डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग २२
आर्यव्रत त्याच्या नादातच घरातून बाहेर निघूनही जातो.. श्रेयसा त्याला तशीच पाहत उभी राहते...
" श्रेया... बाळा ये बस... " रेवती तिला पाहून म्हणाली... ती त्यांच्याजवळ जाऊन बसली परंतु तिची आता काय खाण्याची ही इच्छा नव्हती... तिच्या प्रेमाने तिने त्याच्यासाठी नाश्ता बनवला होता आणि त्याने त्याच्याकडे पाहिलेही नाही... स्वतःच्या आई-वडिलांसोबत बोलायला त्याच्याकडे थोडा तरी वेळ होता पण माझ्याकडे बघायलाही वेळ नाही... एखाद्या माणसाने चांगलं वागून अचानक इतकेही दुर्लक्ष करू नये... तिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होऊ लागले...
" काय ग... कोणत्या विचारात हरवली आहेस ? काही खातही नाही... " रेवती तिच्या प्लेटमध्ये अन्न तसेच पाहून विचारतात...
" तेss मी आज माझ्या घरी... " श्रेयसा त्यांच्याकडे पाहून म्हणाली... एक एक शब्द उच्चारायला तिला कठीण जात होता...
" हो ss आज तुझे बाबा तुला कॉलेजमध्ये आणायला येतील आणि तसेच तिकडून तुझ्या माहेरी सोडतील... " रेवती एक नजर आदित्य राज यांच्याकडे पाहून तिला म्हणाली...
" चालेल... " आपल्या प्लेटमध्ये असलेले पदार्थ कसेबसे संपवून श्रेयसा उठली आणि रूम मध्ये जाऊन आपली तयारी करू लागली.... तिने एका वेगळ्या बॅगमध्ये आपले काही सामान घेतले... स्टडी रूम मधून बॅग घेऊन बाहेर रूममध्ये आल्यावर आजूबाजूला सगळीकडे पाहत तिच्या मनामध्ये अनेक फिलिंग येऊ लागल्या... आर्यव्रत ची आठवण येऊ लागली....
या रूममध्ये राहायला आल्यापासून त्याच्यासोबत झालेलं बोलणं, त्याची मैत्री, त्यांनी तिची घेतलेली काळजी , त्या दोघांचं एकमेकांसोबत हसणं, सगळंच तिला आठवत होते आणि मन भरून येऊ लागले... त्या रूम मधून पाय बाहेर निघत नव्हता... आपल्या सोबत हे काय होत आहे हेही तिला समजत नव्हते... तरीदेखील मन घट्ट करून ती बाहेर आली...
" मी कॉलेजला जाते... बाबा जेव्हा मला घ्यायला येतील तेव्हा त्यांच्या गाडीत ही बॅग पण द्या... " ती तिची बॅग खाली हॉलमध्ये ठेवत रेवतीला सांगत होती...
" हो sss सांभाळून जा आणि लवकर घरी परत ये... आता मला पण तुझी अशी सवय झाली आहे की तुझ्याशिवाय राहण्याचा विचारच येत नाही... " रेवती तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली...
" हम्म... " तिने फक्त हसून हुंकार भरला आणि तिचे आशीर्वाद घेऊन घराच्या बाहेर पडली... आज आपल्या मनातले सगळे विचार बाजूला झटकून तिने कॉलेज मध्ये आपल्या अभ्यासाच्या लेक्चर वर लक्ष केंद्रित केले...
****************************
आर्यव्रत, त्याचा सह कर्मचारी आणि त्याने बोलावलेला सॉफ्टवेअर वाला हे तिघे मिळून त्याचा सॉफ्टवेअर व्यवस्थित करण्याच्या खटपटीमध्ये लागले होते... अर्ध्यापेक्षा जास्त काम त्यांनी व्यवस्थित केले होते... आपल्या त्या सॉफ्टवेअर साठी आर्यव्रत इतका अस्वस्थ झालेला असतो की त्याला दुसरं काहीही सुचत नाही... दिवस-रात्र तो त्याचा सॉफ्टवेअर चालू व्हावा म्हणून खूपच मेहनत करत असतो आणि का नाही त्याने गावकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी तो सॉफ्टवेअर बनवलेला असतो त्यामुळे त्याच्यासाठी तो खूपच महत्त्वाचा असतो...
आर्यव्रत, त्याचा सह कर्मचारी आणि त्याने बोलावलेला सॉफ्टवेअर वाला हे तिघे मिळून त्याचा सॉफ्टवेअर व्यवस्थित करण्याच्या खटपटीमध्ये लागले होते... अर्ध्यापेक्षा जास्त काम त्यांनी व्यवस्थित केले होते... आपल्या त्या सॉफ्टवेअर साठी आर्यव्रत इतका अस्वस्थ झालेला असतो की त्याला दुसरं काहीही सुचत नाही... दिवस-रात्र तो त्याचा सॉफ्टवेअर चालू व्हावा म्हणून खूपच मेहनत करत असतो आणि का नाही त्याने गावकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी तो सॉफ्टवेअर बनवलेला असतो त्यामुळे त्याच्यासाठी तो खूपच महत्त्वाचा असतो...
दुपारच्या वेळी त्याच्यासोबत असलेला असह कर्मचारी जबरदस्ती सगळ्यांसाठी जेवण मागवतो आणि जेवायला सांगतो म्हणून आर्यव्रत त्यांच्या सोबत इच्छा नसतानाही थोडं खातो... जेवण झाल्यावर पुन्हा ते लगेच त्यांच्या कामाला लागतात...
कॉलेजचे शेवटचे लेक्चर संपते... श्रेयसा आपल्या मैत्रिणींसोबत कॉलेजमधून गप्पा मारत बाहेर येते... बाहेर गेट जवळ आदित्य राज त्यांची गाडी घेऊन उभे असतात...
" चला मी जाते... माझे सासरे गेटच्या जवळ माझी वाट पाहत आहे.. " श्रेयसा त्यांना पाहून आपल्या मैत्रिणींना सांगते...
" काय ग... आज तुझे सासरे कसे काय तुला घ्यायला आले ? " त्या दोघी पण आश्चर्याने तिला विचारतात...
" आज मी माझ्या माहेरी जाणार आहे ना म्हणून ते मला घरी सोडवायला येत आहे... " श्रेयसा
" असे अचानक, तू आम्हाला काही सांगितले की नाही... " एक मैत्रीण आश्चर्याने विचारते...
" अगं, माझे काल रात्री अचानक ठरले... " श्रेयसा
" उद्या कॉलेजला तर येणार आहेस ना ? " दुसरी मैत्रीण
" हो sss माझे माहेर इकडे जवळच आहे त्यामुळे मी तिकडे राहत असली तरी रोज कॉलेजला येईल... चला, मी निघते... उद्या भेटू... " श्रेयसा त्यांना बाय करून तिकडून गेटच्या दिशेने निघून जाते...
" त्या तुमच्या मैत्रिणी आहेत का ? " आदित्य राज त्या दोघांकडे पाहून श्रेयसा ला विचारतात...
" हो... आपल्याच गावचे आहेत... " ती उत्तर देते... दोघेपण बोलतच गाडीमध्ये बसतात... आदित्य राज गाडी चालू करतात आणि गाडी श्रेयसा च्या घराच्या दिशेने धावू लागते...
अर्ध्या पाऊण तासात त्यांची गाडी पाटलांच्या घराच्या समोर येऊन उभी राहते... दोघेपण गाडीमधून बाहेर उतरतात... श्रेयसा ने येण्याबाबत घरी काहीही सांगितलेले नसते तिने हा निर्णय स्वतःच्या मनाने घेतलेल्या असतो त्यामुळे पाटील वाड्यामध्ये याबद्दल कोणालाही काही माहीत नसतं....
गाडीचा आवाज ऐकून घरामध्ये काम करणारी बाई बाहेर येऊन पाहते आणि लगेच आत धावत जाऊन सुरभीला सांगते... सुरभी घाईने बाहेर येते.. आपली मुलगी तिच्या सासऱ्यांसोबत अचानकेकडे कशी काय आली असा प्रश्न तिच्या मनातही निर्माण होतो...
" नमस्कार... पाटील साहेब घरात आहेत का? " आदित्य राज आदराने त्यांच्याकडे पाहून विचारतात...
" नाही ओ sss ते आज सकाळीच काही महत्त्वाच्या कामासाठी तालुक्याला गेले आहे... तुमच्या येण्याची या काहीच खाबर नव्हती नाहीतर थांबले असते... " सुरभी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांकडे पाहत म्हणाली...
" आमचेही अचानक ठरले... आमच्या सुनबाईंना तिच्या माहेरची आठवण येत होती... " आदित्य राज मस्करीच्या स्वरात म्हणाले...
" हो... का... " सुरभी त्यांच्याकडे पहात विचित्रपणे हसत आपल्या मुलीकडे पाहू लागले...
" आई , मलाच काही दिवस इकडे येऊन राहण्याची इच्छा होती... तसे मी काल त्यांना सांगितले तर त्यांनीही होकार दिला.... " आपल्या आईच्या चेहऱ्यावर आलेल्या भावना पाहून श्रेयसा व्यवस्थितपणे सांगू लागली....
" आम्ही तिला सोडायला आलो होतो... आता आम्ही निघतो... " आदित्य राज बोलून जागेवरून उठून उभे राहतात...
" असे कसे... तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते... " सुरभी लगेच त्यांच्याकडे पाहून म्हणाली...
" नको... आम्ही ठीक आहे.. " आदित्य राज म्हणत होते परंतु सुरभी ने त्यांचे काहीही ऐकले नाही... त्यांच्यासाठी चहा नाश्ता पटकन बनवून बाहेर घेऊन आली.... त्या तिघांनी मिळून गप्पा मारत नाष्टा केला...
आदित्य राज त्यांचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडले... श्रेयसा आपल्या रूममध्ये येऊन आपल्या ठेवलेल्या बॅग कडे पाहू लागते... त्या बॅग मधल्या वस्तू बाहेर काढून आपल्या कपाटामध्ये ठेवण्याची तिची इच्छा होत नव्हती....
" काय ग, अशी अचानक कशी काय आली आणि मग घेणार होतीस तर आधी मला फोन करून कळवले का नाही... " सुरभी तिच्या रूम मध्ये येऊन चिडक्या स्वरात म्हणाली...
" आता मला माझ्याच घरी येण्यासाठी पण तुमची परमिशन घेण्याची गरज आहे का ? मला तर वाटत की , माझी जेव्हा कधी इच्छा होईल तेव्हा मी कधीही या घरी येऊ शकते... इकडे येण्यासाठी मला कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही... " श्रेयसा रागानेच सुरभी कडे पाहून म्हणाली...
" अग, तू इतकी का रागावली आहेस ? माझा बोलण्याचा असा अर्थ नव्हता.... मी तर सहजच तुला विचारलं... हे तुझेच घर आहे तू कधीही इकडे येऊ शकते, पण आज अचानक तुझे सासरे पण इकडे आले आणि मला घाई गडबडीत त्यांचा मानपान व्यवस्थित करता आला नाही म्हणून मी बोलले... " तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून सुरभीलाही आश्चर्य वाटले...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा