Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ११

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ११

" आज घरचा जावई घरी काय आला आहे, माझ्या घरच्यांचे वागणे तर असे वाटत आहे की, देशाचा प्राईम मंत्रीच यांच्या घरी येऊन बसला आहे... सगळ्या त्याच्या आवडीच्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि आपल्या एकुलत्या एक मुली बद्दल मात्र काही काळजी नाही.." श्रेयसा तोंड वाकडं करत बाजूला बसते...

" ए बाई, तुझ्या आवडीचे ही बनवले आहे... आता अशीच इकडे बसून राहू नको... जेवणाची वेळ झाली आहे .. जा ss जावई बापूंना खाली बोलावून घेऊन ये... " सुरभी

" हो बोलावते... ते बाबा कुठे आहेत ? " श्रेयसा घराच्या हॉलवर पूर्ण नजर फिरवत आपल्या आईला विचारते....

" त्यांना तर घरी पाहुणे आहेत त्याच काहीही नाही... रोजच्या प्रमाणे गेले आहेत बाहेर गावात फेरफटका मारण्यासाठी... " सुरभी वैतागलेल्या आवाजात म्हणाली...

" हे बघा, आपल्या गावातले ते फेमस कंदी पेढे आणि जलेबी घेऊन आलो आहे... जेवणाच्या ताटाला वाढा... "  श्रीकांत समोरून येत आपल्या हातात असलेली बॅग श्रेयसा कडे देत म्हणाले...

" आधीच आईने त्यांच्या आवडीचे एवढे सगळे पदार्थ बनवले आहे,  त्यात तुम्ही काय अजून बाहेरून घेऊन येत आहात ? " श्रेयसा आपल्या घरच्यांच वागणं पाहून पूर्ण वैतागून जाते....

" आमची एकुलती एक लेक आणि एकुलता एक जावई आहे , मग त्याचे लाड आम्ही नाही करणार तर कोण करणार ? " श्रीकांत हसऱ्या स्वरात आपल्या मुलीकडे पाहून म्हणाले...

" तुमची कामे झाली असेल तर खाली या... खाली सगळे जेवणासाठी तुमची वाट पाहत आहे... " श्रेयसा आपल्या आई-वडिलांचा विचार करतच आपल्या रूम पर्यंत आलेली असते.... ती रूमचा दरवाजा उघडून पाहते तर आर्य बाहेर बाल्कनी मध्ये बसलेला असतो आणि त्याचा फोनही नुकताच बंद झालेला असतो...

" हो... चला... " आर्यव्रत जागेवरून उठून तिच्या दिशेने पुढे चालत येतो... ते दोघे पण खाली डायनिंग एरिया मध्ये येतात... हात स्वच्छ धुऊन तिकडे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसतात... सुरभी आपल्या घरातल्या माणसांची मदत घेऊन सगळे पदार्थ एकेक करून डायनिंग टेबलवर सजवते... सुरभी त्यांच्या ताटामध्ये पदार्थ वाढत असताना आर्य आश्चर्याने त्या ताटाकडे पाहून श्रेयसा कडे बघू लागतो... ती मात्र त्याच्याकडे पाहून लगेच खांदे उडवते....

" जावईबापू तुम्हाला काय खायची इच्छा असेल ते सांगा... " श्रीकांत त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत त्याला विचारतात....

" हे सगळं खरच खूप केलं आहे तुम्ही... एवढ सगळं करण्याची काही गरज नव्हती... श्रेयसा तू त्यांना हे सगळं करायला का सांगितले ? " आर्यव्रत आश्चर्याने त्या सगळ्या पदार्थाकडे पाहून त्या दोघांना म्हणाला...

" मी त्यांना काहीही सांगितले नाही आणि त्यांनीही मला काही विचारले नाही... मुळात मला तुमच्या आवडीनिवडी बद्दल काहीही माहित नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट तुमच्या आईला फोन करून विचारले... " श्रेयसा पटकन बोलून मोकळी होते. तेव्हा आर्य शांत नजरेने तिच्याकडे पाहू लागतो...

बरोबर तर बोलत होती ती.. त्यांचे लग्न ज्या परिस्थितीमध्ये झाले आहे एकमेकांच्या आवडीनिवडी बद्दल त्या दोघांनाही काही माहीत नाही... एकदम साहजिक गोष्ट होती पण जेव्हा तीच गोष्ट तिने बोलून दाखवली तेव्हा मात्र आर्य च्या मनाला काहीतरी वेदना झाल्या सारख्या जाणवल्या...


आर्यव्रत शांतपणे जेवण करू लागला... श्रेयसा आणि श्रीकांत जेवायला त्याच्यासोबत बसले होते तेही जेवत होते...

" तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला बसा ना... " आर्यव्रत सुरभी ला एकटीलाच उभी पाहून म्हणाला...

" नाही ते मी नंतर जेवण करेन... आता कोणाला काय हवं नको ते बघायला पाहिजे ना... तुम्हाला काही पाहिजे का ? " सुरभी काळजीने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते पण त्यांनी असे विचारलेले तिच्या मनाला खूप आवडते...

" कोणाला काही पाहिजे असेल तर ते स्वतःही घेऊ शकतात , नाहीतर बाकीचे माणस आहेत की वाढायला... तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला बसा , आम्हाला आवडेल... " आर्य थोडा हट्ट करत त्यांना जबरदस्ती जेवायला बसवतो... सुरभीलाही त्याचा तो प्रेमळ स्वभाव खूप आवडतो... ती आपल्या प्लेटमध्ये थोडे जेवण वाढून घेते आणि त्या सगळ्यांसोबत जेवायला बसते... अधून मधून तिचे सारखे लक्ष त्याच्या प्लेट कडे असते आणि ती श्रेयसा ला डोळ्यांनीच त्याला काय हव नको ते पाहण्यासाठी खुणवत असते...

" मम्मी अगं, त्याला काही पाहिजे असेल तर तो सांगेल ना... तू मला का त्रास देत आहे ? " श्रेयसा वैतागलेल्या स्वरात आपल्या आईकडे पाहून म्हणाली... तिकडे जरी रेवती तिची कितीही काळजी घेत असली तरी शेवटी लहानपणापासून आईच्या हातची चव आपल्या तोंडात अशी काय बसलेली असते की, तिने बनवलेले जेवण आपल्याला स्वर्ग सुखासारखे वाटू लागते... आजही खूप दिवसानंतर तिला आपल्या आईच्या हाताने बनवलेले जेवण खायला मिळाले होते म्हणून ती मन भरून खात होती...

" तिला खाऊ द्या आरामशीर, डिस्टर्ब करू नका... तसेही माझे जेवण झाले आहे,  आता मला काही नको... " श्रेयसा चे बोलणं ऐकून एक नजर तिच्याकडे पाहून आर्य सुरभी ला म्हणाला...


सगळ्यांचे जेवण झाली... सगळे गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते.... सुरभी आपल्या रूम मध्ये येऊन काही समान बाहेर काढत होती...

" मम्मी, तू इकडे काय करत आहेस ? " श्रेयसा तिला शोधत तिच्या रूममध्ये येऊन विचारते...

" ही साडी बघ, तुला आवडली का ? आणि ही तुझ्या सासू साठी कशी आहे ? " सुरभी तिच्यापुढे दोन महागड्या साड्या ठेवत तिला विचारते...

" छान आहेत , पण तू मला का दाखवत आहे ? " श्रेयसा त्या साड्या पाहून तिला विचारते...

" अगं, लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही दोघेही घरी आले आहात तुम्हाला असे रिकाम्या हाताने थोडीच पाठवणार आहे... ही साडी मी खास तुझ्यासाठी घेतली आहे आणि ही तुझ्या सासू साठी... हे कपडे जावईबापूंसाठी आणि हे त्यांच्या वडिलांसाठी... " सुरभी तिकडे ठेवलेल्या सगळ्या बॅग तिच्याजवळ देत तिला सांगू लागते...

" मम्मी, तुमच्या अशा वागण्यानेच जावई लोक डोक्यावर येऊन बसतात.... " श्रेयसा सगळे कपडे पाहत तोंड वाकड करत म्हणाली.... तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांना देण्यासाठी खूप शॉपिंग केली होती आणि सगळ्या महागड्या वस्तू घेतल्या होत्या... पाहूनच समजत होते...

" बसू दे.... आमचा जावई आहे आम्ही बघून घेऊ आणि तू, नवऱ्याला असे अरे तुरे का बोलते... त्याच्या घरच्यांना अजिबात आवडणार नाही... आता तुझे लग्न झाले आहे त्यामुळे आपल्या बोलण्यावर वागण्यावर नियंत्रण ठेवायला शिका... प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यासोबत आदराने वागावे आता आमच्याकडेच पहा..... लग्नाला इतकी वर्ष झाली आहे , पण कधीतरी तुझ्या वडिलांना मी एकेरी आवाजाने हाक मारली आहे का ? " सुरभी तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाली...

" तुमचा काळ वेगळा होता,  पण आता तसं नाही आहे... आता तर मुली बिंदासपणे त्यांच्या नवऱ्याला नावाने हाक मारतात... " श्रेयसा

" बाकीच्या मुली काय करतात आणि कसे वागतात त्याच्याशी माझे काहीही घेणं देणं नाही,  पण माझ्या मुलीने मात्र तिला आम्ही लहान पानापासून दिलेले संस्कार दाखवावे एवढीच इच्छा आहे त्यामुळे तू ही तुझ्या नवऱ्याला आदराने बोलत जा... " सुरभी

" आवरलं का तुमचं... जावईबापू बाहेर वाट पाहत आहेत... " श्रीकांत रूमच्या दरवाजा जवळ येऊन त्या दोघींनाही हाक मारतात....

" हो sss हो... आलो... " त्या दोघी पण हातात सामान घेऊन बाहेर येतात...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all