डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग १६
" साहेब, ते छोटे मालक गावा च्या बाहेर असलेल्या मोकळ्या माळावर येऊन बसले आहेत... " काही वेळा ने आदित्य राज त्यांनी पाठवलेल्या माणसांचा त्यांना फोन येतो...
" ठीक आहे... तुम्ही लांबूनच त्याच्यावर लक्ष ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने आम्हाला कळवा... " आदित्य राज शांतीने बोलून फोन ठेवून देतात...
" काय झालं ओ? कुठे आहे माझा आर्य ? तुम्ही शोधले का त्याला ? " फोन आल्याबरोबर रेवती त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करते...
" हो sss आपल्या गावा च्या बाहेर असलेल्या मोकळ्या परिसरामध्ये आहे तो... काळजी करण्यासारखे काही नाही... माझी माणस आहे त्याच्या मागावर.. आता तुम्ही पण टेन्शन घेऊ नका.. " आदित्य राज
" आज त्याला नक्की काय झाले काय समजलेच नाही... आज ऑफिस वरून लवकरच घरी आला तो चिडचिड करतच! " रेवती काळजीच्या स्वरात त्यांना सांगू लागली...
" असेल काहीतरी कारण , सांगेल नंतर तो... तुम्ही आधी शांत व्हा बरं आणि हो सुनबाई, त्या कुठे आहेत ? " आदित्य राज यांना तिची आठवण होते तसे ते लगेच विचारतात...
" त्या sss घरीच होत्या... आर्य ची चिडचिड पाहून माझंही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही... थांबा मी बघते... " रेवतीला आता कुठे श्रेयसा ची आठवण होते, तसे ती आपले डोळे पुसत जागेवरून उठून उभी राहते...
" आर्य आपल्या रागात त्यांना तर काही बोलला नाही ना ? " आदित्य राज काळजीने विचारतात...
" मला नाही माहित ओ.... त्यांनी आज नवीन आलेले काचेचे शोपीस मात्र आर्याने तोडले... त्यांना वाईट वाटले असेल ना ? " रेवती थोड्या वेळापूर्वी घडलेली घटना त्यांना सांगू लागते...
" तुम्ही आधी सुनबाई काय करत आहे, कुठे आहे ते पहा आणि त्यांची समजूत काढा... आपल्या मुलाचा राग तुम्हाला माहित आहे ना... आपल्याला त्याची सवय झाली आहे, पण त्या अजून या घरात नवीन आहेत.... त्यांना सगळ्यांचे स्वभाव समजेपर्यंत आपल्यालाही त्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे.... " आदित्य राज शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतात....
" हो sss मी सुनबाईंना पाहून येते.... " रेवती बोलून फोन ठेवून देतात....
श्रेयसा स्टडी रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर बसून रडत तशीच झोपून जाते... खूप रडल्यामुळे तिचे डोळे थकलेले असतात... शिवाय दिवसभर ऑफिस आणि बाहेर फिरणे झाल्यामुळे तशीच तिला झोप लागते...
" श्रेयसा...... श्रेयसा बाळा.... " रेवती आपल्या घरात सगळीकडे शोधून शेवटी आर्य च्या रूममध्ये येऊन इकडे तिकडे पाहत तिला हाक मारू लागते... तिला ती त्या रूममध्ये कुठेही दिसत नाही... स्टडी रूम मध्ये जाऊन ती झोपली असेल , असा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही.... ते आपल्या फोन हातात घेऊन तिला फोन करतात.... तिच्या फोनची रिंग बाजू लागते, तशी त्यांची नजर स्टडी रूमच्या दिशेने जाते...
" श्रेयसा बाळा... तू आता आहेस का ? " रेवतीला तो दरवाजा काही उघडता येत नाही त्यामुळे त्या दरवाजावर थाप मारत मोठ्या आवाजाने विचारतात....
फोनच्या आवाजाने श्रेयसा ला ही जाग येते तशी ती जागेवर उठून बसते... रेवती चा आवाज ऐकून ती पटकन दरवाजाच्या जवळ येऊन उभी राहते...
" हो sss... " श्रेयसा आतून त्यांना आवाज देते....
" अगं , मग दरवाजा उघड की.... " रेवती
श्रेयसा आपले डोळे व्यवस्थित पुसून आपला अवतार ठीक करून स्टडी रूमचा दरवाजा उघडते...
" तू इकडे काय करत होतीस? " रेवती एक नजर त्या स्टडी रूम कडे पाहून तिला विचारते...
" ते आई, मी तेsss इकडे स्टडी रूम मध्ये बसून माझ्या कॉलेज चा अभ्यास करत होते... अभ्यास करता करता मध्येच कधी झोप लागली मला समजलं नाही... " श्रेयसा त्यांना खोटं कारण सांगते....
" बरं ठीक आहे.... तू खूप वेळ झाला तू दिसली नाहीस ना म्हणून काळजी वाटली... अभ्यास झाला असेल तर खाली ये... तुलाही थोडं बरं वाटेल... " रेवती
" हो sss मी फ्रेश होऊन येते... " श्रेयसा
रेवती होकार देऊन रूममधून बाहेर निघून जातात आणि श्रेयसा बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जाते...
’ ती रूमही त्याची आणि ते बाथरूम ही त्याचे... मी अजूनही त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या रूममध्ये वावरत आहे... ’ श्रेयसा च्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तिला अजून रडू येते... मागच्या काही दिवसात तिला कधीही असे जाणवले नव्हते, पण आज मात्र तिला पुन्हा एकदा ते घर तिच्यासाठी परके वाटू लागते...
श्रेयसा आपला चेहरा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करते, केसं नीट करते आणि त्या रूम मधून बाहेर जाते.... तिच्या मनामध्ये सतत आर्याचे शब्द घुमत असतात त्यामुळे आता त्या रूममध्ये थांबण्याची इच्छाही होत नाही... पण माहित नाही का तरीही त्याची काळजी वाटू लागते....
रेवती मावशी सोबत किचन मध्ये काम करत असतात.... श्रेयसा त्यांना तिकडे पाहते आणि किचन मध्ये येऊन उभी राहते... ती अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत असते...
" काय झालं ? काही विचारायचे आहे का ? " तिचा तो अस्वस्थपणा पाहून रेवती समोरून विचारते...
" ते sss मगाशी ते रागानेच घरातून बाहेर निघून गेले... अजून घरी आला नाही... " मनामध्ये कितीही राग असला तरी मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्याच्याबद्दल काळजीही डोकावत असते...
" काळजी नको करूस, तो ठीक आहे... थोड्या वेळापूर्वीच मी त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले होते... त्यांची माणसं त्याला शोधण्यासाठी गावात फिरत होते तेव्हा समजले की गावाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या परिसरामध्ये जाऊन तो बसला आहे... त्याचा राग शांत झाला की घरी येईल... " रेवती तिला सांगते...
" पण ते एवढे रागात का होते ? " श्रेयसा
" मलाही त्याबद्दल काही माहित नाही... तो घरी आल्याशिवाय काही समजणार नाही... पण त्याचीही पहिल्यापासून ची सवय आहे त्याला जेव्हा कधी असा जास्त राग येतो तेव्हा तो मोकळ्या आणि शांत ठिकाणी जाऊन बसतो... जेव्हापासून त्याला ती गाडी भेटली आहे , तेव्हापासून तर तो गावाच्या बाहेर असलेल्या त्या मोकळ्या परिसरातच जाऊन बसतो... आता त्याच्या अशा वागण्याची आम्हाला सवय झाली आहे, तुलाही थोड्या दिवसात होईल.... " रेवती शांतपणे तिच्याकडे पाहून तिला म्हणाली... तो सुखरूप आहे हे ऐकून कुठेतरी तिच्या मनालाही शांती लाभली....
श्रेयसा चे आज कशातही मन लागत नव्हते, तिला किचनमध्येही काही काम करण्याची इच्छा नव्हती त्यामुळे ती शांतपणे हॉलमध्ये येऊन आपले मन रमण्यासाठी टीव्ही बघण्याचा प्रयत्न करू लागली.... तिच्या वागण्यावरून रेवतीलाही समजले म्हणून रेवतीनेही तिला किचनमध्ये काही करायला सांगितले नाही...
श्रेयसा टीव्ही पाहत तर होते पण मनात मात्र आर्याची शब्द फिरत होते... आज किती आनंदाने तिने ती सगळी शॉपिंग केली होती, पण त्याला मात्र ते काहीच आवडले नाही उलट त्याने तिने इतक्या प्रेमाने आणलेले ते शोपीस तोडले म्हणून तिचं मन जास्तच भरून येत होते...
बाहेरून गाडीचा आवाज येतो तसे आत श्रेयसा हॉलमध्ये व्यवस्थित बसते.... थोड्या वेळातच आदित्य राज मुख्य दरवाजा मधून आत येतात... आर्यव्रत ही त्यांच्यासोबत असतो... श्रेयसा एक नजर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून पटकन आपल्या जागेवरून उठून उभी राहते आणि त्या दोघांना पाहून पाणी घेऊन येण्यासाठी किचनमध्ये जाते...
" ते sss बाहेर ते आले आहेत... मी ते पाणी... " श्रेयसा किचनमध्ये जाऊन रेवतीला सांगत पाण्याचे दोन ग्लास भरते.... त्या दोघी पण किचन मधून बाहेर येतात... श्रेयसा आपल्या हातात असलेला ट्रे घेऊन आधी आदित्य राज यांच्या समोर जाऊन उभी राहते... ते एक पाण्याचा ग्लास उचलून घेतात... त्यानंतर ती आर्यव्रत च्या समोर येऊन उभी राहते परंतु त्याच्याकडे पाहत नाही....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
