डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग २८
आर्यव्रत श्रेयसा चा नंबर डायल करून तिला कॉल लावतो... रिंग वाजत असते परंतु समोरून कॉल उचलला जात नाही.... पुन्हा तो दोन-तीन वेळा तिच्या मोबाईलवर कॉल लावतो तरीही तसेच!
" कदाचित ती बिझी असेल... " आपल्याकडे पाहणाऱ्या मित्रांकडे पाहून तो उत्तर देतो...
" हो sss वेळ मिळाला तर फोन करेल... आपण जेवायला घ्यायचा का आपल्याला परत ऑफिसला जायचं आहे... " संजय
" होsss चालेल.... तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑर्डर करा... " आर्यव्रत
श्रेयसा रागाने आपली गाडी आपल्या घराच्या दिशेने जवळजवळ वेगानेच चालवत होती.... ती अतिशय रागात होती... तिला नेमका कसला त्रास होत आहे हे तिला समजत नव्हते, पण रागाने श्वास फुलले होते... आर्यव्रत ला तिकडे पाहून तिला राग आल्यामुळे ती तशीच तिकडून पळत आपल्या गाडीमध्ये येऊन बसली आणि गाडी चालू केली परंतु आपल्या सोबत आपल्या मैत्रिणी ही आल्या होत्या ही गोष्ट देखील तिच्या लक्षात नव्हती...
तिच्या मैत्रिणी कधीपासून तिची वाट पाहत होते हे सगळं झाले तेव्हा ते मात्र आपल्या बोलण्यामध्ये मग्न असल्यामुळे त्यांचे तिच्याकडे लक्ष नव्हते...
" ही श्रेयसा किती वेळ लावत आहे? " तिची एक मैत्रीण आजूबाजूला पाहात म्हणाली...
" हो ना... अजून किती वेळ वाट पाहायची... एक काम करतो इकडेच बस तोपर्यंत मी काउंटरवर जाऊन बिल भरून येते... " दुसरी मैत्रिण बोलत उठली आणि काउंटर जवळ जाऊन तिने त्यांचे बिल भरले... अजून थोडा वेळ त्यांनी तिची वाट पाहिली , तरी ही श्रेयसा आली नाही म्हणून त्या दोघी पण मग आपल्या जागेवरून कुठल्या आणि तिला शोधतच हॉटेलच्या बाहेर पडल्या... ज्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली होती त्या दोघी पण त्या ठिकाणी आल्या...
" अरे, इकडे श्रेयसा ची गाडी नाही... " पहिल्या मैत्रिणीने आश्चर्याने त्या जागेकडे पाहून दुसरीला सांगितले...
" हो sss ना.... म्हणजे ही आपल्याला इकडे सोडून गाडी घेऊन निघून गेली, पण तिने असे का केले असावे ? "दुसरी मैत्रीण विचार करत उत्तर देते...
" थांब... मी तिच्या मोबाईलवर फोन लावते... " असे बोलून तिची पहिली मैत्रीण तिच्या मोबाईलवर फोन करते... रिंग वाजत असते परंतु श्रेयसा फोन उचलत नाही...
" ही फोन नाही उचलत आहे... " ती दुसऱ्या मैत्रिणीला सांगते....
" बहुतेक काहीतरी झाल असेल आपल्याला जाऊन बघायला पाहिजे.... काहीतरी महत्त्वाचे असल्याशिवाय श्रेयसा असे वागणार नाही.... " दुसरी मैत्रीण काही सा विचार करत म्हणाली...
" ठीक आहे... आपण त्या स्टॉप वरून गावात जाणारी गाडी पकडूया आणि जाऊन बघू, काय झाला आहे ? " पहिली मैत्रीणही होकार देते....
श्रेयसा फास्ट स्पीड मध्ये गाडी चालवत अर्ध्या तासांमध्ये आपल्या घराजवळ येऊन पोहोचते ती दारातच गाडी थांबवते आणि तशीच रागाने गाडीमधून बाहेर येते... ती इकडे तिकडे न पाहता सरळ आपल्या अरुणच्या दिशेने पळतच जाते...
" श्रेया.... बाळाsss काय झालं, तू.... " तिला अशी घाई गडबडीत येताना पाहून सुरभी ही गोंधळून तिला आवाज देत असते परंतु ती मागे वळूनही पाहत नाही...
" वहिनी जी , ताईंनी गाडी पण दारातच पार्क केली आहे... " त्यांच्या घरात काम करणारे काका सांगतात...
" काका तुम्ही ती काडी व्यवस्थित जागेवर पार्क करून या... " सुरभी काळजीने एक नजर वर पाहून त्यांना सांगते... तसे ते बाहेर गाडी जवळ जातात... गाडीची चावी गाडीमध्येच असते त्यामुळे ते ती गाडी व्यवस्थित जागेवर पार्क करतात आणि चावी घेऊन आत येतात आणि जागेवर ठेवून देतात....
" श्रेया sss श्रेया.... काय झालं बाळा ? दरवाजा उघड... " सुरभी दरवाजाला बाहेरून नॉक करत तिला आवाज देते...
" आई प्लीज! मला थोडा वेळ एकटीला राहू द्या... " श्रेयसा चा रडका आवाज ऐकून सुरभी ला अजूनच तिची काळजी वाटू लागते....
" बाळा काय झालं ते तरी सांग.... " सुरभी ही हळव्या आवाजात विचारते परंतु श्रेयसा काही बोलत नाही... शेवटी वैतागून सुरभी खाली हॉलमध्ये येऊन बसते...
" काकीsss काकीss.. " दरवाजा मधून आवाज ऐकल्याबरोबर सुरभी त्या दिशेला पाहू लागते....
" तुम्ही दोघी... श्रेयसा तुमच्या दोघींबरोबरच थोड्या वेळापूर्वी बाहेर गेली होती ना... मग तिला नक्की काय झालं ? " सुरभी काळजीने त्या दोघींकडे पाहून त्यांना विचारते....
" आम्हालाही नक्की माहित नाही काय झालं पण ती घरी आली का ? " त्या दोघीही एक साथ त्यांना विचारतात...
" हो sss आता थोड्या वेळापूर्वीच आली पण कोणाशी काही न बोलता सरळ आपल्या रूम मध्ये गेली आहे.... स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतले आहे... मी किती दरवाजा वाजवून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यासोबत एक शब्दही बोलली नाही... तुम्ही लोक कुठे गेला होतात आणि तिकडे काय झाले का ? " सुरभी काळजी ने त्या दोघींकडे पाहून त्यांना विचारते....
" नाही हो काकी... आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा ती अगदी व्यवस्थित होती... काही वेळ आम्ही गावांमध्ये फिरलो आणि मग गावच्या बाहेर असलेल्या त्या नवीन हॉटेलमध्ये जेवायला गेलो... जेवण करेपर्यंत ती आमच्या सोबत व्यवस्थित हसत बोलत होती... जेवण झाल्यानंतर हात धुवून येते असे बोलून ती जागेवरून उठून गेली... आम्ही किती वेळ तिची वाट पाहत होतो परंतु ती काही आलीच नाही... शेवटी वैतागून आम्ही हॉटेल च्या बाहेर येऊन पाहिलं तर तिची गाडीही तिकडे नव्हती... मग आम्हाला असे वाटले की, ती बहुतेक घरी आली असेल मग आम्ही गावात येणारी बस पकडून सरळ इकडे आलो.... " दुसऱ्या मैत्रिणीने व्यवस्थितपणे घडलेली सगळी घटना समजावून सांगितली...
" तुमच्यासोबत असताना जर ती व्यवस्थित हसत बोलत होती तर मग मध्येच तिला असे काय झाले ? " सुरभी पण विचार करू लागली...
" काकी, आम्ही तिला भेटून येऊ का ? " पहिल्या मैत्रिणीने विचारलं...
" नाही sss आता नको... आता ती खूप रागात असल्यासारखी वाटत होती माझ्यासोबतही व्यवस्थित बोलली नाही... तिला एकटीला राहायचं आहे असे म्हणाली... काही वेळ जाऊ द्या पाहिजे तर संध्याकाळी येऊन तिला भेटा... " सुरभी शांत स्वरात त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाली....
" ठीक आहे काकी.... आम्ही दोघी पण संध्याकाळी तिला भेटायला येतो... " असे बोलून त्या दोघी पण घरातून बाहेर निघून गेल्या...
सुरभीलाही आपल्या मुलीची काळजी लागली होती परंतु थोडा वेळ तिला शांत राहू दे असा विचार करून त्या आपल्या रूममध्ये जाऊन बसल्या....
आर्यव्रत आपल्या मित्रांसोबत त्या हॉटेलमध्ये जेवण करत होता परंतु त्याचे पूर्ण लक्ष त्याच्या मोबाईलवर होते... त्याने दोन ते तीन वेळा तिला कॉल केला होता परंतु अजून तिचा रिप्लाय का आला नाही म्हणून त्यालाही काळजी वाटत होती... भूक लागलेली असूनही घास त्याच्या घशाखाली जात नव्हता त्यामुळे त्याने प्लेटमध्ये घेतलेले थोडेसे अन्न कसेबसे संपवले...
" आर्य, काय झाले ? अरे ही तुझीच पार्टी आहे आणि तूच व्यवस्थित जेवला नाहीस... " संजय त्याच्या प्लेट कडे पाहून त्याला विचारतो...
" नाही sss असे काही नाही... मी खरं तर तुमच्या सगळ्यांना पार्टी देण्यासाठी इकडे घेऊन आलो आहे ना... तुम्हाला इकडचे जेवण आवडलं ना ? " आर्यव्रत त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना विचारतो...
" हो sss इकडची टेस्ट खूप छान आहे... शिवाय आपण मागवलेले ते इटालियन डिश मला खूप आवडली... " वृषाली हसून सगळ्याकडे पाहून म्हणाली...
" हो sss मला ही कोरियन नूडल्स छान वाटले फक्त टेस्टला थोडे तिखट होते ना... " प्रदीप सगळ्यांकडे पाहून म्हणाला....
" अजून काही मागवायचे आहे का ? " आर्यव्रत ने एक नजर सगळ्यांकडे पाहून विचारले...
" नो sss पोट फुल झाले आहे , आता काही नको... " सगळ्यांनी एकसाथ उत्तर दिले....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा