Login

अविश्वास त्याचा(पार्ट 7)

अविश्वास त्याचा (पार्ट 7)

राधिका शांतपणे तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून घेते ती पुन्हा तिच्या भूतकाळामध्ये जाते

भूतकाळ

( काहीच दिवसांमध्ये स्वप्निल चे पेपर संपतात..... रात्रीच्या वेळेस सगळेच मित्र घोळका करून मैदानामध्ये बसलेले असतात तेव्हा आनंदाने स्वप्निल त्या मित्रांमध्ये येतो ....स्वप्निल ला येताना पाहून राधिका च्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो हे सगळे जण पाहतात पण कोणी बोलून दाखवत नाही)

बाबू : अरे आलास तू कसे गेले तुझे सगळे पेपर काही अडचण तर नाही आले ना

स्वप्निल : अरे नाही रे काहीच नाही खूप छान पद्धतीने पेपर गेले( स्वप्निल सगळ्यांशीच बोलत असतो पण तो राधिकाला एकाही नजरेने बघत नाही....... त्यामुळे राधिका थोडी नर्व्हस होतो)
 
( नम्रता हळूच स्वप्निल च्या बाजूला जातो तेव्हा सगळ्यांची नजर चुकवून)
नम्रता : स्वप्निल आम्ही तुला सगळ्यांनी..... खूप मिस केलं तू ग्रुप मध्ये नव्हता तर ग्रुप अक्षरशा खाली खाली वाटत होता....

तृप्ती : (थोडी रागातच) आमच्यापेक्षा जास्त तर नम्रताच तुझी आठवण काढत होती हो की नाही नम्रता......

माधुरी :तुझे पेपर चांगले गेले ना बस अजून काहीच नको आम्हाला आता तर तू फ्री झाला ...पुढे काय विचार केलास काय करणार काय नाही......

स्वप्निल : चांगले टक्के पडले ना माधुरी तर मग मी मग आर्ट्स घेईल कारण नाही तरी मला सरकारी जॉब साठी ट्राय करायचे.....

माधुरी:  अरे वा चांगली गोष्ट आहे मग तू बाहेरून एमपीएससी का नाही करत तू पोली सुद्धा होऊ शकतो ना.......

स्वप्निल : नको नको मला पोलीस वगैरे नाही माहित मग तुला मी माझ्या घरी किती थकलेल काम असतं ते त्यापेक्षा दुसरं काहीतरी करेल जसे की बँक वगैरे...... अरे आज रिंकी नाही आली

नम्रता : नाही रे ती आज कुठेतरी बाहेर गेली ते सगळं सोड ना मला सांग तू उद्या फ्री आहेस का थोडा?????

( नम्रता च्या बोलण्याने बाबू जरा तिच्याकडे रागानेच बघतो)

स्वप्निल:  नाही ग उद्या मला जरा सिद्धिविनायक मंदिरात जायचे का काही काम होतं का तुझं माझ्याकडे????

नम्रता : नाही नाही तसं काही खास नाही ते सहजच विचारलं (थोडी एक्साईटेड होऊन बोलते)

तृप्ती : आजकाल खूप आनंदात असतेस ना तू नम्रता आम्हाला पण सांगशील तुझा आनंदी राहण्याचा राज( तोंड वाकडं करतच)

नम्रता तृप्ती तसं काही खास नाही ग आनंदी राहण्यासाठी काही कारणे नाही शोधावे लागत

उज्वला: नाही अस नम्रता ....जर तसं काही असेल तर नक्की सांग
(नम्रता सगळ्यांपासून काय लपवते ही गोष्ट फक्त आणि फक्त बाबुला माहीत असते)

नम्रता : ते सगळं जाऊ द्या  मी आता जरा घरी जाते मला उद्या जरा महत्वाचं काम आहे (आणि नम्रता तिकडून निघून जाते)

बाबू : नम्रता गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नम्रता आपल्यापासून काय लपवत होती ते

( सगळे नकारार्थी मान हलवतात)

बाबू : अरे यार उद्या आपल्या स्वप्नील चा वाढदिवस आहे म्हणजे बर्थडे आहे त्याचा बर्थडे (आनंदात सगळ्यांना सांगतो)

उज्वला :  मग त्याला आता विचारलं तर त्याने आपल्याला का नाही सांगितलं?????


सचिन : ये येडाबाई त्याचा वाढदिवस तुला वाटतो तो  सांगेन आणि असं कोण सांगत ग आपला वाढदिवस.......
उज्वला : हा ते तर बरोबर आहे मग .....मग मला का असं वाटतं नम्रताला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या

माधुरी : असेल तिला माहित नाही तरी आजकाल ती तिच्या दुनियेत भरपूर असते ते ......न जाने काय झालं तिला

राधिका :  (आनंदाने) मग उद्या काहीतरी सरप्राईज ठेवूया ना त्याच्यासाठी.....

उज्वला:  अरे वा कोण बोलतोय बघा हा हा हा चांगला वाटला ऐकून तू त्याच्यासाठी काहीतरी विचार करतेस...... एक सांगून राधिका राग नको माणूस..... तुझ्या मनात जे चाललंय ना ते बोलून टाक उगाच असं नको व्हायला तुझी जागा दुसरं कोणतरी घेईल........(समजवतच)

राधिका : म्हणजे मला काही कळलं नाही तुला काय बोलायचे ते......????

सचिन हे बघ तुला सांगू आम्ही सगळेजण पाहतोय जेव्हापासून स्वप्निल तुझ्याशी बोलत नाही तेव्हापासून तू अस्वस्थ राहते..... ते तू नेहमी त्याच्या विचारात असते तू काही ना काही विषय काढून त्याचा विषय काढतेस..... मग याला काय समजायचं आम्ही?????

तृप्ती सचिन बरोबर बोलतोय राजकारण तुला नाही वाटत का की आता तुला सुद्धा स्वप्नील आवडायला लागलायते (तिचं बोलणं ऐकून राधिकाला रडायला येतं)

माधुरी : अगं तू रडतेस काय ...आम्ही बोलतोय ते खरंच आहे का आणि जर असेल तर तू आम्हाला सांगू शकतेस.... त्यात लपवण्यासारखं काय आहे हे बघ राधिका स्वप्निल वाईट नाहीये ग आणि त्याच्यासारखा मुलगा मिळणं सुद्धा शक्य नाही तू खरच त्याचा एकदा विचार करून बघ.......

राधिका : (रडतच )माधुरी तृप्ती बाबू सचिन उज्वला आय एम सॉरी मी नाही लपवून ठेवू शकत मला खरंच आता तो आवडायला लागल्या हे मला खूप आधीच समजलं होतं पण स्वप्निल ला सांगायची संधी मला मिळालेच नाही पण मी आता ठरवलंय मी त्याला माझ्या मनातली गोष्ट उद्याच त्याच्या च वाढदिवसाच्या दिवशी सांगेल..... मला माफ करा .....मी ही गोष्ट तुम्हाला सुद्धा नाही सांगू शकलि तुम्ही सगळेजण मला समजावण्याचा  किती प्रयत्न करत होते..? पण मीच समजून घ्यायला तयार नव्हते.... त्यादिवशी जे घडलं ते घडायला नव्हतं हवं मी खूप चुकीची रिऍक्ट करत होती आय एम सॉरी प्लीज मला माफ करा

बाबू :  राधिका तू आधी रडणं थांबव आणि एक सांगू का आम्हाला ना सगळ्यांना त्या नम्रता ची लक्षणे काही ठीक दिसत नाही ......ती काही गोंधळ घालायच्या आधी तू तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक उगाच पुढे जाऊन त्रास नको

राधिका :तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असं वाटतं का की नम्रता सुद्धा त्याच्यामागे आहे......????

तृप्ती : वाटतं काय बोलतेस ही गोष्ट खरीच आहे तू बघितला नाही का तू येतो तर किती खुश होते ती...... त्याचं नाव नाही काढले तर हिचे पाय जमिनीवर राहत नाही

उज्वला. :  हो ना मला असं वाटतंय हीला याच्या वाढदिवसा बद्दल नक्कीच माहिती होतं म्हणून ती त्याला विचारत होती उद्या तू फ्री आहेस का नाही तर कशाला विचारलं असतं...... ते सगळं सोडा आता हे बाबू एक काम कर ना त्याला विचार तू उद्या एकटाच सिद्धिविनायक ला जाणार आहे का त्याच्या घरच्यांबरोबर जाणार आहे?????

बाबू :  ठिक आहे मी त्याला थोड्यावेळाने विचारतो पण का काही काम होतं का तुझं

उज्वला:  हो रे माझ्या डोक्यात ना एक आयडिया शिजते एक काम कर तू त्याला आत्ताच जाऊन विचारा तो उद्या एकटा जाणार आहेस का पूर्ण घरच्यांबरोबर जाणार आहेस..... कारण जर हा एकटा जात असेल तर आपण सगळे जण त्याच्या सोबत उद्या जाऊया दर्शन पण होतील आणि राधिका ला तिच्या मनातल्या गोष्टी त्याला बोलून दाखवता येतील.....

राधिका :  बापरे मंदिरांमध्ये त्याला मी प्रपोज करू(काळजीत)

तृप्ती : नाही नाही एक काम कर ना नम्रताला आधी एक घोळ घालू दे नंतर वाट बघून तू त्याला प्रपोज कर ...
(चिडत)तू वेडी आहेस का ग एकदा संधी मिळते ती पण चालून आलेली संधी .....आणि त्यात नको ते भलतेच प्रश्न विचारतेस..... आणि नाही तरी तू काही चुकीचे काम करत नाही तू तुझ्या मनामध्ये जे चालू आहे ते त्याला बोलणार आहे ज्याने तुम्ही दोघेही आनंदी व्हाल नीट विचार कर आणि सांग अजूनही बाबु त्याला विचारायला गेलेला नाही....

राधिका अच्छा ठीक है आता काही चेंज करू नका मी तयार आहे पण त्या नम्रता च काय ती पण असेल ना उद्या आपल्या सोबत

उज्वला : हा असू दे ना त्यात काय झालं ती काही बोलायच्या आधी तू बोलून मोकळी हो..... हे बाबू जाणारे लवकर परत घरी पण जायचे उगाचच आई-वडील रागवतील आणि हो या सचिन ला पण घेऊन जा सोबत आम्ही थांबतो इथे थोड्यावेळात आणि लवकर ये बाबा तेवढे कृपा कर

( उज्वला च्या सांगण्यावरून बाबू आणि सचिन दोघेही स्वप्नील च्या घरी जातात तेवढ्यात संदीप तिकडे येतो)

संदीप : हे दोघे कुठे गेले....????

माधुरी : काही नाही रे ते उद्या स्वप्नील चा वाढदिवस आहे ना आणि तो उद्या सिद्धिविनायक ला जाणार आहे तर हे दोघे त्याला तेच विचारायला गेलेत की तो एकटा जाणार आहे का त्याच्या फॅमीली सोबत जाणार आहे जर तो एकटा जात असेल तर आपण पण जाऊ या ना त्याच्या सोबत तर संपन्न होईल आणि हे मॅडमचा काम पूर्ण होईल
संदीप : राधिका चं काम थोड शोक होत वाटतं तयार झाली(हसत)

(माधुरी ने तिथे घडलेला सगळा प्रकार संदीपला सांगितला तो सुद्धा त्या गोष्टीला तयार झाला आणि त्यांच्या बरोबर उद्या सिद्धिविनायक ला निघायला तयार झाला)

राधिका : ये ते बघा ते दोघे आले काय झालं काय बोलला तो एकटाच जाणार आहे का त्याच्या फॅमीली सोबत जाणारे...??( काळजीने विचारते)

सचिन : हो हो जरा श्वास तर घेऊ द्या आमच्या दोघांना आधी नाही नाही चा पाडा लावला आणि आता हो हो झालं तर लगेच उतावळी झालीस तो उद्या एकटाच जाणार आहे...... आत्ता त्याच्या घरच्यांनी त्याला एकटा जायला सांगितलं कारण त्यांना उद्या कुठेतरी बाहेर जायचंय?

राधिका  : आनंदाने अरे वा मग तर झालं माझं काम (सगळेजण तिच्याकडे बघून जोरजोरात हसतात)

बाबू  :ठीक आहे आपण उद्या सगळेजण आठ वाजता निघूया सकाळी म्हणजे जास्त गर्दी नाही भेटणार मी जाता जाता नम्रता ला पण हा निरोप देतो म्हणजे ती तयार राहील नाही तर म्हणेल मला सांगितलं नाही कुणी चला मग निघू या आता

सचिन :  आणि आम्ही स्वप्निल ला सुद्धा सांगितला आहे की त्याच्या सोबत आम्ही सगळे येणार आहोत म्हणून पण त्याला हे नाही माहित की त्याचा उद्या वाढदिवस आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे

उज्वला बरं झालं त्याला सांगून ठेवलं म्हणजे काही टेन्शन नको चला चला उशीर झाला आता निघूया गुड नाईट सगळ्यांना (सगळेजण एकमेकांना गुड नाईट बोलून निघून जातात)

( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)














0

🎭 Series Post

View all