Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग १७

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग १७

आर्यव्रत ही तिच्याकडे न पाहताच पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावतो... ती तिकडून बाजूला जाऊन उभी राहते... त्याचा राग निवळलेला नसतो, फक्त आपल्या वडिलांच्या बोलण्यावरून तो परत आलेला असतो... अजूनही त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या सॉफ्टवेअर बद्दलचे विचार फिरत असतात आणि तोही पूर्णपणे त्याच्याच नादात असतो...

" जेवण तयार आहे , वाढू का ? " रेवती एक नजर आर्य कडे पाहून आदित्य राज यांना विचारतात...

" हो... खूप भूक लागली आहे... तुम्ही वाढायला घ्या तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो... आर्य तू पण रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन ये... " आदित्य राज आपल्या जागेवरून उठत त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाले... तसा तो ही काही न बोलता आपल्या जागेवरून उठला आणि आपल्या रूमच्या दिशेने निघून गेला... त्याने जाताना एक नजर श्रेयसा कडे पाहिलेही नाही...

श्रेयसा मात्र चोरट्या नजरेने कधीपासून त्याच्याकडे पाहत होती... तो आपल्याला ओरडला , आपण आणलेले नवीन काचेचे शोपीस तोडले निदान आता तरी या सगळ्या गोष्टीसाठी तो आपल्याला सॉरी बोलेल असं तिच्या मनाला वाटत होते, पण त्याने साधं तिच्याकडे पाहिलेही नाही म्हणून अजूनच तिला त्रास होत होता...

आर्य रूम मध्ये जात असताना तिलाही मनातून असे वाटत होते की,  आपणही त्याच्या मागे जावे पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग पाहून अजूनही तिला त्याच्यासमोर जाण्याची भीती वाटत होती त्यामुळे ती खालीच थांबून रेवतीला मदत करू लागली...

आर्य रूम मध्ये जाऊन फ्रेश झाला कपडे चेंज करून तो बाहेर आला... त्याच्या फोनची रिंग वाजत होती...

" तुम्ही विचारले का कोणाला ? तो सॉफ्टवेअर परत चालू करण्यासाठी आपली कोणी मदत करू शकतो का ? मला तरी असे वाटते की त्याच्यामध्ये आलेला तो एरर निघाला की तो सॉफ्टवेअर व्यवस्थित चालू होईल... " आर्यव्रत अपेक्षेने म्हणाला...

" हो मी काही जणांसोबत त्या सॉफ्टवेअर बद्दल डिस्कस केल आहे.... ते उद्या कंपनीमध्ये येणार आहेत... तेव्हा उद्या ऑफिसमध्ये आल्यावर बघू... " समोरचा व्यक्ती म्हणाला...

" या सॉफ्टवेअर साठी मी खूप मेहनत केली आहे.. कधी एकदा तो व्यवस्थितपणे चालू होतो असे झाले आहे... " आर्यव्रत आपल्या मनात असलेली भीती बोलून दाखवतो...

" नको जास्त टेन्शन घेऊ... तो वर आहे ना टेन्शन घेण्यासाठी , तुझी मेहनत आमच्या सोबत त्यानेही पाहिली आहे... तो  सगळं काही नीट करेल... " समोरचा व्यक्ती त्याला दिलासा देत म्हणाला.... थोडा वेळ त्याच्यासोबत बोलून आर्य ने फोन ठेवून दिला....

" अहो sss आर्य अजून खाली आला नाही... " आदित्य राज बाहेर आल्याबरोबर रेवतीने काळजीने त्यांना सांगितले...

" जा.... जाऊन आर्य ला बोलवा... " आदित्य राज यांनी त्यांच्या घरात काम करत असलेल्या मावशीला सांगितले... त्या मावशी त्यांच्या रूमच्या दिशेने गेल्या...

" तुम्ही दोघी पण बसा... आर्य येईल... " आदित्य राज त्या दोघींकडे पाहून त्यांना म्हणाले... रेवतीने श्रेयसा ला बसण्याचा इशारा केला तशी ती आपल्या जागेवर जाऊन बसली... रेवतीने त्या दोघांनाही जेवण वाढले....

" दादा, साहेबांनी तुम्हाला खाली बोलावले आहे.... सगळे जेवणासाठी तुमची वाट पाहत आहे... " मावशीने त्याच्याकडे पाहून त्याला सांगितले...

" हो sss मी येतो... " आर्य त्यांच्याकडे पाहून म्हणाला तशा मावशी खाली निघून आल्या... त्यांच्या मागोमाग पाच मिनिटातच आर्य ही खाली आला आणि इकडे तिकडे न पाहता सरळ आपल्या खुर्चीवर येऊन बसला...

" बाळा,  हे बघ तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे... " रेवती आनंदाने त्याला जेवण वाटत होत्या... रागाच्या भरात आपला मुलगा उपाशी तर राहणार नाही ना,  याची काळजी त्यांना लागून राहिली होती...

" आई मला जास्त भूक नाही त्यामुळे तू  आधी थोडस वाढ, मला जर वाटले तर मी अजून घेईल.... " आर्य मान खाली घालून आपल्या प्लेट कडे पाहत म्हणाला... रेवतीने थोडे थोडे पदार्थ त्याच्या प्लेटमध्ये वाढले... त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली...

श्रेयसा जेवतानाही मध्ये मध्ये एक चोर कटाक्ष त्याच्यावर टाकत होती, पण त्याचं मात्र कोणाकडेही लक्ष नव्हतं... तो आपल्या प्लेटमध्ये वाढलेले पदार्थ संपवण्याच्या मागावर होता.... त्याला जेवणाची इच्छा नव्हती परंतु आपल्या आई वडील नाराज होतील यामुळे त्याने इच्छा नसतानाही थोडं पोटात ढकलण्याचा प्रयत्न केला...

" आर्य, अरे अजून थोड घ्यायचं ना... " त्याला उभा राहिलेले पाहून रेवती म्हणाल्या....

" नको... मला बस झाल... " त्याने कोणाकडेही न पाहता उत्तर दिले आणि सरळ बेसिन मध्ये हात धुतल्यावर आपल्या रूममध्ये निघून गेला...

" आज काय झाल आहे त्याला ? कोणाशी नीट बोलतही नाही की,  कोणाकडे नीट बघत ही नाही... " रेवती काळजीने म्हणाल्या...

" तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून त्याने घरी येऊन थोडं खाल्ल आहे ना... आता अजून काही अपेक्षा करू नका... झाल असेल ऑफिसमध्ये काहीतरी.. राग निवळला की होईल शांत आणि मग एकदा का शांत झाला की तुमच्या सोबत बोलल्याशिवाय राहणार नाही तो... " आदित्य राज त्यांच्याकडे पाहून समजावण्याच्या स्वरात म्हणाले...

" हम्म... " रेवती पण शांतपणे जेवण करू लागल्या... श्रेयसा ला ही आज भूक नव्हती... आज आर्य तिच्यासोबत काहीही बोलला नाही, साध तिच्याकडे पाहिलंही नाही... त्याच्या अशा वागण्याने तीही बेचैन झाली होती... त्याच्या वागण्याचा अर्थच तिला समजत नव्हता... जेवण झाल्यावरही तिची रूममध्ये जाण्याची इच्छा नव्हती म्हणून ती खाली थांबून रेवतीला मदत करत होती...

" सगळी कामे झाली आहे आणि आता उशिर ही खूप झाला आहे... तू पण तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर आणि हो sss तू आधीच रागात आहे त्यामुळे आज तरी निदान त्याच्यासोबत काही बोलण्याचा प्रयत्न करू नकोस... उद्या तो शांत झाला की, स्वतःहून तुझ्यासोबत बोलायला येईल..." रेवती तिच्याकडे पाहून तिलाही समजावतात... श्रेयसा त्यांचं बोलणं ऐकून होकारात मान हलवत वर निघून येते...

रेवती आपल्या रूममध्ये निघून जातात आणि श्रेयसा ही वरच्या मजल्यावर निघून येते... ती बराच वेळ रूम च्या बाहेर उभी राहून विचार करत असते... थोड्या वेळापूर्वी त्याचा पाहिलेला राग आठवून अजूनही तिच्या अंगावर काटा उभा राहतो... त्याच्यासमोर जाण्याची तिला भीती वाटू लागते...

त्यांच्या रूमच्या बाजूलाच दोन रिकाम्या रूम होत्या... घरामध्ये काही पाहुणे आले की त्या रूम मध्ये राहण्याची सोय करत होते... श्रेयसा ही लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी खाली अशाच एका रूममध्ये  राहिली होती म्हणून ती आताही त्या बाजूच्या रूममध्ये जाऊन बसली....

’ काय करू ? रूम मध्ये गेले की परत एकदा त्यांच्या रागाचा सामना करावा लागेल का ? आता तर मला त्यांच्यासोबत काही बोलायची ही भीती वाटत आहे... उलट मलाच त्यांच्यावर रागवायला पाहिजे... मी इतक्या आनंदाने ती सगळी खरेदी केली होती पण ते मात्र माझ्यावर रागावले, मी आणलेली वस्तू ही तोडली आणि एका शब्दाने ही माझी माफी मागितली नाही...

मला मागच्या काही दिवसापासून असे वाटत होते की, जरी आमच्यामध्ये नवरा बायकोचे नाते नसले तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो आहे, पण आज त्यांचं बोलणं ऐकून मला हे समजले की , ते मला आपली चांगली मैत्रीण ही मानत नाही... त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये राहायला देऊन माझ्यावर उपकार केले आहे आणि ही गोष्ट मला मान्य नाही... मी अशा रूम मध्ये राहू शकत नाही... ’ श्रेयसा पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना तिचे मन भरून येते आणि डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागतात....


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all