डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग २४
आर्यव्रत स्टडी रूम मध्ये आत मध्ये येऊन सगळीकडे पाहू लागतो...
" श्रेयसा... श्रेयसा...." तो इकडे तिकडे पहात हाक मारतो परंतु समोरून काही रिप्लाय येत नाही...
’ अरे ही मुलगी कुठे गेली ? कदाचित खाली किचनमध्ये काम करत असेल मीच लक्ष दिले नाही... ’ तुम्हाला मध्ये विचार करत तसाच स्टडी रूमचा दरवाजा बंद करून बाहेर निघून येतो... पायऱ्यावरून खाली उतरत असताना समोरून आदित्य राजही घरामध्ये येत असतात तेव्हा त्यांचे लक्ष त्याच्यावर जाते....
" आज नक्की सूर्य कुठे उगवला ? आमचे चिरंजीव इतक्या लवकर घरी आली आहेत... " आदित्य राज त्याच्याकडे पाहून म्हणाले...
" बाबा... जास्त काम नव्हतं म्हणून लवकर घरी आलो... " ते खाली येत आपल्या वडिलांकडे पाहून उत्तर देतात...
" या थोडा वेळ आमच्या सोबत बसा आणि आम्हाला सांगा.... मागच्या काही दिवसांमध्ये नक्की ऑफिसमध्ये असे काय काम आले होते आम्हालाही समजेल का ? " आदित्य राज काळजीच्या स्वरात विचारतात...
" बाबा माझे काही महिन्यांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं ना... मी स्वतः एक नवीन सॉफ्टवेअर बनवत आहे... " आर्यव्रत
" हो sss सांगितलं होतं... मग त्याच काय झालं? " आदित्य राज
" मी ते सॉफ्टवेअर जवळ जवळ पूर्ण केले होते.... ते सॉफ्टवेअर आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाचे होते... काही शेवटच्या चाचणी करून मी त्याला सरांसमोर म्हणजेच आमच्या कंपनीच्या ओनर समोर प्रेसेंट करणार होतो पण मध्येच.... " असे बोलत आर्यव्रत त्याच्या सॉफ्टवेअर बाबत घडलेली सगळी घटना व्यवस्थितपणे आपल्या वडिलांना सांगू लागतो आणि त्यासाठी त्यांनी केलेली मेहनतही त्यांना सांगत असतो.... हे सगळं ऐकतच रेवती त्यांच्या बाजूला येऊन बसतात आणि त्याचं बोलणं ऐकू लागतात....
" तरीच मागच्या काही दिवसापासून माझं लेकरू इतक्या काळजी मध्ये होतं.... " रेवती त्याचं बोलणं ऐकून चिंता व्यक्त करत म्हणाली ...
" मग आता तुझे सॉफ्टवेअरचे काम सगळं व्यवस्थित झाला आहे ना ? " आदित्य राज
" हो sss आम्ही तिघांनी मिळून तो सॉफ्टवेअर व्यवस्थित चालू केला... तो सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट त्याची खूप मदत झाली... बऱ्यापैकी काम झाले आहे.... आता फक्त शेवटचे थोडेफार काम आणि एक दोन चाचण्या करायच्या बाकी राहिले आहेत , मग पूर्ण सॉफ्टवेअर व्यवस्थित सुरू होईल... " आर्यव्रत आपल्या वडिलांकडे पाहून त्यांना व्यवस्थित सांगू लागतो...
" थांब पहिले मी देवाकडे साखर ठेवून येते आणि तुझी नजर काढते... " रेवती काळजीने लगेच आपल्या जागेवरून उठत किचनच्या दिशेने जातात...
" अग आई, आता तुझे हे काय मध्येच... " मध्येच तिला असे बोलताना ऐकून आर्यव्रत ही गोंधळून तिच्याकडे पाहू लागतो...
रेवती किचन मधून एका वाटीमध्ये साखर घेऊन देवापुढे ठेवतात आणि दिवा लावतात.... मनापासून देवाच्या पाया पडत आपल्या लेकाच्या भल्याची कामना करतात....
" नजर काढायचा सगळं सामान घेऊन ये ग बाहेर... " मंदिरातून बाहेर येत रेवती किचनच्या दिशेने पहात बोलतच आर्यव्रत च्या दिशेने पुढे येऊ लागतात....
आर्यव्रत चे लक्ष किचनच्या दारा जवळ असते त्याच्या मनाला असे वाटते कदाचित श्रेयसा ते सामान घेऊन किचनमधून बाहेर येईल परंतु असे काहीही होत नाही... त्यांच्या का घरामध्ये काम करणाऱ्या काकी सगळे सामान घेऊन किचनमधून बाहेर येतात....
" आई हे सगळं काय आहे ? " आर्य वैतागलेल्या नजरेने आपल्या आईकडे पाहून विचारतो...
" तू थोडावेळ शांत बस रे... " रेवती बोलून ते सामान घेऊन त्याची नजर काढू लागतात...
" जा हे सगळं बाहेर व्यवस्थित ठेवून ये... " रेवती त्यांना सांगतात तसे त्या ते सगळं सामान घेऊन बाहेर निघून जातात....
" आई खूप भूक लागली आहे ग, जेवण तयार आहे का ? " आर्यव्रत तिच्या त्या गोष्टीला इग्नोर करत विचारतो...
" हो बाळा , बस पाच मिनिट दे .... जेवण बाहेर घेते... " रेवती असे बोलून डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ मांडायला सुरुवात करतात....
" चला चिरंजीव, आपण पण जाऊन बसुया... आज खूप दिवसानंतर जेवणाच्या पंक्तीला तुमची सोबत असेल... " आदित्य राज जागेवरून उठत त्याच्याकडे पाहून म्हणाले... ते दोघे पण डायनिंग टेबल जवळ जाऊन बसले... रेवती काम करणाऱ्या बायकांची मदत घेऊन सगळे पदार्थ डायनिंग टेबलवर मांडत होती परंतु त्याची नजर ज्या व्यक्तीला शोधत होती, ती व्यक्ती त्याला कुठेच दिसली नाही त्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटू लागले...
रेवती पटकन पुढे येऊन आपल्या मुलाला आणि नवऱ्याला जेवण वाढतात...
" चला... आता कोणाची वाट पाहत आहे ? कर सुरुवात... " त्याच्या प्लेटमध्ये सगळे जेवण वाढून पण तू शांत बसलेला आहे हे पाहून रेवती त्याला म्हणाल्या....
" तू पण बस ना आमच्यासोबत... " आर्यव्रत किचनच्या दारावर एक नजर फिरवत रेवती ला म्हणाला...
" हो... " असे बोलत रेवती पण त्यांच्यासोबतच जेवण करायला बसते... ते तिघे पण बाहेर जेवायला बसले आहे आणि तरीही श्रेयसा बाहेर आली नाही, वर रूम मध्येही नव्हती, मग नक्की ती आहे कुठे ? त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागतो...
" श्रेयसा... " शेवटी हिंमत करून तो आपल्या आईकडे पाहून विचारतो...
" ती आजच तिच्या माहेरी गेली आहे... बोलती माहेरची खूप आठवण येत आहे , काही दिवस तिकडे राहू नको मग मी पण तिला होकार दिला... " रेवती जेवण करत सांगू लागते...
" हम्म... " ती घरात नाही हे ऐकल्यावर तो मात्र थोडा शांत होतो आणि शांतपणे जेवण करू लागतो... आज इतक्या दिवसानंतर तो मनमोकळेपणाने घरात वावरत होता परंतु यावेळी तिच्या नसण्याची जाणीव मात्र त्यालाही होत होती....
त्याचवेळी श्रेयसा आपल्या घरात आपल्या आई-वडिलांसोबत जेवण करत असताना तिच्याही मनामध्ये त्याची आठवण येत असते...
’ तो घरी आला असेल का की आजही त्याला यायला उशीर होणार आहे ? त्याला त्या रूममध्ये माझ्या नसण्याची जाणीव होईल का की , काही फरक पडणार नाही... ’ श्रेयसा सगळ्यांसोबत जेवण तर करत असते पण तिचं मन मात्र त्याच्या विचारांमध्ये अडकलेले असते...
आपल्या आई-वडिलांसोबत थोड्यावेळ गप्पा जेवल्यानंतर थोड्यावेळ गप्पा मारून आर्यव्रत आपल्या रूममध्ये येतो.... बेडवर बसूनच तो शांतपणे एक नजर आपल्या पूर्ण रूमवर फिरवतो.... अचानक त्याला तीन दिवसापूर्वी झालेला प्रसंग आठवतो... श्रेयसा या रूम मध्ये ठेवण्यासाठी काही वस्तू घेऊन आली होती आणि त्याला त्याच्याबद्दल काही सांगतही होती परंतु त्याचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते...
तसा आर्य पटकन आपल्या जागेवरून उठून उभा राहतो आणि तिने जे ड्रॉवर ओपन केले होते ते ड्रॉवर ओपन करून पाहू लागतो.... तिने रूमसाठी आणलेल्या दोन-तीन वस्तू त्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलेल्या असतात... तो त्या तीनही वस्तू वर ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवतो आणि रूम मध्ये आजूबाजूला नजर फिरवतो... त्या वस्तू तिने रूममध्ये कुठे ठेवल्या होत्या हे आठवण्याचा प्रयत्न करतो... त्याला जशी जशी जागा समजते तशी तशी त्या जागेवरच्या वस्तू बाजूला काढून तिने आणलेल्या वस्तू त्या जागेवर व्यवस्थित ठेवतो...
’ ते एक काचेचे शोपीस ची माझ्या हातातून चुकून फुटले ते ही खूप सुंदर होते , पण मी मुद्दामून केले नाही... त्यादिवशी खरंच मला काही सुचत नव्हते आणि म्हणून माझ्याकडून चुकून हे सगळं झालं... तिला राग आला असेल का ? ’ आता कुठे आहे त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि तो तिचा विचार करू लागतो......
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
