डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४५
जवळ जवळ अर्धा पाऊण तासाचा अवधी उलटून गेला... इकडे अजून श्रेयसा ला ही शुद्ध आली नव्हती आणि ऑपरेशन थेटर चा दरवाजाही उघडला नव्हता... सुरभी आणि रेवती अजूनही श्रेयसा चे शुद्धीवर येण्याची वाट पाहत तिच्या रूममध्येच बसले होते... तर आदित्य राज आणि श्रीकांत दोघेपण ऑपरेशन थेटरच्या दरवाजाला डोळे लावून तिकडे बसले होते...
शेवटी एकदाचा ऑपरेशन थेटर चा दरवाजा उघडला आणि त्या दरवाजा मधून दोन डॉक्टर बाहेर त्यांच्या दिशेने पुढे येऊ लागले....
" डॉक्टर... माझा आर्य कसा आहे ? त्याला सुद्धा आली का ? आम्ही त्याला भेटू शकतो का ? " डॉक्टरांना समोर पाहून आदित्य राज पटकन त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारू लागले...
" हे बघा, आम्ही तुमची अवस्था समजू शकतो पण तुम्ही आधी शांत व्हा आणि आम्ही काय बोलत आहे ते नीट ऐकून घ्या... " एका डॉक्टरने पुढे येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला....
" मी ठीक आहे डॉक्टर पण नाही तुम्ही मला माझ्या मुलाबद्दल सांगा... जोपर्यंत मी त्याला सुखरूप पाहत नाही माझ्या जीवाला चैन पडणार नाही.... " आदित्य राज उतावीळ होऊन बोलू लागले....
" आदित्य राज तुम्ही शांत व्हा... आधी डॉक्टरांना काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घ्या... डॉक्टर तुम्ही बोला... " श्रीकांत पटकन पुढे येऊन त्यांना शांत करत म्हणाले...
" हे बघा, पेशंट च्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे आणि त्याचा रक्तही खूप गेले आहेत.... शिवाय त्यांच्या शरीरावर इतर ठिकाणीही खूप जखमा झाल्या आहेत.... पेशंटची परिस्थिती खूपच नाजूक आहे त्यामुळे आम्हाला एक इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल.... " डॉक्टर त्या दोघांकडे पाहून त्यांना व्यवस्थित माहिती देऊ लागले....
" डॉक्टर तुम्ही असे कसे बोलू शकता... माझा आर्य खूप स्ट्रॉंग आहे... इतक्या सहजासह त्याला काही होणार नाही... आता तुम्ही बघा, थोड्या वेळात तो जागेवरून उठून माझ्याजवळ येईल आणि मला बोलेल की, बाबा मी ठीक आहे.... " आदित्य राज डॉक्टरांकडे पाहून त्यांना सांगत होते...
" तुम्ही पहिला शांत व्हा आणि शांत डोक्याने विचार करा कारण आपण जेवढा वेळ वाया घालू तेवढा पेशंटच्या जीवाचा धोका वाढेल... जितक्या लवकरात लवकर आपण ऑपरेशन करू ते पेशंट च्या जीवासाठी चांगल आहे...." ते डॉक्टर आहेत त्या दोघांकडे पाहून समजण्याच्या स्वरात म्हणाले...
" डॉक्टर... ते ऑपरेशन... " श्रीकांत पण घाबरले होते तरीही हिंमत करून डॉक्टरांना विचारतात...
" आम्ही मुंबईहून एक बेस्ट डॉक्टरांची टीम इकडे बोलावली आहे.... पुढच्या चार ते पाच तासात ती टीम इकडे पोहोचेल... पेशंट च्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे त्याच्या ब्लड ग्रुपचे रक्तही मागवले आहे...
आम्हाला डॉक्टरांना या ऑपरेशन बद्दल डिस्कस करावे लागेल.... ऑपरेशन मेजर आहे त्यामुळे त्याचा रिस्क ही जास्त आहे... तुम्ही जेवढ्या लवकर हे ऑपरेशनचे पेपर साइन कराल, तेवढ्या लवकर आपली डॉक्टरांची टीम तिकडून निघेल आणि इकडे पोहोचेल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका लवकरात लवकर आपल्या फॅमिली मेंबर सोबत याबद्दल डिस्कस करा आणि काही पेपर तुम्हाला नर्स सांगून देईल त्याच्यावर सिग्नेचर करा... म्हणजे आम्हाला पुढची प्रोसिजर पटकन फॉलो करता येईल.... " डॉक्टरच्या दोघांकडे पाहून समजण्याच्या स्वरात म्हणाले....
" डॉक्टर... आम्ही फक्त एकदा आमच्या मुलाला पाहू शकतो का ? आम्ही जवळ जाणार नाही... लांबूनच पाहू... " आदित्य राज डॉक्टरांकडे पाहून विनवणीच्या स्वरात म्हणत होते... आज पहिल्यांदाच त्यांच्या शब्दांमध्येही थरथराट निर्माण झाली होती...
" हो बघू शकता पण लांबूनच.... कारण तू अजूनही शुद्धीवर नाही आणि आम्ही काही मशीन लावल्या आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही... " डॉक्टरांनी त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगितले आणि काही डिस्कस करण्यासाठी परत ऑपरेशन थेटरच्या आत निघून गेले....
" आदित्य राज... तुम्ही ठीक आहात ना ? " मध्येच त्यांचा पाय अडखळला त्यामुळे श्रीकांत त्यांना आधार देत म्हणाले...
" कसे ठीक असणार.... आमचा मुलगा तिकडे ऑपरेशन थेटर मध्ये आहे... आता डॉक्टरांनी जे काय सांगितले आहे ते तुम्ही ऐकले ना... हे ऐकल्यापासून आमच्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी वाटत आहे.... ही गोष्ट जेव्हा त्याच्या आईला समजेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल ? " आदित्य राज आपल्या मुलाचा आणि रेवतीचा विचार करत म्हणाले...
" आर्यव्रत ठीक होईल... तुम्ही काही काळजी करू नका... डॉक्टर बोलले आहे ना, जेवढ्या लवकर ऑपरेशन होईल, तेवढे त्याच्यासाठी चांगले आहे... " श्रीकांत त्यांना धीर देत म्हणाले....
" आम्हाला आमच्या पायाची वाटत नाही तुम्ही प्लीज आम्हाला त्या ऑपरेशन थेटर च्या जवळ घेऊन जावा... मला आमच्या मुलाला बघायचे आहे... " आदित्य राज घाबरलेल्या आवाजातच त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाले...
" हो sss चला.... " श्रीकांत त्यांचा खांदा पकडून त्यांना ऑपरेशन थेटर च्या जवळ घेऊन गेले... ते दोघेपण ऑपरेशन थेटर च्या बाहेर असलेल्या दरवाज्याच्या काचेमधून आत पाहत होते....
ऑपरेशन थेटर मध्ये आर्यव्रत डोळे बंद करून निपचिप पडला होता... त्याच्या कमरेपासून खालच्या शरीरावर पांढरी चादर टाकली होती.... त्याच्या डोक्यावर छातीवर हाता वरती ठीक ठिकाणी जखमा दिसून येत होत्या.... त्याच्या छातीला काही वायर लावल्या होत्या आणि बाजूला असलेल्या मशीनवर कुठे नंबर, कुठे तिरक्या लाईन येत होत्या... काही डॉक्टर तिकडे ऑपरेशन थिएटर च्या आत मध्ये एका बाजूला उभा राहून काहीतरी बोलण्यामध्ये व्यस्त होते जणू ते आर्यव्रत च्या ऑपरेशन बद्दलच एकमेकांसोबत डिस्कस करत असल्यासारखे जाणवत होते....
" माझा आर्य sss कसा शांत झोपला आहे... हा ना लहानपणापासून कधीच एवढा शांत बसत नव्हता... नेहमी काही ना काही करतच होता... कधी घरी आम्ही तिघे असतो तेव्हा तर आमच्या सोबत खूप गप्पा मारत होता... पण कधीच असा शांत नव्हता... आजही त्याचा आवाज ऐकण्याची खूप इच्छा होत आहे... " आदित्य राज आपल्या मुलाकडे पाहून हळव्या स्वरात म्हणत होते...
" शांत व्हा! आपला आर्य... फक्त आराम करत आहे... त्याला काहीही झाले नाही... आपण लवकरात लवकर डॉक्टरांनी सांगितलेले पेपर साइन करून आणि मग बघा, एकदा का त्याचे ऑपरेशन झाले की, आपला आर्य आपल्या सोबत पुन्हा हसत बोलत आपल्या सोबत असेल... " श्रीकांत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात...
" हो sss माझा आर्य अगदी पहिल्यासारखा माझ्यासमोर येऊन उभा राहिल... " आदित्य राजही त्याच्याकडे पाहून म्हणाले... ते डॉक्टर एकमेकांसोबत बोलतच त्या ऑपरेशन थेटर मधून बाहेर निघून गेले... काही वेळाने एक नर्स त्यांच्या दिशेने त्यांना चालत येताना दिसली...
" सरsss हे ऑपरेशन चे पेपर आहेत... डॉक्टरांनी यावर तुम्हाला सिग्नेचर करायला सांगितली आहे.... " ती नर्स काही पेपर आदित्यराज यांच्या हातात देत म्हणाली आणि तिकडून निघून गेली....
आदित्य राज त्या पेपरमध्ये लिहिलेला सगळा मजकूर वाचत असताना मध्येच त्यांना डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे वाटू लागते... ते जागेवर धडपडणार इतक्यात श्रीकांत त्यांना आधार देत तिकडे जवळ असलेल्या खुर्चीवर बसवतात...
" आदित्य राज , तुम्ही ठीक आहात ना ? " श्रीकांत त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाले आणि त्यांच्याजवळ असलेली पाण्याची बॉटल उघडून त्यांच्या हातात दिली....
" या पेपर मध्ये असे का लिहिले आहे ? याबद्दल मला डॉक्टरांना विचारावे लागेल... " आदित्य राज या पेपर कडे पहात सांगतात... इतक्यात एक डॉक्टर त्यांना समोरून येताना दिसतात...
" म sss मी या पेपर बद्दल डॉक्टरांना विचारतो.... " आदित्य राज आपल्या जागेवरून उठत त्या डॉक्टरांच्या दिशेने पुढे जाऊ लागतात... डॉक्टर ही त्यांना समोरून येताना पाहून तिकडेच थांबतात...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा