Login

आत्मनिर्भर

बचत गटाबद्दल सांगणारी कविता
बचत गट हा असतो एक
सामाजिक आर्थिक उपक्रम
सूक्ष्म वित्त पुरवठा करण्याचा
जगातील सर्वात मोठा कार्यक्रम

बचत गटामुळे लक्षात
येते एकी गावाची
आर्थिक मदत होते
गरजू कुटुंबाची

गरजू, कष्टकरी महिलांना
होतो बचत गटाचा फायदा
आर्थिक मदत करण्याचा
बचत गट करतो वायदा

बचत गटामुळे वाढली
महिलांची संघटनशक्ती
सामाजिक विकासाच्या
जाणीवांची वाढली गती

गरजू महिलांना मिळाला
घरबसल्या रोजगार
संसाराला लागला त्यांच्या
आर्थिक हातभार

बचत गटाने केले
महिलांना सक्षम
लघुउद्योगात झाल्या
महिला कार्यक्षम

महिला बनले
आत्मनिर्भर
उंचावला त्यांचा
आर्थिक स्तर

बचत गटामुळे महिलांच्या
विचारांचे झाले आदानप्रदान
महिलांच्या उद्योगांना
मिळाले प्राधान्य

एकमेकांना सोबत घेऊन साधता
येतो नाविन्याचा ध्यास
प्रगती साधता येते
धरून तंत्रज्ञानाची कास

माध्यम असे बचत गट
प्रभावी व परिणामकारक
महिला सक्षमिकरणास
बचत गट असे पूरक


©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all