राधिका तिच्या भूतकाळाची स्वप्ने बघत कधीच झोपून गेलेली असते..... दुसऱ्या दिवशी राधिका सकाळी उठते तेव्हा तिचे डोके थोडे जडच असत मीनाताईंना याची कल्पना असते कारण जेव्हा जेव्हा राधीका टेन्शनमध्ये असते तेव्हा दुसऱ्या दिवशी तिची तब्येत काही बरी नसते
राधिका : हॉल मध्ये डोकं पकडत येते आई आई स्वराज उठला का.....????
मीनाताई: हो अगं तो कधीच उठला त्याने तुझ्याबद्दल विचारपूस केली पण मी त्याला समजावून बाहेर मुलांबरोबर खेळायला पाठवले (थोडा काळजीत राधिकाला डोक्याला हात लावून बघताना ते तिला विचारतात )काय झालं आज पण डोकं दुखतय
,, राधिका : हो कामाचा लोड वाढला आहे ना म्हणून थोडं दुखतंय नंदिनी माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनव ग
मीनाताई : ये माझ्याजवळ मी थोडं डोकं दाबून देते म्हणजे तुला बरं वाटेल राधिका त्यांच्या पाशी बसून थोडं डोकं चेपून घेते तेव्हा तिला कुठेतरी बरं वाटतं
राधिका: आई नंदनी ला सांग तुला शाळेत पोहचवून यायला मला जरा लवकर जायचंय शॉप मध्ये
( तेवढ्यात तिकडून स्वराज येतो हसत-हसत)
स्वराज : ये मम्मा
राधिका : अरे माझं गोंडस बाळ आलास खेळून बाप रे किती घाम आलाय तुला खूप जास्त खेळायला वाटतात( स्वराचे गाल ओढत राधिका बोलते)
स्वराज: हो मम्मा मीना तू मला जी सायकल दिली आहे ना मी आज ती चालवली आणि माहितीये माझ्या सगळ्या फ्रेंड्स ला ती सायकल खूप आवडली आणि मी त्यांना शेअर पण केली तू बोलतेस ना शेअरिंग इस कॅरिंग
राधिका : अरे वा स्वराज माझा खूप मोठा झाला आता त्याच्या गोष्टी तो शेअर करायला सुद्धा लागला ....वेरी गुड स्वराज नुसतं खेळून नाही चालणारे त्यासाठी अभ्यास म्हणजे स्टडी सुद्धा करावी लागते.... तू जर स्टडी नाही केलीस तर पायलेट कसा बनणार .....
स्वराज : नाही मम्मा मला पायलेट नाही पोलीस बनायचं आपल्या बाबांसारखा म्हणजे मी आपल्या देशाचे रक्षण करणार
राधिका : अरे वा ते पण चांगलं काम आहे तुला जे बनायचे ते तू बन पण पहिलं त्यासाठी तुला स्टडी करावा लागेल
स्वराज: हो माम्मा मी स्टडी करणार आणि आता तर मला वेकेशन सुद्धा लागणार मग मी अजून स्टडी करणार आणि भरपूर खेळणार
राधिका त्याला मिठी मारते आणि थोड्याच वेळात आवरून ती तिच्या कामाला निघून जाते
@@@@@@@@@@@@@@@@@@
राधिका तिच्या कामाला गेलेली असते मीनाताई स्वराज्याला झोपवुन हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात दारावरची बेल वाजते मीनाताई ला माहित असतं कोण आलेलंय.....
मीनाताई दरवाजा उघडतात
मीनाताई : बाबू माधुरी मी तुमचीच वाट बघत होती या आत मध्ये
(मीनाताई त्यांना पाणी घेऊन येतात)
बाबू ( पाणी पिऊन झाल्यावर) काय झालं काकू तुम्ही असं अचानक आम्हाला काल रात्री फोन करून का बोलावलं ते पण राधिका नसताना काही सिरीयस आहे का
मीनाताई: हो रे तसच काहीतरी समज( मीनाताई ने राधिका बरोबर घडलेला सगळा प्रकार बाबू आणि माधुरीला सांगतात ते दोघे सुद्धा थोड्यावेळ शांत बसतात)
मीनाताई :राधिकाला बोलले तो होता समोर तर सगळ्या गोष्टी खरं खरं सांगून टाक निदान त्याला तरी समजलं असतं किती चुकीची नव्हती ...... त्याला जे काही दाखवलं ते सगळं चुकीचं होतं..... पण ही मुलगी ना स्वतःला त्रास करुन घेते नेहमी दुसर्यांचा विचार करते..... तिला किती त्रास भोगावा लागतोय ते तिला कसं नाही समजत आणि तिला बघून मला त्रास होतो..... एवढे वर्ष काहीच नव्हतं सगळं व्यवस्थित झालं होतं आता हा परत आला आणि पुन्हा तेच तेच घडतय....( मीनाताई रडायला लागतात त्यांना असं रडताना बघून माधुरी त्यांच्या जवळ बसते आणि त्यांचे डोळे पुसते)
माधुरी : तुम्ही काळजी नका करू काकू आम्ही दोघे बघतो काय करायचे ते आता तो आलाच आहे तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजे नाहीतर हा सारखा तिला त्रास देईल.....
बाबू : नाही माधुरी तो तिला त्रास नाही देणार पण तिला काय घडलं का केलस असे प्रश्न नक्कीच विचारणार त्याच्याने तिला जास्त त्रास होईल आता कुठे तरी ती सावरली होती त्यात परत हे नकोच तो विचार जरी केला तरी जीव वर खाली होतो
मीनाताई : एक काम कर ना बाबू तू त्याला जाऊन एकदा भेट त्याला जे काही चुकीचं वाटतं ते सगळे स्पष्ट करा त्याला बरीच गोष्ट माहित नाहीये खूप काही यांच्यामध्ये बोलायचं राहून गेलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आहेत
बाबू : काकू मला दोन-तीन दिवस द्या मी बघतो काय करायचं ते कारण ही गोष्ट एवढी नाजूक आहे की खूप बारीक पणाने त्याला हाताळावा लागेल .......उगाच परत नको नको ते उफाळून यायचं आणि परत आपल्या राधिका ला त्रास व्हायचा
मीनाताई : तू बरोबर बोलतोयस बाबू आणि हो ह्यातलं काहीच राधिकाला सांगू नकोस नाहीतर नाहीतर परत ती सतत विचार करत राहील आणि स्वतःला त्रास करून घेईल
माधुरी : तुम्ही काळजी करू नका काकू आम्ही कुणाला ही याची भनक लागून देणार नाही
( दोन्ही निघून जातात मीनाताई त्याच विचारांमध्ये त्यांच्या हॉल मध्ये बसतात)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
(माधुरी रस्त्यात जाता जाता बाबुला विचारते)
बाबू आता कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टींना मला तर राधिकाची खुप काळजी वाटते आहे आणि तो स्वराज ज्याला यातलं काहीच माहित नाही त्या निष्पाप जिवाचा तरी काय दोष रे तो तर नेहमी विचारतो बाबा कधी येणार ती नेहमी टाळते इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्याला आणि नाहीतरी मोठा झाला तर त्याला कळेलच ना या गोष्टी
बाबू : मला पण समजत ग..... नाही ही गोष्ट एवढी इझी... नाहीये ....एक काम कर ना आपला ग्रुप आहे ना त्याच्या मध्ये एक मेसेज टाक मला त्यांना उद्या अर्जंट मध्ये सगळ्यांना भेटायचं
माधुरी : अरे पण त्यात राधिका पण आहे ना तिला कळेल
( बाबू डोक्याला हात लावतो अरे हो लक्षात नाही आलं सॉरी .....एक काम कर सगळ्यांना पर्सनली मेसेज टाक आणि सगळ्यांना हे पण सांग की कोणीही राधिकाला सांगू नका की उद्या आपण भेटतोय म्हणून आणि हो सगळ्यांना सांग की आपण एका हॉटेलमध्ये भेटणारे मी संध्याकाळपर्यंत सगळ्यांना हॉटेल च नाव सांगतो)
माधुरी बाबू ने सांगितल्या प्रमाणे सगळ्यांना पर्सनल मेसेज करते
बाबू : बरं झालं तू आठवण करून दिलीस नाहीतर त्या ग्रुप वरती आपण मेसेज टाकला असता तर राधिकाला आपल्यावर संशय आला असता..... टेन्शन आलं ना की असं होतं बघ....…. डोकं पण दुखायला लागलं बघ त्यात जाऊदे काय असेल ते काम करून घेऊया आणि लवकर वाटलं तर घरी निघूया आज नाही तरी माझं कशातच मन नाही लागते.....
एवढं बोलून दोघे पण ऑफिसमध्ये पोहोचता
@@@@@@@@@@@@@@@@
( काय मग कसा वाटला तुम्हाला आजचा भाग काय होईल जेव्हा हे सगळे मित्र एकत्र पुन्हा भेटतील तेव्हा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा