डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग २६
" अग उठ, किती वेळ झाला आहे... आपल्या सासरी पण अशीच झोपून राहतेस का ? " सुरभी तिच्या बेडरूम मधला पसारा आवरत बडबड करत होती...
" काय ग आई, इतक्या दिवसानंतर एवढी चांगली झोप लागली होती आणि तू आहे की, झोपू पण देत नाही... " श्रेयसा आळस देतच आपल्या जागेवर उठून बसते...
" इतक्या दिवसानंतर म्हणजे रोज काय तुला चांगली झोप लागत नाही का ? " सुरभी तिची मस्करी करत म्हणाली...
" आई ss काय तू... " श्रेयसा वैतागून आपल्या आईकडे पाहते...
" आज कॉलेजला नाही जायचं होते का ? कॉलेजचा टाईम तर केव्हाच होऊन गेला... " सुरभी
" ठीक आहे ना.. आज एक दिवस सुट्टी , उद्या जाईन... " श्रेयसा
" बरं चल लवकर आंघोळ आवरून खाली ये... तुझे बाबा तुझी वाट पाहत आहे... त्यांनाही बाहेर जायचं आहे... " सुरभी
" हो ssss त्यांना थांबवून ठेव, मी आलेच.. " असे बोलत श्रेयसा बाथरूम मध्ये निघून जाते... श्रेयसा तयारी करून खाली येते... तिचे वडील श्रीकांत तिची वाट पाहत खाली बसलेले असतात...
" बाबा... कसे आहात? " श्रेयसा आपल्या वडिलांच्या बाजूला बसत त्यांना विचारते...
" मी ठीक आहे, तू कशी आहेस ? तिकडे सगळ ठीक आहे ना ? " श्रीकांत तिचे निरीक्षण करत विचारतात...
" मी ठीक आहे.. घरात सगळेच खूप चांगले आहेत... " श्रेयसा
सुरभी तिच्यासाठी तिच्या आवडीचा नाष्टा बनवून घेऊन येते... श्रेयसा आणि ती दोघी पण नाश्ता करू लागतात...
" बाबा तुम्ही खाणार का ? " श्रेयसा
" नाही.. माझा नाश्ता झाला आहे.. मी निघतो तुम्ही दोघी निवांत गप्पा मारा... " श्रीकांत बोलून तिकडून बाहेर पडतात...
श्रेयसा नाश्ता करून आपल्या मोबाईल वरून जवळच्या मैत्रिणींना फोन करते... तिचा तिच्या मैत्रिणींना भेटण्याचा प्रोग्राम ठरतो...
" आई , मी आता तयारी करून माझ्या मैत्रिणींना भेटायला जणार आहे... आम्ही दुपारी बाहेरच जेवण करून येऊ... " श्रेयसा आपल्या आईला सांगून तयारी करण्यासाठी आपल्या रूम मध्ये निघून जाते...
श्रेयसा आणि तिच्या लहानपणीच्या तीन मैत्रिणी मिळून गावामध्ये सगळीकडे फिरून त्यानंतर जेवण करण्यासाठी गावाच्या बाहेरच असलेल्या सुंदर अशा हॉटेलमध्ये येऊन गप्पा मारत बसलेल्या असतात... बरेच दिवसानंतर भेटल्यामुळे त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात...
" Finally... आपलं सॉफ्टवेअरच काम पूर्ण झालं ते पण सक्सेसफुली पूर्ण झालं... " तो सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट आपला श्वास मोकळा सोडत त्या दोघांकडे पाहून हसून म्हणाला...
" हा तर एक प्रकारचा चमत्कार झाला... उलट आपण हा सॉफ्टवेअर चालू करण्यासाठी जे एडिशनल फीचर्स वापरले आहे त्याचाही आता आपल्याला खूप फायदा होणार आहे... गाईज खरंच थँक्यू सो मच आज तुमच्या मदतीमुळे माझा सॉफ्टवेअर मी पुन्हा चालू करू शकलो... " आर्यव्रत अगदी उत्साहाने त्या दोघांकडे पाहून आपला आनंद व्यक्त करतो...
" आर्यव्रत, तुझा सॉफ्टवेअर खरच खूप चांगला आहे आणि जसं तू बोलत होतास या सॉफ्टवेअर मुळे आपल्या गावचा खूप मोठा फायदा होईल... " त्याचा सह कर्मचारी त्या संपूर्ण सॉफ्टवेअर चे फीचर्स पाहून म्हणाला...
" खरंच! ही माझी इतक्या महिन्याची मेहनत आहे... सॉफ्टवेअर बनवण्यासाठी घेतलेल्या शिक्षणाचा हा मोबदला आहे... म्हणून जेव्हा या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा खरंच मला खूप टेन्शन आले होत, माझा सॉफ्टवेअर हा पुन्हा व्यवस्थित चालू होईल की नाही अशी शंका मनात निर्माण झाली होती, पण तुम्ही दोघांनी माझी खूप साथ दिली आणि माझ्या या सॉफ्टवेअरला व्यवस्थित सुरू करण्यात माझी मदत केली... " आर्यव्रत त्या दोघांचेही आभार व्यक्त करतो...
" आर्य , असंच फक्त तोंडाने आभार मानून आम्ही तुला सोडणार नाही आहे... आम्हाला तुझ्याकडून एक चांगली ट्रीटही पाहिजे... " तो सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाला...
" मी तयार आहे.. कधी आणि कुठे पाहिजे ते सांगा... तुम्ही माझे एवढे मोठे काम केले आहे मग त्या बदल्यात मी एक ट्रीट तर देऊ शकतो ना... " आर्यव्रत त्या दोघांकडे पाहून म्हणाला...
" आज पाहिजे आणि आता , ते पण गावाच्या बाहेर झालेल्या त्या नवीन हॉटेलमध्ये... खूप भूक लागली आहे रे... सकाळी व्यवस्थित नाश्ताही केला नाही आणि आता खूप उशिरही झाला आहे... " त्याचा सह कर्मचारी त्यांना म्हणाला..
" ठीक आहे... चला आता जाऊ.. " आर्यव्रत
" हो sss चला.... माझ्याही पोटात कावळे ओरडत आहे... " सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट ही आपल्या जागेवरून उठून म्हणाला... ते तिघे पण ऑफिस मधून ब्रेक घेऊन खाली पार्किंग एरियामध्ये आले... आर्यव्रत आपल्या गाडीची चावी घेऊन गाडी मध्ये जाऊन बसतो आणि चालू करतो... त्याच्यासोबत असलेले ते दोघेही त्याच्या गाडीमध्ये येऊन बसतात...
" मग फायनल ना... ते गावाबाहेर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे आहे ना ? " आर्यव्रत त्या दोघांकडे पाहून त्यांना पुन्हा एकदा विचारतो...
" हो sss रे... जेव्हापासून ते चालू झाले आहे खूप वेळा विचार केला की तिकडे एकदा जाईल आणि तिकडचे जेवणाची टेस्ट बघेन पण वेळात मिळाला नाही... आज त्याच निमित्ताने तिकडच्या जेवणाची चव चाखायला मिळेल... " सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट त्याच्याकडे पाहून म्हणाला...
" हो sss मी माझ्या बाजूवाल्यांकडून ऐकले आहे की त्या हॉटेलच्या जेवणाची टेस्ट खूप चांगली आहे... शिवाय तिकडे इंडियाच्या बाहेरच्या पण वेगवेगळ्या डिश मिळतात... " त्याचा सह कर्मचारी...
" ठीक आहे.. चला... " असे बोलत आर्यव्रत आपली गाडी चालू करून गेटच्या बाहेर काढतच असतो की , अचानक त्यांच्यासमोर व्यक्ती येऊन थांबते... तसा तोही गाडीला जोरात ब्रेक मारतो आणि समोर पाहू लागतो...
" ऑफिसच्या वेळामध्ये कुठे चालला आहात तुम्ही लोक ? " ती व्यक्ती बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहत त्यांना विचारतो...
" हे विचारण्याची ही कोणती पद्धत आहे... गाडीच्या खाली आली असती तर... ब्रेक वेळेवर लागला नसता तर... " आर्यव्रत थोड्या रागानेच तिच्याकडे पाहून विचारतो...
" मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे असे काहीही होणार नाही याची खात्री होती... ते सोड, तुम्ही लोक कुठे जात आहात ? " ती व्यक्ती संशयी नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते...
" आम्ही लंच साठी बाहेर जात आहोत... आर्य आम्हाला ट्रीट देत आहे... आज त्याच्याकडून आम्हाला जेवणाची पार्टी आहे... " त्याच्या सह कर्मचारी बाहेर पाहून म्हणाला...
" काय पार्टीची प्लान चालू आहेत आणि तेही मला सोडून... मी पण तुमच्यासोबत येणार... " ती व्यक्ती त्यांच्याकडे पाहून हट्ट करत म्हणाली...
" काय sss अरे तू तुझ्या बॉयफ्रेंडला सांग ना , तुला लंचला घेऊन जायला... आमच्या सोबत का? " आर्यव्रत एक नजर मागे बसलेल्या आपल्या सह कर्मचारी कडे पाहून तिला म्हणाला...
" अरे त्यालाच तर तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जात आहे... मग मी काय इकडे थांबू ? मी पण तुमच्या सोबत येणार, नाही तर मग तुम्हाला जाऊ देणार नाही... " ती मुलगी हट्ट करत म्हणाली...
" संजय, तुझ्या गर्लफ्रेंडला लवकर गाडीमध्ये बसायला सांग नाहीतर आपल्याला इकडेच वेळ होईल आणि मग लंच कॅन्सल करावा लागेल... " आर्यव्रत नकारार्थी मान हलवत म्हणाला...
" वृषाली, तुला यायचं आहे ना आमच्या सोबत लंच साठी मग लवकर गाडीमध्ये येऊन बस... " असे बोलून संजय आपल्या बाजूचा दरवाजा उघडून तिला आत बसायला सांगतो... सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट पुढच्या बाजूला आर्यव्रत च्या बाजूच्या सीटवर बसलेला असतो.... ती हसून पटकन गाडीमध्ये येऊन बसते आणि आर्य गाडी चालू करतो...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा