Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २०

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणत्या नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २०

" आर्यव्रत आधी माझं नीट ऐकून घे.. अशावेळी पॅनिक होऊन काही उपयोग नाही... तुझा सॉफ्टवेअर परत रिकव्हर करता येईल , पण थोडा वेळ लागेल आणि या सगळ्या कामांमध्ये काही दिवस ही जातील.. काम थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही... " तो सॉफ्टवेअर वाला व्यवस्थितपणे सगळ चेक करून त्यांना सांगतो..

" माझा सॉफ्टवेअर पूर्णपणे रिपेअर होण्यासाठी किती दिवस लागतील ? " आर्यव्रत ने अपेक्षेने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारलं...

" ठराविक कालावधी सांगू शकत नाही परंतु कमीत कमी सात दिवस तरी समज ... जर शक्य झाले तर पुढच्या दोन ते तीन दिवसात ही रिकव्हर होऊ शकतो नाहीतर सात दिवस लागतील पण मी पूर्ण रिकव्हर करून देईल... मला त्याचे layers उलगडावे लागतील... त्याचा काही बॅकअप आहे का ? " तो सॉफ्टवेअर वाला दिलासा देत म्हणाला...

" पूर्ण बॅकअप नाही परंतु जेव्हा या सॉफ्टवेअरच अर्धवट काम झालं होतं तेव्हा एकदा मी त्याचा बॅकअप घेतला होता... त्यानंतर बॅकअप घेण्याचा विचार केला होता परंतु कामाच्या नादात विसरून गेलो... " आर्यव्रत स्वतःच्या चुकीवर पश्चाताप करत म्हणाला...

" प्रत्येक प्रोग्रामरच्या आयुष्यात असा एक दिवस येतो ज्यामधून तो हे सगळं शिकतो आणि तो दिवस आता तुझ्या आयुष्यात आला आहे... " तो सॉफ्टवेअर वाला त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला...

" हो ss आता समजत आहे इतके दिवस ज्याला मी सहजपणे समजत होतो तीच गोष्ट किती महत्त्वाची होती... मागच्या काही दिवसात माझ्या आयुष्यातही खूप उलटापालथ झाली म्हणून मी या कामाकडे थो दुर्लक्ष केलं आणि त्याचे हे परिणाम मला आता भोगावे लागत आहे... " आर्यव्रत नाराजीच्या स्वरात म्हणाला...

" सुदैवाने तुझं सॉफ्टवेअर अजून जिवंत आहे फक्त coma मध्ये आहे... मी प्रयत्न करतो... १००% वाचेल असं नाही म्हणणार पण १००% हार मानणारही नाही... " सॉफ्टवेअर वाल्याने एक आशेचा किरण दाखवला...

आर्यव्रत च्या डोळ्यांत थोडी चमक परत आली… पण चिंता अजूनही होती... जोपर्यंत त्याचा सॉफ्टवेअर व्यवस्थित चालू होत नाही तोपर्यंत त्याचं मन थाऱ्यावर येणार नव्हते...

"माझ्यासाठी हे फक्त software नाही, माझं स्वप्न आहे ते.... मी माझं सगळं यात घातलंय… माझ्या आयुष्याची पहिली मोठी ओळख…" आर्यव्रत

"मग त्या स्वप्नाला इतक्यात मरू देऊ नको... मी full recovery mode ला जाऊन काम करेन. पण लक्षात ठेव…
हा battle आहे. प्रत्येक तासाला धीर लागेल. And yes… मला तुझा complete support लागणार आहे... " सॉफ्टवेअर वाला व्यक्ती

आता त्याच्या चेहऱ्यावरचे आधीचे हताश भाव नाहीसे झाले होते आणि एक दृढ निश्चय दिसू लागला होता...

"ठीक आहे... कितीही दिवस लागले तरी चालतील..
पण हे सॉफ्टवेअर परत उभं करायचंच! या वेळी मी हार मानणार नाही." आर्यव्रत

"मग तयार हो. पुढचे काही दिवस तुला झोप, वेळ, सगळं विसरायला लागेल. हे mission सोपं नाही. पण तुझ्यासारखं software बनवणारा व्यक्ती इतक्यात तुटायला नको.
चला सुरू करू." सॉफ्टवेअर वाला आपल्या जागेवरून उठला त्याने टेबलवर असलेली USB drive आपल्या हातात घेतली आणि आर्य कडे पाहून म्हणाला...

" आता जोपर्यंत हे सॉफ्टवेअर व्यवस्थित सुरू होत नाही मी दुसरा कसलाही विचार करणार नाही... पाहिजे तर मी दिवस-रात्र इकडेच थांबून मेहनत करेल पण माझं सॉफ्टवेअर चालू करेल... हे सॉफ्टवेअर माझ्या आयुष्यातील पहि सॉफ्टवेअर आहे माझ्या शिक्षणाचा पाया आणि इतक्या महिन्याची मेहनत आहे आणि मुख्य म्हणजे ते मी गावाच्या भल्यासाठी बनवले आहे त्यामुळे इतक्या सहज मी हार मानणार नाही... " आर्यव्रत त्याचा निर्णय दृढ झाला... त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास परत आल्यामुळे त्याच्यासोबत असलेला कॉलिग आणि सॉफ्टवेअर रिकव्हर करण्यासाठी आलेला व्यक्ती ही हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला...

आज दिवसभर त्यांची आर्यव्रत च्या केबिनमध्ये मीटिंग होती... त्यांचे फोन बाजूच्या टेबलवर सायलेंट मोडवर पडलेले होते त्यामुळे दिवसभरात कोणाकोणाचे फोन आले याच्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते... आर्यव्रत चा फोनही तिकडेच असल्यामुळे श्रेयसा चा फोन आलेला त्याला समजले नाही आणि त्याच्याकडून तो उचलला गेला नाही...


******************************
श्रेयसा च्या मनात मात्र या सगळ्याने लगेच विचार निर्माण झालेले असतात... त्याच्याकडून नकळतपणे घडणारे प्रत्येक कृतीमुळे ती त्याच्यापासून अजून दूर जाऊ लागते... तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी राग निर्माण होऊ लागतो... त्याच्या आयुष्यात चालणाऱ्या घडामोडी बद्दल त्याने तिलाही सविस्तरपणे काही सांगितलेले नव्हते त्यामुळे तिचा असा विचार करणे सहाजिक होते....

’ त्याला जर माझ्याबद्दल काही वाटत नाही तर मी का उगाचच त्याचा विचार करत आहे... त्याने लग्नाच्या पहिल्या दिवशीच क्लिअर केले होते की हे लग्न जबरदस्ती चे आहे आणि मीही ते मान्य केले होते मग तरीही का माझ्या मनाला त्याची काळजी वाटते... श्रेयसा खरच तू खूप जास्त विचार करत आहेस... बहुतेक त्यांच्या घरात त्याच्या त्या रूममध्ये राहत असल्यामुळे तुझ्या डोक्यात सारखे त्याचे विचार फिरत असतील...

तुझ्या डोक्यात चालू असलेले विचार डोक्यातून बाहेर घालवण्यासाठी तुलाही थोड्या वेगळ्या वातावरणाची गरज आहे....  ’ श्रेयसा कॉलेजमध्ये बसून बराच वेळ विचार करत होती.... मनाशी निर्णय पक्का करूनच ती आज कॉलेजमधून घरी आली...

" आलीस बाळा.... काय झालं ? तू ठीक आहेस ना ? " तिच्या चेहऱ्यावर असलेली उदासी पाहून रेवतीने विचारले...

" हो sss मी ठीक आहे... " श्रेयसा

" मग तुझा चेहरा असा का दिसत आहे... आज थकली आहेस का ? " रेवती

" हो ss आम्हाला कॉलेजमध्ये एक असाइनमेंट दिले आहे ... वेळ कमी दिला आहे आणि त्या वेळात ते असाइनमेंट पूर्ण करून कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहे... " श्रेयसा

" ठीक आहे...  आत्ताच कॉलेजमधून आली आहेस ना जा आधी फ्रेश होऊन ये खाली... मी तुझ्यासाठी गरम कॉफी घेऊन येते म्हणजे तुला बरं वाटेल... " रेवती

श्रेयसा आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते, परंतु जशी ती त्या रूमचे दार उघडते तसे तिच्यासमोर आर्यव्रत चा चेहरा दिसू लागतो... मागच्या काही दिवसापासून त्या रूममध्ये त्यांच्या काही गोड , कडू अशा आठवणीही तयार झालेले असतात... त्या सगळ्या तिला आठवतात...

’ जोपर्यंत मी या रूममध्ये आहे तोपर्यंत त्याच्या विचार माझ्या डोक्यातून जाणार नाही त्यामुळे काही दिवस तरी मला या रूममध्ये यायला नको... ’ श्रेयसा रागाने विचार करत आपले कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी निघून जाते... फ्रेश झाल्यावर ती सरळ खाली येते....

" आई... " श्रेयसा

" हा sss बोल ना... " रेवती

" आई ss मी काही दिवसासाठी माझ्या माहेरी जाऊ का ? " श्रेयसा अचानक तिच्याकडे पाहून तिला प्रश्न विचारते तशी रेवती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते...

" का ग, आज अचानक असे का वाटत आहे ? काही झाले आहे का ? आर्य काही बोलला का? " रेवतीने काळजीने तिच्याकडे पाहून तिला विचारले...

" नाही... असे काही नाही... मलाच मागच्या काही दिवसापासून आईची खूप आठवण येत आहे आणि तसेही त्या दिवशी तुम्ही बोलला होता ना की , मी पाहिजे तर काही दिवस आईकडे जाऊन राहू शकते... मला दोन दिवस झाले त्या घराची, आईची खूपच आठवण येत आहे म्हणून विचार केला की , काही दिवस तिकडे जाऊन येते... " श्रेयसा

" ठीक आहे ग... कितीही झाले तरी ते तुझे माहेर आहे... त्या घरात तू लहानाची मोठी झाली आहे त्यामुळे त्या घराची,  आपल्या आई-वडिलांची आठवण येणे साहजिक आहे... हे दोन्हीही तुझेच घर आहे तुला पाहिजे तेव्हा तू जाऊ शकते... पण माझ एक ऐकशील का ? " रेवती हळू आवाजात तिच्याकडे पाहून तिला विचारतात...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all