ती खरोखर बदलत होती. कनिकाच्या वर्गात मुलं मुली तिच्या शांत डोळ्यातल्या क्षणपणा पाहू लागल्या. ती फक्त अभ्यासू नव्हती, वक्तृत्व, लेखन, प्रस्तुतिकरण यामध्येही आता सराईत होत गेली.
आत्ता पुढें,
हळूहळू कनिकाने आपले शिक्षण पूर्ण केले. कणिकाने मोठ्या कंपनीमध्ये अप्लाय केले होते तिला त्या कंपनीमध्ये इंटरव्यू साठी बोलवण्यात आले. तिचं बोलणं, आत्मविश्वास, आणि प्रामाणिकपणाने कमिटी प्रभावित झाली.
“तू इतकी शांत कशी, आणि तरीही इतकी स्पष्ट बोलतेस?” इंटरव्ह्यू मध्ये एकाने प्रश्न विचारला.
“शांत लोकांचे विचार खोल असतात. जेव्हा गरज असते तेव्हा आवाज तिखट होतो.” कनिका ने शांत पने उत्तर दिले. तिचे सिलेक्शन झाले. तिला त्या मोठ्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तिने प्रामाणिकपणे नोकरी केली आणि आपले नाव कमावले.
दोन वर्षांनी ती गावी आली. काकू तिच्या साडी बॅग आणि तिच्या हातात असलेल्या मोबाईल कडे बघत होत्या.
" अरे, कनिकाचं तर रूपच बदललं! " काकू आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाल्या. कनिका हसली, पण आता तिचा हसू शांत नव्हतं... ते आत्मविश्वासाचं होतं. गावामध्ये एक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात कनिकाला वक्ता म्हणून बोलावले होते. कनिका स्टेजवर आली आणि माईक जवळ येऊन उभी राहिली.
" सगळे म्हणायचे कनिका शांत गोड काहीच बोलत नाही पण शांत असणे म्हणजे कुमकुवत असणे असे नाही. " कनिका सगळ्यांकडे पाहून म्हणाली. गावातली सगळी लोक तिच्याकडे पाहू लागले.
“जेव्हा अपमान, चुगली, गैरसमज, खोट्या गोष्टी माझ्याबद्दल पसरवल्या गेल्या, तेव्हा मी शांत होते.
पण मी माझा रस्ता स्वतः तयार केला. आज मी उभी आहे, कारण मी ऐकणं सोडलं आणि मेहनत सुरू केली.” तिचा आवाज स्पष्ट, ठाम आणि तिखट. तिचं बोलणं ऐकून मंगला काकू नि मान खाली झुकवली.
पण मी माझा रस्ता स्वतः तयार केला. आज मी उभी आहे, कारण मी ऐकणं सोडलं आणि मेहनत सुरू केली.” तिचा आवाज स्पष्ट, ठाम आणि तिखट. तिचं बोलणं ऐकून मंगला काकू नि मान खाली झुकवली.
" कनिकाताई, तुम्ही खरंच खूप कमाल केली. आम्हालाही शिकायचं आहे तुमच्यासारखं पुढे जायचं आहे. " कार्यक्रम संपल्यानंतर गावातल्या सगळ्या मुली तिच्या आजूबाजूला जमा झाल्या आणि बोलत होत्या.
“शांत रहा, पण कमकुवत नाही. जेव्हा गरज वाटेल तेव्हा आवाज उठवायला शिका, स्वतःसाठी स्टॅन्ड घ्या. नाहीतर जग पायदळी तुडवतं.” कनिकाने त्यांच्याकडे पाहून स्पष्ट स्वरात सांगितले.
त्या रात्री काकू घरी आली.
लाजत, संकोचत म्हणाली,
लाजत, संकोचत म्हणाली,
“कनिका… मला माफ कर. मी चुकीचं बोलले. आज कळलं शांत मुलगी किती तिखट होऊ शकते.”
“काकू, मी कधीच तुमची शत्रू नव्हते. फक्त लोकांनी मला चुकीचं समजलं. पण आता मला समजलं आवाज नसेल तर आपलं अस्तित्वच राहत नाही.” कनिकाने ही शांत चेहऱ्याने उत्तर दिले.
आपल्या मुलीचे ते स्पष्ट बोलणं ऐकून तिच्या आईच्या चेहऱ्यावर हसू पसरले तर वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान.
“जगाला प्रूव्ह करायचं नव्हतं… स्वतःला प्रूव्ह करायचं होतं.” तिने वेदांतकडे पाहून त्याला म्हणाली.
“ते तू केलंस. शांत कनिका आता तिखट कनिका झाली.” वेदांतने ही हसून उत्तर दिले.
“शांत राहण्याचंही सौंदर्य असतं… पण आवाज उठवण्याची हिंमत असली पाहिजे.” कनिका
त्या दिवसापासून गावात एक वाक्य प्रसिद्ध झालं
“काना मागून आली… आणि तिखट झाली!”
शांत, गोड, निरागस मुलगी जमिनीवर नुसते पाऊल नाही ठेवत…
तर तिचा आवाज, तिची ओळख, तिचं अस्तित्व ठाम ठेवून पुढं चालू लागली.
तर तिचा आवाज, तिची ओळख, तिचं अस्तित्व ठाम ठेवून पुढं चालू लागली.
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा