डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग १८
श्रेयसा बाजूच्या रूममध्ये असलेल्या सोफ्यावर बसून विचार करत रडत असते... तिकडेच तिला कधी झोप लागते तिच तिलाही समजत नाही... ती त्या रूम मध्येच झोपून जाते...
आर्यव्रत आपल्या रूम मध्ये आल्यापासून मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर चालू करण्यासाठी काही करता येईल का याचीच माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असतो... त्याचे पूर्ण लक्ष त्याच्या त्या सॉफ्टवेअरला चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये अडकलेले असते त्यामुळे दिवसभरात काय घडले आहे किंवा श्रेयसा सोबत तो जसा वागला त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये काहीही विचार नसतो... त्यामुळेच तिला आलेल्या रागापासून हा वंचित असतो...
बराच वेळ तो आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून वैतागतो आणि मग तसाच झोपून जातो....
सकाळी त्याला लवकरच जाग येते, पण आज त्याला काही करण्याची इच्छा नसते त्यामुळे तो लवकर आपली तयारी करतो... कधी एकदा ऑफिसला जाऊन आपल्या सॉफ्टवेअरला चालू करण्याचा प्रयत्न करू असे त्याला झाले असते...
रात्री श्रेयसा रूम मध्ये आली नाही किंवा मग आपण तिला बघितले नाही तिच्याशी बोललो नाही असा कोणताही विचार त्याच्या मनामध्ये नसतो... तो आपल्या नादात आपली तयारी करून रूम मधून बाहेर पडतो आणि सरळ खाली हॉलमध्ये येतो...
" आर्य sss अरे, इतक्या लवकर तयारी करून कुठे निघाला आहेस ? " रेवती त्याला वेळेच्या आधीच तयारी करून खाली आलेले पाहून आश्चर्याने विचारते...
" आई, माझे महत्त्वाचे काम आहे मला लवकरच ऑफिसला जायचं आहे... " आर्यव्रत
" पण तू याबद्दल काल काहीच बोललं नाही... बरं, तू दहा मिनिटे बस फक्त मी काहीतरी पटकन नाश्ता बनवून तुझ्यासाठी घेऊन येते... " रेवती काळजीने त्याच्याकडे पाहून म्हणाली...
" नाही.... नको आई, मी ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी खाईल... आता माझ्याकडे थांबण्यासाठी वेळ नाही... " आर्यव्रत बोलतच घराच्या बाहेरही पडतो...
’ कालपासून माझ्या बाळाला नक्की काय झालं आहे , काहीच कळायला मार्ग नाही... देवा! माझ्या आर्य च्या डोक्यावर आलेले टेन्शन लवकर दूर कर... ’ रेवती दोन्ही हात जोडून वर पाहत म्हणाली....
काही वेळा ने श्रेयसा ला जाग आली... तिने डोळे किलकिले करत उघडत आजूबाजूला पाहिले... आजूबाजूला दिसलेली अनोळखी रूम पाहून ती खाडकन डोळे उघडून आपल्या जागेवर उठून बसली... तिला कालची रात्र आठवली आणि तिचं मन पुन्हा एकदा उदास झाल...
’ काल रात्री मी रूम मध्ये गेले नाही, तर त्याला मी कुठे आहे हेही जाणून घेणे गरजेचे वाटले नाही का ? म्हणजे त्याला माझ्या असण्या नसण्याचा काही फरक पडत नाही.. तसे त्याने आधीच मला सगळे स्पष्टपणे सांगितले होते की, या जबरदस्तीच्या अनिश्चित बंधनाने तो ही माझ्या सोबत अडकला आहे आणि त्याला हे बंधन नको आहे... मी त्याला या बंधनामध्ये अडकवण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही... ’ श्रेयसा मनाशी खोल विचार करत जागेवरून उठून उभी राहते...
तिच्या रूमचा दरवाजा तिथे कालपासून लागलेला नसतो फक्त अलगद पुढे ढकलला असतो.... ती तो दरवाजा उघडून हळूच बाहेर येते... आर्यव्रत च्या रूम चा दरवाजा ही थोडा उघडा असतो त्यामुळे तिला आत जाण्याची थोडी भीती वाटू लागते...
’ काय करू, आत मध्ये जाऊ का? पण जर मी डायरेक्ट खाली केले तर आई मला अशी का आली म्हणून नक्कीच विचारतील आणि तेव्हा त्यांच्या प्रश्नांना मी काय उत्तर देऊ ? माझे सगळे सामानही याच रूममध्ये आहे...
मी एक काम करेल , सरळ रूमच्या आत जाईल.... तो समोर असला तरी त्याच्याकडे बघणारही नाही आणि त्याच्यासोबत काही बोलणारही नाही, माझे कपडे घेऊन डायरेक्ट अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये निघून जाईल... हो sss बरोबर.. मी असंच करणार ! ’ आपल्या मनाशी ठरवून श्रेयसा ने हिम्मत करून त्या रूमचा दरवाजा उघडला आणि सरळ आत गेली...
आजूबाजूला पाहताना तिला त्या रूममध्ये कोणीच दिसले नाही... तिने एका पाठवून आपले कपडे घेतले आणि पटकन बाथरूम मध्ये शिरली.... थोड्यावेळाने ती अंघोळ करून बाहेर आली... तरीही त्या रूममध्ये कोणीही नव्हते...
’ आर्य कुठे आहे? या वेळेला तर ते जिम करून बाहेर येतात आणि फ्रेश व्हायला जातात... त्यांच्या जिम मध्ये जाऊन बघू का? ’ श्रेयसा च्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले....
’ नाही.... नको... जर ते जिम मध्ये असतील आणि मला पाहिले तर उगाच नको... पण इतका वेळ तर ते जिम मध्ये बसून राहत नाही... काय करू? ’ श्रेयसा स्वतःच्या विचारांमध्ये गुंग होऊन कधी जिम च्या दरवाजे पर्यंत येऊन पोहोचते तिच तिला समजत नाही...
श्रेयसा ला त्याचा रागही आलेला असतो परंतु कालपासून त्याची ती अस्वस्थता पाहून काळजीही वाटत असते त्यामुळे ती स्वतः द्विधा मनस्थिती मध्ये अडकली असते... होय नाही करत शेवटी ती हिंमत करत जिमचा दरवाजा उघडते आणि हळूच डोकावून आत पाहू लागते.... आत तिला कोणीही दिसत नाही... ती दरवाजा पूर्ण उघडून आत जाते... जिम मध्ये ही कोणी नसते...
’ आर्य इकडे ही नाही.... मग कुठे गेले असतील ? खाली नाश्ता करायला तर गेले नसतील ना... पण इतक्या लवकर... ’ श्रेयसा विचार करत जिमचा दरवाजा बंद करून बाहेर येते आणि रूम मधून खाली हॉलच्या दिशेने जाऊ लागते....
" श्रेयसा.... ये ss बस... " रेवती तिला पाहून म्हणाली...
" आई... ते सगळ्यांनी नाष्टा केला का ? " श्रेयसा हॉलमध्ये सगळीकडे आपली नजर फिरवत विचारते...
" नाही ग, अजून कोणीच नाष्टा केला नाही... तुमचे बाबा त्यांची तयारी करून आता थोड्या वेळात बाहेर येतील... आणि मी पण सगळ्यांची वाट पाहत बसले होते... " रेवती
" हो sss का... मग ते... " अजून कोणीही नाष्टा केला नाही मग आर्य इकडेही नाही, कुठे असतील? श्रेयसा त्याच्या विचारांमध्ये गुंतून जाते..
" काय ग, काय झालं ? कसला विचार करत आहेस ? " तिला असा विचार करताना पाहून रेवती विचारते....
" आई, ते आर्य रूममध्ये नाही.... " श्रेयसा अखेर त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाली....
" हो sss कारण तू सकाळी लवकर उठूनच ऑफिसला गेला आहे.... मी पण नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती.... तेव्हा तो मला खाली येताना दिसला, मी त्याला नाश्ता करण्यासाठी थांबायला सांगितले तर नको म्हणाला आणि तसाच निघून गेला.... आज पण तुम्हाला ठीक वाटला नाही... नक्कीच त्याला काहीतरी त्रास आहे पण तो सांगत नाही.... " रेवती काळजीने आपल्या मुलाचा विचार करत म्हणाली....
’ म्हणजे आर्य आज लवकर निघून गेला आणि मी मगासपासून त्यांच्या विचार करत आहे... त्यांना मात्र माझ्याबद्दल काहीही फरक पडत नाही... मी काल त्यांच्या रूममध्ये नव्हते ही गोष्ट ही त्यांना माहीत नसेल किंवा त्यांच्यासाठी महत्त्वाची नसेल... ’ श्रेयसा चे मन भरून आले....
" शुभ प्रभात.... आजची सकाळ एवढी शांत का वाटत आहे... तुम्ही दोघेही अशा शांत का बसलेल्या आहात ? नेहमी हॉलमध्ये येताच तुमच्या दोघींच्या बोलण्याचा आवाज ऐकण्याची आता सवय झाली आहे... " आदित्य राज त्यांच्या दिशेने येत त्या दोघींकडे पाहून त्यांना विचारतात...
" तुमचीच वाट पाहत होतो... याsss बसा... मी आपल्या सगळ्यांसाठी नाष्टा घेऊन येते... " रेवती त्यांच्याकडे पाहून जागेवरून उठून उभी राहते.....
" हे काय , आपण तिघेच आणि तुमचे चिरंजीव कुठे आहे ? श्रेयसा तो अजून रूम मध्येच आहे का ? " आदित्य राज त्या दोघींकडे पाहून त्यांना विचारतात...
" नाही... ते रूममध्ये नाहीत... " श्रेयसा
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा