Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २५

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २५
श्रेयसा जेवण झाल्यानंतर आपल्या रूममध्ये निघून येते... आज आपल्या रूम मधल्या सगळ्या वस्तू ज्या इतक्या वर्षापासून तिच्यासोबत होत्या त्याही तिला नवीन वाटू लागल्या... तिकडच्या रूमची सवय जी झाली होती...

’ आज मी तिकडे त्या घरात नाही... आर्य ला माझी आठवण येत असेल का जशी मला त्याची आठवण येत आहे... त्याच्या मनातही माझे विचार येत असतील का ? त्यांना माहीत असेल का की, मी इकडे घरी आली आहे का मी कुठे आहे हे जाणून घे नाही त्याला गरजेचे वाटलं नसेल... ’ श्रेयसा आपल्या बेडवर बसून विचार मात्र त्याचेच करत असते...

आर्यव्रत ही आज आपल्या रूममध्ये बसून श्रेयसा चा विचार करत असतो...

’ काय करू... तिला फोन करू का ? नाही ss नको... ती झोपली असेल तर... आजच माहेरी गेली आहे...  कदाचित आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवत असेल... लगेचच तिला डिस्टर्ब नको करायला... ’ विचार करून तो हातात घेतलेला मोबाईल पुन्हा बाजूला ठेवतो आणि तसाच बेड वर आपल्या उशीवर डोकं ठेवून झोपतो...

श्रेयसा ही आपल्या बेडवर आपल्या उशीवर डोकं ठेवून शांत पने झोपते... ते दोघेही सध्या आपापल्या रूममध्ये आपापल्या बेडवर झोपलेले असतात,  पण दोघांच्याही मनामध्ये विचार मात्र एकमेकांबद्दल असतात... एकमेकांचा विचार करतच ते दोघे डोळे बंद करून शांतपणे झोपून जातात...

" गुड मॉर्निंग... " श्रेयसा च्या गोड आवाजाने त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरते... तो तसाच डोळे बंद करून हसऱ्या चेहऱ्याने जागेवर उठून बसतो...

" गुड मॉर्निंग मॅडम... वाटल नव्हत आज सकाळी सकाळी तुमचा गोड आवाज ऐकायला भेटेल... " आर्यव्रत तसाच बंद डोळ्यांनी बोलत आळस देत असतो...

" काय रे, कोणासोबत बोलत आहेस ? " अचानक आवाज ऐकून तो गडबडून आपले डोळे उघडून समोर पाहू लागतो,  तर त्याच्यासमोर रेवती त्याच्या रूमच्या दरवाजामध्ये उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते...

" आई तू sss मला वाटलं श्रेयसा... " तो अजूनही गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत असतो...

" ती तर तिच्या माहेरी गेली आहे ना... तुला काल सांगितले होते ना... " रेवती रूमच्या आत मध्ये येत त्याच्याकडे पाहून म्हणाली...

" हो sss माहित आहे... " इतक्या वेळ जे त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं ते हळूहळू कमी होऊ लागत...

" चल उठ लवकर... अजून खाली आला नाहीस म्हणून मग मीच शेवटी तुला बघायला वर आले... " रेवती त्याच्या रूम मधला सगळं सामान व्यवस्थित करत म्हणाली...

" हो sss मागच्या काही दिवसापासून व्यवस्थित झोपत झाले नाही म्हणून आज उठायची इच्छा होत नव्हती... मलाही ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचायचे आहे... आजचे काम पूर्ण झाले की डोक्यावरचे सगळे टेन्शन निघून जाईल... पंधरा मिनिटात आंघोळ करून फ्रेश होऊन खाली येतो... " आर्यव्रत आपल्या आईकडे पाहून उत्तर देतो...

" ठीक आहे... आज मी तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला आहे... ब्रेकफास्ट करून जाशील ना ? " रेवती

" हो sss माझ्या आईने एवढ्या प्रेमाने जर माझ्यासाठी बनवला असेल तर का नाही करणार... " आर्यव्रत

" श्रेयसा ने ही अगदी प्रेमाने तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट केला होता पण तू साधे ते पाहिलेही नाही तसाच निघून गेला... बिचारीला किती वाईट वाटले असेल? " रेवती आपल्या हातात असलेल्या काम करतच म्हणाल्या...

" काय sss कधी आणि मग मला कोणी सांगितले का नाही ? " त्याला याबद्दल काही माहीतच नव्हते त्यामुळे तोही आश्चर्याने आपल्या आईकडे पाहून तिला विचारतो....

" कसे सांगणार,  तू ऐकण्याच्या मनस्थितीत तर होता का... तुला ऑफिसला जाण्याची इतकी घाई लागली होती की तू कोणाच्या काही ऐकूनही घेतले नाही... " रेवती

" ओह् आई, आय एम सॉरी... मी माझ्या सॉफ्टवेअरच्या कामामध्ये इतका गुंतून गेलो होतो की कशामध्येच लक्ष नव्हते... " आर्यव्रत

" बरं चल... लवकर आवरून खाली ये तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते... " रेवती बोलून रूममधून बाहेर निघून जाते...

" श्रेयसा माझ्यासाठी एवढा सगळं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी नेहमी तिला दुखावतो... श्रेयसा, आता जेव्हा तू घरी येशील ना तेव्हा मी पण तुझी काळजी घेईन... माझ्याकडून तुला त्रास होणार नाही असा प्रयत्न करेन... ” आर्यव्रत स्वतःच्या मनाशी ठरवत आपला मोबाईल फोन उचलून हातामध्ये घेतो...

चला जरी मॅडम इकडे नसल्या तरी तिला मेसेज करून तरी विश करू शकतो ना... असा विचार करून आर्यव्रत तिला मेसेज करण्यासाठी मोबाईल मध्ये तिचा नंबर सर्च करत असताना अचानक त्याच्या मोबाईलवर फोन येतो... तो पाहतो तर त्याच्या कलिग चा फोन असतो... आर्यव्रत आपल्या सॉफ्टवेअरचा विचार करत फोन उचलतो...

" हा sss बोल... " आर्यव्रत

" अरे sss लवकर घरातून निघ आणि रस्त्यात मलाही पिक कर... तो सॉफ्टवेअर वाला ही लगेचच ऑफिसमध्ये पोहोचणार आहे...  " त्याचा सहकार्मचारी म्हणाला...

" ठीक आहे... मी लवकर तयारी करून निघतो... " आर्यव्रत बोलून लगेच फोन ठेवून देतो आणि त्याच्या आईने बेडवर काढून ठेवलेले त्याचे कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये निघून जातो...

आर्यव्रत लवकर आपली तयारी करून खाली हॉलमध्ये येतो तोपर्यंत रेवतीने डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी नाष्टा मांडून ठेवलेला असतो... आर्यव्रत पटकन येऊन खुर्चीवर बसतो...

" आई, पटकन नाश्ता दे , मला लवकर जायचे आहे... " आर्यव्रत

" अरे मगाशीच तर आरामशीर बोलत होता आणि आता मध्येच तुला काय झाले ? " रेवती पुन्हा एकदा त्याला घाई करताना पाहत त्याला नाश्ता वाढत विचारते...

" अरे ऑफिसमध्ये येतो सॉफ्टवेअर वाला लवकरच येणार आहे त्यामुळे मलाही लवकर जावे लागणार आहे... आज माझ्या सॉफ्टवेअरच जे राहिलेलं फायनल काम आहे तेही पूर्ण होईल... " आर्यव्रत नाश्ता करतच आपल्या आई-वडिलांना सांगू लागतो...

" तुझा सॉफ्टवेअर नक्कीच व्यवस्थित सुरू होईल जास्त टेन्शन घेऊ नको... तुम्ही सगळ्यांनी मिळून इतकी मेहनत केली आहे,  देव तुमची मेहनत अशी वाया थोडी घालवणार आहे... " आदित्य राज प्रेमाने आपल्या मुलाकडे पाहून म्हणाले...

" थँक्यू आई , इतका चांगला नाश्ता बनवण्यासाठी... चला, मी निघतो.... " आर्यव्रत घाईतच खाऊन जागेवरून उठून त्यांना बाय करून पुढे जातो...

" अरे sss असा काय हा मुलगा... त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे तरीही व्यवस्थित बसून खात नाही... " रेवती त्याला जाताना पाहून वैतागून म्हणाली....

" सध्या त्याचे पूर्ण लक्ष त्याच्या सॉफ्टवेअर वर आहे... एकदा का ते व्यवस्थित सुरू झाले की,  मग तो तुम्हालाही तुमचा वेळ देईल..... तोपर्यंत आपली ही त्याला समजून घेण्याची गरज आहे... " आदित्य राज समजावण्याच्या स्वरात म्हणाले...

आर्यव्रत बाहेर जाऊन आपल्या गाडीमध्ये बसतो... गाडी चालू करत , तो आपल्या सह कर्मचारीला फोन करून तयारीत राहायला सांगतो... त्याचा तो सह कर्मचारीही तयारी करून बाहेर मेन रोडवर येऊन त्याची वाट पाहू लागतो...

" सॉफ्टवेअर वाला आता जस्ट ऑफिसमध्ये पोहोचला आहे... " गाडी थांबल्याबरोबर गाडीमध्ये बसतच तो आर्यव्रत ला माहिती देतो...

" आपणही पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये ऑफिसमध्ये असू... " आर्यव्रत त्याच्या कडे एक नजर पाहून गाडी चालू करून स्पीड मध्येच आपल्या ऑफिसच्या दिशेने गाडी पळवतो...

श्रेयसा आज रोजच्यापेक्षा थोडी उशिराच सकाळी उठलेली असते.... आज खूप दिवसानंतर ती आपल्या बेडवर झोपल्यामुळे तिलाही छान झोप लागलेली असते... सुरभी तिच्या रूममध्ये येऊन तिला आवाज देते तशी तिची झोप खवळते आणि डोळे उघडून ती आपल्या आईकडे पाहू लागते.... 


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all