Login

आणि चूक उमगली भाग एक

जो करतो त्याची किंमत नसते
"हे बघ अमोल, तुला जर मला सांभाळणंच शक्य नसेल, तर नको सांभाळूस. मी माझ्या धाकट्या मुलाकडे अक्षय कडे जाईन आणि तिथेच राहीन. मानसी गरोदर आहे, ती मला आपुलकीनं बोलावून घेईलच. तेव्हा तुझ्या बायकोला माझ्यामुळे काही त्रास होणार नाही. तिच्या मर्जीवर माझं आयुष्य चालवायची वेळ अजून तरी आली नाही माझ्यावर! तू उद्याच माझ तिकीट बुक करून दे. मला इथे थांबायचं देखील नाही."

शोभाताई भडभड बोलून तिथून निघून गेल्या तर क्षणभर अमोल सुन्नच झाला. आई अस्मिताला वेळोवेळी बोल लावत होती हे त्याला ठाऊक होतंच, पण ती इतकी टोकाची भूमिका घेईल, हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. अस्मिताला घालुनपाडून बोलण्यापर्यंत ठीक होत पण त्या आज चक्क घर सोडून जाण्याच्या गोष्टी करते. त्याला समजतच नव्हतं त्याच आणि अस्मिताच नक्की चुकलं तर कुठे. इकडे अस्मिता येऊन त्याला समजावत होती.

" अहो, तुम्ही नका एवढा विचार करु, आईंचा राग शांत झाला कि त्यापण शांत होतील आणि सगळं आधीसारखं सुरळीत होईल."

अस्मिता मृदू आवाजात म्हणाली आणि किचनकडे काम आवरण्यासाठी वळली. तर तो फक्त मान हलवून पाठमोऱ्या जाणाऱ्या तिच्याकडे बघतच राहिला.

त्याच्या डोळ्यासमोर पाच वर्षांपासूनचा त्याचा संसार उभा राहिला. लग्न झाल्याच्या पहिल्याच रात्री त्याने अस्मिताला निक्षुन सांगितलं होत.,

" हे बघ अस्मिता, माझ्या आईने आम्हाला खूप कष्टाने वाढवलं आहे. तुला तिच्याशी जुळवून घ्यावं लागेल. तिची एक ही तक्रार मी खपवून घेणार नाही. बाकी तुला कश्याची कमतरता भासणार नाही. फक्त तू तिच्या शब्दात राहा तिला खुश ठेव. "


अस्मिता नवी नवरी, त्यात साधी भोळी आपल्या नवऱ्याच्या होकारात तिने नुस्ता होकरच नाही भरला तर तशी ती वागली देखील. ती शोभा ताईंना काहीच कमी पडुन दिल नाही. अमोल देखील आईचा शब्द खाली पडून देत नव्हता. तो शेतकरी होता आणि त्याच स्वतःच दुकान होत, जे अस्मिता आणि तो मिळून सांभाळायचे.

तस तर त्यांना दोन मुले, मोठा अमोल न धाकटा अक्षय. शोभा ताईंनीच त्या दोघांना लहानाचं मोठं केलं. नवऱ्याच्या अचानक जाण्यानंतर त्यांनी स्वतःच्या सुख-दुःखाची पर्वा न करता दोन्ही मुलांना वाढवलं, शिक्षण दिल, जगायला शिकवलं.

अक्षय मोठा झाला, इंजिनीअर झाला, शहरात गेला, त्याने त्याच्या मनाप्रमाणे लग्न केल. मानसी त्याच्या सोबतच नोकरीला होती. शोभा ताईचं सगळं अस्मिता, अमोल करत होते, पण त्यांना मानसी आणि अक्षयच खूपच कौतुक होत. माझा मुलगा एवढा कमवतो, मानसी एवढी हुशार हेच त्या जेव्हा बघावं तेव्हा बाहेरच्यांना आणि घरात ऐकवून दाखवायच्या. अस्मिताच्या चुका काढणे तर त्यांचा आवडता छंद होता. बिचारी अस्मिता नवऱ्याला त्रास नको म्हणून ऐकून घ्यायची. पण शोभा ताईंनी त्याच गोष्टीचा फायदा घेतला आणि सून ताब्यात ठेवावी म्हणून त्या नकळतपणे अस्मिताला दुखावत गेल्या.


शोभा ताई जातील का घर सोडून?
अस्मिता सोबत त्या असं का वागत असतील??