Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २७

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २७

" आर्य, तुझ्या सॉफ्टवेअर चा जो प्रॉब्लेम झाला होता,  तो ठीक झाला ना ? " वृषाली गाडीमध्ये बसल्यावर त्याला विचारते...

" अग,  त्याचीच तर पार्टी करायला चाललो आहे... आर्य आपल्याला त्याचा सॉफ्टवेअर व्यवस्थित झाल्याबद्दल पार्टी देत आहे.. ते पण गावाच्या बाहेर झालेल्या नवीन हॉटेल मध्ये.. " संजय

" ओह्... मस्त म्हणजे मी वेळेवर आले... नाहीतर तुम्ही लोक आम्हाला सोडूनच गेला असता... " वृषाली खुश होऊन म्हणाली...

" हो sss कारण माझी मदत या दोघांनी केली आहे तू नाही...." आर्यव्रत मुद्दामून तिची मस्करी करत म्हणाला...

" हो मग काय झालं... माझ्या बॉयफ्रेंड ने तर तुमची मदत केली होती ना... " वृषाली बेफिकर पणे बोलून मोकळी होते... गाडीमध्ये सगळ्यांची मस्ती मजा सुरू असते..... पुढच्या काही वेळातच ते लोक त्या हॉटेल जवळ येऊन पोहोचतात...

" तुम्ही गेटवर जाऊन उभे रहा तोपर्यंत मी गाडी व्यवस्थित पार्क करून येतो.... " आर्य सगळ्यांकडे पाहून त्यांना सांगतो... सगळेजण गाडीतून खाली उतरतात आणि गेटच्या दिशेने चालू लागतात... आर्यव्रत तिकडे बाजूलाच पार्किंग एरियामध्ये जाऊन आपली गाडी व्यवस्थित पार्क करतो... गाडी पार्क करून तो परत आपले मित्र जिकडे उभे आहेत तिकडे येतो....

वृषाली मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होती... तेव्हाच तिची आणि संजयची भेट झाली... हळूहळू ते दोघे पण एकमेकांना पसंत करू लागले... त्या दोघांबद्दल ऑफिसमध्ये जवळजवळ सगळ्यांनाच माहीत होते... वृषाली बाकी सगळ्यांसोबतही हसत मस्ती करत राहत होती... संजय मुळे आर्यव्रत आणि वृषाली पण एकमेकांच्या चांगले मित्र बनले होते...

" चला,  आत डायनिंग एरिया मध्ये जाऊया... " आर्य त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या पुढे चालू लागतो...

" हो sss... मला पण खूप भूक लागली आहे... " वृषाली पण इकडे तिकडे पाहत म्हणाली....

" भुक्कड... तुला कधी पण भूकच लागलेली असते... " आर्यव्रत

" आर्य ssss संजय तुझ्या मित्राला सांगून ठेवा नाहीतर मग मी काही बोलले तर त्याला राग येईल.... " वृषाली  लटक्या रागात संजय कडे पाहून म्हणाली...

" तुम्ही लोक प्लीज!  मला मध्ये घेत जाऊ नका... तुमचा तुम्ही एकमेकांना चिडवता आणि मग काय झालं की माझ्यावर खापर फोडता... " संजय हात जोडून त्या दोघांकडे पाहून वैतागलेल्या स्वरात म्हणाला....


" ते बघा , तिकडे त्या कोपऱ्याला मोकळा टेबल आहे... तिकडे आपण बसू शकतो... " वृषाली आपली नजर फिरवत एका कोपऱ्याला हात करत सगळ्यांनाच दाखवते...

" हो sss चला... " संजय ही लगेच होकार देतो.... ते चौघे पण त्या टेबलच्या दिशेने पुढे जाऊ लागतात.... गावामध्ये एवढे आलिशान आणि मोठे हॉटेल हे एकच होते, जे नुकतेच काही महिन्यापूर्वी ओपन झाले होते त्यामुळे गावाच्या आसपासच्या गावातीलही काही नामवंत मंडळी तिकडे जेवणासाठी येत होती त्यामुळे बऱ्यापैकी रहदारी होती....

तो सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट प्रदीप ज्याला संजयने फोन करून बोलावले होते तो जास्त कोणाला ओळखत नव्हता... कामानिमित्त या दोघांसोबत त्याचे चांगली ओळख झाली होती वृषाली सोबत व्यवस्थित ओळख नसल्याने तो सध्या शांतच होता...

" प्रदीप, be comfortable... " वृषाली आणि आर्य दोघांचे बोलणं चालू होते त्यामुळे संजय त्याच्या सोबतच बोलत पुढे गेला.... त्या टेबलच्या बाजूला असलेल्या चेअरवर ते दोघेही जाऊन बसले... वृषाली आर्य सोबत बोलत इकडे तिकडे पाहत चालत होती अचानक तिचा पाय बाजूच्या चेअरच्या पायात अडकला आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात मागे चालत असलेल्या आर्य ने नीट पकडून सावरले....

वृषालीने पडण्याच्या भीतीने घाबरून आपल्या दोन्ही हाताने आर्य चे शर्ट घट्ट पकडून ठेवले होते आणि त्यानेही ती पडू नये म्हणून एका हाताने तिच्या पाठीवर आधार देऊन दुसऱ्या हाताने तिच्या खांद्याला व्यवस्थित पकडले होते... अचानक आर्यच्या नजरेला काहीतरी वेगळे जाणवणे म्हणून त्यांनी आपली नजर सरळ समोर वळवली आणि समोर पाहताच त्याला झटका लागल्यासारखा तो जागेवरच स्थिर झाला...

श्रेयसा त्याच्यासमोरच काही अंतरावर उभे होते आणि ती त्याच्याकडेच रागाने पाहत होती... श्रेयसा आधीपासूनच आपल्या मैत्रिणींसोबत त्या हॉटेलमध्ये येऊन जेवण करत होती त्यांचे जेवण नुकतेच संपत आले होते म्हणून ती आपल्या खुर्चीवरून उठून हा धुण्यासाठी वॉश बेसिनच्या दिशेने जात असताना अचानक तिला आर्य तिकडे दिसला...

आर्यव्रत ला तिकडे पाहून ती आश्चर्याने त्याला बघत होती तो हॉटेलच्या डायनिंग एरियामध्ये एंटर झाल्यापासून वृषाली सोबत बोलण्यामध्ये मग्न होता आणि श्रेयसा एका जागेवर उभी राहून त्या दोघांकडे निरखून बघत होती... आता ही वृषाली पडताना त्याने पटकन तिला सावरले ते पाहून इकडे श्रेयसा मात्र रागानेच फणफणली होती.... त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यांमध्ये राग दाटून आला होता.... श्वास फुलल्यासारखे वाटत असल्यामुळे ती मोठ्याने श्वास घेऊ लागली....

" थँक्यू सो मच.. बरं झालं तू वेळेवर पकडला नाही तर मी खालीच पडले असते.... " वृषाली आपल्याच नादात स्वतःला सावरत त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली परंतु त्याचे तिच्या बोलण्याकडे काडी मात्र ही लक्ष नव्हते त्याचे पूर्ण लक्ष समोर उभी असलेल्या श्रेयसा वर होते...

श्रेयसा ने रागाने आपली नजर फिरवली आणि सरळ तिकडून बाहेर जाण्याचा रस्ता पकडला...

" श्रेयसा..... " आर्यव्रत ने तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ती थांबली नाही... तिने आपल्या चालण्याचा स्पीड अजूनच वाढवला आणि सरळ हॉटेलच्या बाहेर निघून गेली....

" एक मिनिट... " आर्यव्रत ला ही तिची अशी रिएक्शन पाहून काही सुचत नव्हते म्हणून त्याने आपल्या मित्रांकडे पाहून म्हणाले आणि तोही सरळ बाहेर आला.... हॉटेलच्या बाहेर गेट जवळ येऊन त्याने सगळीकडे नजर फिरवली त्याला श्रेयसा कुठेच दिसले नाही..

’ अरे sss आताच तर इकडे होती इतक्या लवकर कुठे गेली असेल ? ’ आर्यव्रत मनामध्ये विचार करत खाली येऊन तिला सगळीकडे शोधत होता... अचानक पार्किंग एरिया मधून गाडी जोरातच स्पीडमध्ये त्या रोडवरून निघून गेल्याचे त्याला समजले परंतु तो बघेपर्यंत गाडी तिकडून रस्त्याला लागली होती त्यामुळे त्या गाडीमध्ये नेमकं कोण आहे हे त्याला समजले नाही...

आर्यव्रत पाच दहा मिनिटं आजूबाजूला शोधून शेवटी वैतागून हॉटेलचे आत निघून आला...

" काय रे , काय झालं होतं ? इतका वेळ बाहेर जाऊन काय करत होता? " संजयने त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन पाहून त्याला विचारले....

" काही नाही... अरे माझी बायको आत्ताच मला इकडे दिसली म्हणून मी तिच्या मागे बाहेर गेलो होतो,  पण बाहेर ती मला कुठेच दिसली नाही.... " आर्यव्रत खाली खुर्चीवर बसत विचार करत सांगू लागला...

" कसे पॉसिबल आहे ? जर ती तुझी बायको असती तर तुला बाहेर गेल्यावरही दिसली असती ना... तुला भास झाला असेल बहुतेक.... " संजय

" नाही संजय... हा माझा भास नव्हता... श्रेयसा इकडे या हॉटेलमध्येच होती... मला बघूनच ती रागाने इकडून निघून गेली.. पण का? मी मागून आवाज देऊन तिला थांबण्याचा प्रयत्नही केला परंतु ती थांबली नाही.... " आर्यव्रत

" मी तुझ्या बायकोला तुमच्या लग्नात बघितले आहे , पण मला नाही दिसली.. असो असो, एक काम कर तुला एवढेच विश्वास असेल तर तिच्या फोनवर फोन करून विचार म्हणजे समजेल... " संजय त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाला...

"हो sss ही चांगली आयडी आहे... त्याच निमित्ताने मला तिला तुमच्या सगळ्यांना भेटवायला ही जमेल... " आर्यव्रत ने बोलतच आपला मोबाईल खिशामधून बाहेर काढला....

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.