Login

आंधळेपण –अती लघुकथा

आंधळेपणा हा डोळ्याचा की बुद्धीचा
एका आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करत असताना तिने पाहिले... त्याची मदत करावी म्हणून ती स्वतः त्याच्या दिशेने पुढे झाली , पण या नादात आपल्याच बाजूने वाजणाऱ्या गाडीच्या हॉन कडे तिचे दुर्लक्ष झाले...

त्या आंधळ्या माणसाने तिच्याजवळ येत काठीने तिला थांबवले आणि तिचा हात पकडून रस्ता क्रॉस केला... अनुभवातून ती खरी डोळस झाली....

सौ. एकता निलेश माने