वाजते
राधिका :(रडतच )स्वप्नील कुठे मला त्याच्याकडे घेऊन चला.....
माधुरी : हे बघ राधिका जे झालं ते झालं आता स्वप्निल मात्र त्याच्या होश मध्ये नाही आहे तो जे काही बोलेल ते प्लीज शांतपणे ऐकून घे
राधिका : अग पण जी गोष्ट घडलीच नाही ती मी का माणू मी खरच काही केलं नाही ....स्वप्नील ची शपथ.... ते सगळं जाऊ द्या तुम्ही सगळ्या मिळून मला आधी त्याच्याकडे घेऊन चला...
( सगळ्या मैत्रिणी एकत्र राधिकाला सांभाळत जिथे मुलं असतात त्या रूममध्ये घेऊन जातात)
राधिका : स्वप्निल ...स्वप्निल (असा आवाज देत रूममध्ये शिरते)
स्वप्नील रागाने राधिका कडे बघतो तशी राधिका पळतच त्याच्याजवळ येते आणि त्याच्या हाताला धरते
हे बघ स्वप्नील तू इथे .....इथे जे काही बघितलं ते सगळं खोटं होतं ...मी खरच काही नाही केलं इंनफॅक्ट मला स्वतःला नाही माहित मी इकडे कशी आली निदान तू तरी माझ्यावर भरोसा ठेव
नम्रता : हे बघ राधिका जे झालं ते झालं निदान आता तरी तु एक्सेप्ट कर की तुझ्याकडून चुकी झाली ....आहे( नम्रता च बोलणं ऐकून राधिकाला तिचा राग येतो आणि ती नम्रता च्या जवळ जाऊन एक सणसणीत तिच्या कानाखाली लावते)
राधिका : तू काय बोलतेस याच्यावर तरी तुझं लक्ष आहे की नाही जी गोष्ट मी केलीच नाही त्याला मी होकार का देऊ अरे निदान तुम्ही सगळे जण माझ्यावर विश्वास ठेवा संदीप तू तरी काहीतरी बोल.....
संदीप :(हात जोडत स्वप्नील जवळ येतो )....हे बघ मित्रा मि तुझी शपथ घेऊन सांगतो आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही घडलं इकडे जे काही घडलं ते मला नाही माहिती कोणी केलं आणि का केलं पण निदान तु तरी आपल्या मैत्री वरती विश्वास ठेव अरे राधिका खरं बोलते मला अजून पण विश्वास होत नाही हे ज्याने कोणीही केलं असेल त्याचा त्याच्या मागचा काय हेतू होता (रडतच बोलतो)
स्वप्निल रागातच त्याची परत कॉलर धरतो मला याआधीच नंबर त्याच्या बोलण्यावर ती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मीच त्याच्याकडे कानाडोळा केला ती मला खूप आधीच बोलली होती खूप वर्षाआधी लक्षात आहे ना तुझा की तू राधिकाच्या मागे लागला होता म्हणून काय रे किती वर्ष झाली तुम्हाला असं रिलेशन मध्ये राहून बोल ना आता का चूप आहेस म्हणजे माझ्या बरोबर पण खायचं आणि याच्या बरोबर पण राहायचं...... हे बरं जमतं तुमच्या दोघांना
तृप्ती : हे बघ स्वप्नील तू आता जे काही बोलतोय ते सगळं रागाच्याभरात बोलतो ...तु थोडा विचार कर त्याच्यामागे नक्की कोणी ना कोणी मिळेल तुला (नम्रता कडे बघतच बोलते)
सचिन : बरोबर बोलते तू खरंच थोड्यावेळ शांत हो तू जरा शांत राहिलास तर तुला नक्की याच्यावरती मार्ग मिळेल
तृप्ती : मला माहिती हे सगळं कोणी केलं( रागाने नम्रता कडे बघते) ही नम्रता हिनेच हे सगळं घडवून आणलंय......मी ही आल्यापासून बघते.....मला जरा पण हिच्यामडे बदल नाही दिसला.......हे सगळं.... तिचं कारस्थान आहे ....बोल खरं आहे का नाही नम्रता
नम्रता: हे सगळ खोट आहे ....आणि मी का करू हे सगळं मला जर करायचं असतं तर खूप आधीच केलं असतं..... आजच का करू मी हे सगळं..... स्वप्निल ह्या लोकांवर विश्वास ठेवू नको हे लोक परत मला खोटं ठरवतायेत ....आता तर तू सुद्धा डोळ्यांनी बघितलास मी तुला याच्या आधी पटवून देण्याचा प्रयत्न केला .....पण तू माझा ऐकलं नाहीस..... ही राधिका खोटारडी आहे एक नंबरची खोटारडी .....ही तुझा ही वापर करत होती ......मला तुझ्यावरती दया येत होती रे पण काय करणार माझ्या हातात काहीच नव्हतं.... पण आता बघ सगळं काही तुझ्यासमोर बर आहे तूच ठरव काय करायचं ते
राधिका : ( रागाने नम्रता कडे बघते )ती परत स्वप्निल समोर उभी राहते हे बघ स्वप्नील मी खरंच बोलते आमच्या दोघात असं काहीच घडलं नाही ......तू ....तु ही च्यावर विश्वास नको करूस एवढ्या वर्षे आपण सोबत राहिलो तुला कधी माझ्यावर संशय तरी आला का रे मग मी आज का करेल अस......( बोलता बोलता ती स्वप्नीलचा हात हातात घेते स्वप्नील रागाने तिचा हात झटकतो)
स्वप्निल : बरोबर बोलतेस तू राधिका खूप विश्वास केला मी तुझ्यावर कधीच मला तुझ्यावरती शंका नाही आली कारण आंधळ प्रेम होतं माझं तुझ्यावरती आणि तू काय केलंस एका क्षणात ते पाण्यामध्ये मिसळलं काय मिळालं तुला हे सगळं काय कमी होती माझ्यामध्ये का तुला माझ्यापासून काही मिळत नव्हतं जे तुला संदीप कडून मिळते (हे असं ऐकताच राधिका जोरात स्वप्निलच्या कानाखाली मारते)
स्वप्निल: माझ्या कानाखाली मारून काय मिळणारे तू माझा विश्वास घात केला
राधिका : स्वप्नील तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोय...…. ह्या क्षणाला मला तुझ्या विश्वासाची गरज आहे आणि तु चक्क माझ्यावरती अविश्वास दाखवतोय एवढ्या वर्षाचा विश्वास गेला कुठे तुझा..........
स्वप्निल आता तू याच्या पडून माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस तुझ आणि माझं नातं संपलं आणि तो तिथून निघून जातो त्याच्या मागून नम्रता सुद्धा निघून जाते राधिका जागीच कोसळते सगळे मित्र मिळून तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात
@@@@@@@@@@@@@@@@
स्वप्नील हेच सर्व स्वप्न बघून आपला चेहरा लपवून रडत असतो नम्रता हे लांबूनच बघत असते पण तिला काहीच कल्पना लागत नाही की हा आज असा अचानक का वागतोय ....स्वप्निल तसाच झोपून जातो
@@@@@@@@@@@@@@
राधिका घरी येते पण तिने आज मनामध्ये फक्त केलेला असतो काही झालं तरी माझा आणि स्वप्नील मध्ये जे काही झालं ते आईला कळता कामा नये म्हणून ती खोटं खोटं हसू आणते तिच्या चेहऱ्यावरती.......
आज स्वराज तिची वाट बघत बसलेला असतो त्याला त्याच्या मम्मा बरोबर भरपूर गप्पा मारायचे असतात
राधिका जोशी घरी येते तसा स्वराज तिला जाऊन बिलगतो
स्वराज : मामा आज मी नाही झोपलो मला तुझ्या बरोबर भरपूर बोलायचं आहे ...
मीनाताई : अरे थांब मम्माला आधी हात पाय तरी धुवु दे .....ती जरा फ्रेश होईल मग तुला हवेत तेवढ्या गप्पा मार.....
राधिका हसतच फ्रेश होण्यासाठी निघून जाते.........आज ती स्वराज बरोबर भरपूर गप्पा मारते....स्वराज तिला त्याच्या स्कुल मध्ये झालेल्या गोष्टी सांगतो.....ती सुद्धा त्याला खूप काही गोष्टी सांगते...........सगळे मिळुन जेवम करतात....आज राधिकाला खुप दिवसानी अस मन भरुन हसताना बघून मिनाटना सुद्धा बरं वाटत...
राधिका : आई ....तु आज स्वराज बरोबर झोप....मला थोडं काम आहे......
मीनाताई : ठिक आहे....पण जास्त वेळ नको जागी रहाऊस........
राधिका शांतपणे तिच्या खोलीत लॅपटॉप वर काम करत असते.......तेवढ्यात तिला तिचा भूतकाळ आठवतो
स्वप्नीलने तिच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केलेली असते......
त्या गोष्टीला घडून जवळपास एक महिना उलगडून जातो स्वप्निल सारखा राधिकाची आठवण काढून रडतच बसायचा....त्याच्या आई वडिलांना पण त्याच वागणं समजत नसे......तो कुणाला काहीच सांगत नसायचा..... त्याने त्याच्या बँक मॅनेजर ला काही कारण सांगून पुण्याला ट्रान्सफर करून द्या याची मागणी केली...... इथे राधिका ची तब्येत सुद्धा थोडी खालावलेली असते अशातच तिच्या वडिलांना हार्ट अटॅक येतो आणि ते त्यांना सोडून जातात राधिका साठी ही गोष्ट पचवणं खूप जड जात कारण तिच्याबरोबर आज तिचा जोडीदार नसतो...... स्वप्नील च्या मित्रांनी त्याच्यापर्यंत राधिकाच्या वडिलांची गोष्ट पोहोचलेली असते पण तो त्यालासुद्धा इग्नोर करतो तो तिला जरा पण दिलासा द्यायला येत नाही....
राधिका च्या वडिलांना जाऊन दोन महिने झालेले असतात असा अशातच अचानक राधिकाला मळमळायला लागत राधिका च्या आईला तिच्यावर थोडा संशय येतो ते दुसऱ्या दिवशी राधिका ला घेऊन डॉक्टर कडे जाते आणि जी गोष्ट घडायला नको होती तीच घडते..... राधिका प्रेग्नेंट होते.... राधिकाला माहिती असतं हे मूल स्वप्नीलचा आहे ते.... तिची गोष्ट स्वप्निल ला सांगण्यासाठी जाते पण स्वप्निल मात्र हे मूल त्याचं नाही संदीपचा आहे असं बोलून तिथून निघून जातो
राधिका ची आई राधिका ला सगळं काही विचारते..... राधिका स्टार्टिंग पासून घडलेली एक एक गोष्ट तिच्या आईला सांगते ....राधिकेच्या आईला सुद्धा खूप वाईट वाटतं काही झालं तरी ती तिची मुलगी होती ....स्वप्निल ने मात्र तिच्यावरती असा अविश्वास दाखवणे योग्य नव्हतं
.......
मीनाताई : हे बघ राधिका .... जे झालं ते झालं स्वप्निल ने मात्र तुझ्याबरोबर असं नव्हतं करायला पाहिजे पण आता पुढचं काय डॉक्टरने सांगितले तुला चौथा महिना चालू झाला आहे त्यामुळे अबोषण पण नाही करू शकत इकडे जर राहिलो तर सगळ्या लोकांना कळेल..... आणि नाहीतरी आपल्याला ही खोली खाली करायचीच आहे मग लवकरात लवकर करून घेऊ नशीब तुझ्या बाबांनी आपल्या साठी सोय करून ठेवलेली आधीच
राधिका : हे तू काय बोलते आई ह्यात त्या बाळाची काय चुकी चुकी तर स्वप्नीलची आहे ना त्याने माझ्यावरती विश्वास नाही केला त्याला नम्रता जवळची वाटली ची गोष्ट माझ्याबरोबर घडलीच नाही त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला.... तू म्हणतेस ते बरोबर आहे आपण जिथे बाबा ने खोली घेऊन ठेवलेली आहे तिथे जाऊया राहायला निदान माझ्यामुळे तुझी तरी बदनामी नाही होणार आणि राधिका मीनाताई च्या कुशीत रडायला लागते.....
राधिका : तिच्या प्रेग्नेंसी ची न्यूज तृप्ती रिंकी माधुरी उज्वला संदीप बाबू आणि सचिन यांना सगळ्यांना सांगते आणि हे मूल स्वप्नीलचा आहे हे सुद्धा सांगते पण ती परत सगळ्यांना शपथ घालते की त्याला काही सांगू नका कारण ज्या माणसाने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तो उद्या जाऊन माझ्या मुलाला पण काही बोलेल त्याला नाही फरक पडणार तो उद्या माझ्या मुलाचा आहे चारित्र्यावर संशय घेऊ शकतो...... सगळ्याच मैत्रिणीने मित्रांनी राधिकाला समजवण्याचा प्रयत्न केला की एकदा तरी तू स्वप्निल बरोबर बोलून बघ पण ती तयार नव्हती त्यामुळेच सगळेजण नाव काहीच बोलायला तयार नव्हते...... थोड्याच दिवसाने राधिका तिच्या वडिलांनी घेतलेल्या घरात राहायला जाते तिचं मन तर काही लागत नाही तिला नेहमी स्वप्नीलची आठवण येत राहते .....तिचं मन हलकं करण्यासाठी तिचे मित्र-मैत्रिणी तिच्यासाठी वेळ काढून येत जात होते ......तिची आई तिला नेहमी दिलासा द्यायची ....₹आणि नेहमी देवाकडे प्रार्थना करायची की लवकरात लवकर तिच्या पोटातल्या बाळाला त्याचे वडील मिळू दे...
राधिका च मन शांत राहावं म्हणुन मीनाताई च्या सांगण्यावरून तिने केक बनवायचे क्लासेस लावले तिचं तिथे मन लागायला लागलं ती हळूहळू रमू लागली अशातच तिला सातवा महिना लागला तिच्या आईने कोणालाही न कळता तिचं ओटीभरण केलं त्या ओटी भरणात फक्त तिचे मित्र मैत्रिणी होते....
अशातच राधिकाला बाहेरून कळत की स्वप्निल ने नम्रता बरोबर लग्न केलेला आहे तेसुद्धा कोर्ट मॅरेज याची कल्पना कोणत्याच मित्र-मैत्रिणींना नव्हती आणि तो असं काही करेल ही सुद्धा कल्पना नव्हती........... ही न्यूज ऐकून..... राधिकाला भोवळ येते आणि तिथेच चक्कर येऊन पडते..... राधिका चा बीपी वाढतो मीनाताई ला काहीच सुचत नाही की काय करावा आणि काही नाही ती अशाच बाबुला फोन लावते आणि घरात घडलेली सगळी घटना सांगते......
बाबू लगेच येऊन राधिकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो.......
डॉक्टर : राधिकाची हालत जर नाजूक आहे .....आम्हाला लगेच ऑपरेशन करावं लागेल........तुम्ही ह्या फॉर्म वर सही करा.....आम्ही ऑपरेशन ची तयारी करतो......
मीनाताई :( रडतच ).... काही करा डॉक्टर पण माझ्या राधिकाला वाचवा....खूप दुःख सोसलेत तिने ....तिच्या शिवाय कोणी नाहीये माझं ह्या जगात.......
बाबू तेवढ्यात सगळ्या फ्रेंड्स ला कॉल करून बोलावतो......सगळे मित्र हॉस्पिटलमध्ये पोहोचतात...
रिंकि : राधिका काशी आहे........(काळजीत )
बाबू : ऑपरेशन सुरू आहे तीच.....तिची तब्बेत जरा नाजूक आहे असं डॉक्टर बोलेत....
सगळ्या मुली राधिकाची आई जवळ बसतात....त्यांना धीर देतात......कमीतकमी एका तासानंतर..... बाळाचा आवाज येतो.....तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो......तसे सगळे राधिकासाठी काळजीत सुद्धा असतात.....
नर्स बाळाला आधी बाहेर घेऊन येते........आणि त्याचा आजीच्या हातात देते
नर्स : मुलगा झाला ..... काँग्रॅच्युलेशन....पण हे बाळ सातव्या महिन्यातील आहे त्यामुळे ह्याला आम्ही काचेच्या पेटीत ठेवू......तुम्ही सगळे लवकर बघून घ्या.....
मीनाताई बाळाला हातात घेतात तसा त्यांचं मन गहिवरून येतं त्या हळूच त्याच्या माथ्यावरती त्यांचे ओठ टेकवतात....
सगळे मित्रमैत्रिणी बाळाला बघून खुश होतात......सगळे जण भावुक होतात......
थोड्याच वेळात नरसी येऊन बाळाला घेऊन जाते
संदीप : मी काय म्हणतो काकू ही गोष्ट आपण स्वप्निल ला सांगू या का .....????
मीनाताई : मला पण असं वाटतं की त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या...... पण मला हे नाही वाटत की तो ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास करेल आता सध्या परिस्थिती खूप वेगळी आहे पहिलं माझ्या मुलीला बाहेर येऊ द्या तिला विचारून सगळं काही करूया
थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतात आता राधिका ची तब्येत स्थिर आहे म्हणून सांगतात पण तिला कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव पडून देऊ नका याचीही काळजी घ्यायला सांगतात........
डॉक्टर पेशंटला कमीत कमी पाच दिवस इथे राहावं लागेल सिजर असल्यामुळे थोडा विकनेस पण आलेला आहे पण ती लवकरच रीकव्हर होईल..... आणि बाळाचा म्हणाल तर ते सातव्या महिन्यातला असल्यामुळे त्याला आम्ही काचेत ठेवलेला आहे बाळ स्वस्थ.....आहे काही काळजी करायची गरज नाही
( डॉक्टरचा बोलून झाल्यावर ते मीनाताई देवाला हात जोडून त्यांचे आभार मानते)
पाच दिवसानंतर राधिकाला घरी आणतात ती बाळाला बघून खूप खुश असते कुठेतरी तिच्या मनात सलत होतं जर हे बाळा स्वप्निल चा आहे हे जर त्याला कळलं असतं तर तो आपल्या सोबत असता कि नसता पण तिने तो आता विचार करणं सोडून दिला कारण तिला फक्त आणि फक्त तिची तिची आई आणि तिच्या बाळाचा विचार करायचा होता त्यामुळे तिने स्वतःला त्याच्या मध्ये झोकून दिलं होतं...... राधिका चं बाळ जसजस मोठ होत होत.... ती स्वतह्ला सावरत होते तसं बघायला गेलं तर राधिका मध्ये बराच बदल झालेला होता तिने स्वप्निल ने सांगितल्याप्रमाणे तिच्या बाळाचं नाव स्वराज्य ठेवलं होतं...... स्वराज अगदी त्याच्या वडिलांसारखा दिसत होता त्याच्या वागण्यात काहीच फरक नव्हता जसे त्याचे वडील स्वप्नील तसाच असतो राधिकाला ते बघून फार आनंद व्हायचा तिने आता स्वप्निलच्या आठवण काढणं कधीच सोडून दिलं होतं पण न जाणे तिच्या आयुष्यात पुढे काय लिहिलं होतं.....
(काय मग वाचकांनो कसा वाटला आजचा हा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे आता याच्यापुढे पाहूया स्वप्निल आणि राधिका कसे एकमेकांना सामोरे जातात .....स्वप्निल ला कळेल का स्वराज्य आत्याचा मुलगा आहे आणि नम्रता ने चालवलेली चाल स्वप्निलच्या लवकरात लवकर लक्षात यावे यासाठी त्याचे मित्र-मैत्रिणी काही करतील बघूया पुढच्या भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा