डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग २९
" ओके... " असे बोलून आर्यव्रत वेटर ला बोलावून त्यांचे बिल मागवून घेतो.... बिल भरून ते सगळे हॉटेलच्या बाहेर येतात...
" मी जसे ऐकले होते, या हॉटेलचे वातावरण अगदी तसेच आहे, इकडचे वातावरण, पदार्थांची चव खूप छान आहे ... " वृषाली बाहेर पडताच कौतुकाने म्हणाली...
" तुम्ही इकडेच थांबा... मी गाडी घेऊन येतो... " असे बोलून आर्य गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी जातो... तो जात असताना आपल्या मोबाईल वरून श्रेयसा चा नंबर डायल करतो... रिंग जात असते पण ती फोन उचलत नाही...
’ ही फोन का उचलत नाही ? ’ वैतागून तो बंद झालेल्या फोनकडे पहात मनामध्ये विचार करतो... गाडीमध्ये बसून तो पुन्हा एकदा तिच्या नंबर वर फोन करणार इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजते त्याला त्याच्या ऑफिसमधून फोन येतो... तो फोन उचलतो...
" हॅलो सर, मॅनेजमेंट ने एक अर्जंट मीटिंग बोलावली आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ऑफिसमध्ये यावे लागेल... " त्यांच्या ऑफिसमधून एका सह कर्मचाऱ्याचा फोन असतो...
" हो sss आम्ही अर्ध्या तासात ऑफिसमध्ये पोहोचतो... " आर्यव्रत बोलून फोन बाजूला ठेवतो आणि गाडी चालू करतो... संजय, प्रदीप आणि वृषाली गाडी मध्ये येऊन बसतात...
" ऑफिस मधून फोन आला होता... पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला ऑफिसमध्ये पोहोचायचे आहे... एक अर्जंट मीटिंग बोलावली आहे... " आर्यव्रत गाडी चालवतच त्या सगळ्यांना माहिती देतो...
" हो sss रे... मलाही ऑफिस मधून मेसेज आला आहे... " संजय आपल्या मोबाईल मध्ये आलेला मेसेज वाचून सांगतो... आर्यव्रत आपली गाडी थोड्या स्पीडमध्ये चालवतो आणि अर्ध्या तासाच्या आतच ते ऑफिसमध्ये पोहोचतात...
" माझे काम तर पूर्ण झाले आहे... मी एकदा तुमच्या सरांना भेटून निघतो... " प्रदीप त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगतो...
" थँक्यू सो मच प्रदीप... आज तू मदत केली आणि विश्वास दाखवला म्हणून मी माझा सॉफ्टवेअर व्यवस्थितपणे चालू करू शकलो... पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद... " आर्यव्रत त्याच्यासोबत हात मिळवणी करत म्हणाला...
" हे माझे कर्तव्य आहे... मागच्या सात-आठ वर्षापासून मी सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट म्हणूनच काम करत आहे म्हटल्यावर थोडफार नॉलेज करायला असेल ना, पण मला तुझ्या कौतुक करावेसे वाटते की तू नुकतेच हे ऑफिस जॉईन केले आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तिकडे काम करत असताना देखील तू स्वतःचे सॉफ्टवेअर बनवले आणि तेही इतके चांगले... अजून तरी मी स्वतःही असा विचार केला नव्हता पण तू तो केला आणि ही खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे... तुझ्या सॉफ्टवेअर ला ऑफिसमधून अनुमती भेटेल आणि त्याचा आपल्या या गावाला खरंच खूप फायदा होईल, असे मला मनापासून वाटत आहे... " प्रदीपही हसून त्याच्याकडे पाहून म्हणाला....
" तुमच्या सगळ्यांची जर मला अशीच साथ मिळाली तर आपण लवकरच आपल्या गावची प्रगती करून या गावचे सक्षमीकरण करू... " आर्यव्रत आनंदाने आपल्या मित्रांकडे पाहून म्हणाला...
" नक्कीच! " प्रदीप बोलून तिकडून त्यांच्या सरांना भेटण्यासाठी निघून जातो...
" चला आता आपल्याला पण त्या मीटिंगची तयारी करायला पाहिजे... काही वेळातच मीटिंग सुरू होईल... " असे बोलून संजय आणि आर्यव्रत मिटींगची तयारी करू लागतात....
****************************
श्रेयसा बराच वेळ आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते तिचे तिच्या फोनकडेही लक्ष नसते... तिचं लग्न ठरल्यापासूनचे सगळे क्षण तिला आठवू लागतात... आधी तर तिचाही या लग्नाला नकार होता, पण हळूहळू इनामदारांच्या घरचे वातावरण पाहून कुठेतरी तीही हळूहळू त्या वातावरणामध्ये जुळवून घेऊ लागली... रेवती आणि आदित्य राज तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे जपत होते.... आपल्याला आपले दुसरे आई वडील मिळाल्यासारखे तिलाही वाटत होते....
श्रेयसा बराच वेळ आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते तिचे तिच्या फोनकडेही लक्ष नसते... तिचं लग्न ठरल्यापासूनचे सगळे क्षण तिला आठवू लागतात... आधी तर तिचाही या लग्नाला नकार होता, पण हळूहळू इनामदारांच्या घरचे वातावरण पाहून कुठेतरी तीही हळूहळू त्या वातावरणामध्ये जुळवून घेऊ लागली... रेवती आणि आदित्य राज तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे जपत होते.... आपल्याला आपले दुसरे आई वडील मिळाल्यासारखे तिलाही वाटत होते....
आर्यव्रत सोबतही आधी तिचे व्यवस्थित पटत नव्हते पण हळूहळू ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले... त्यांनी आपल्या या अनिश्चित बंधनाबद्दल आधीच एकमेकांना सांगितले होते त्यामुळे कोणीही हे बंधन एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न करत नव्हते.... एकाच घरात एकाच रूम मध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती आणि ते दोघेपण एकमेकांचं स्वतंत्र जपत एकमेकांसोबत मैत्रीणीने बोलत होते...
’ आर्य ने आधीच स्पष्ट केले होते की, त्याला हे बंधन नको होते आणि ही गोष्ट मी ही मान्य केली होती मग आता त्याच्या अशा वागण्याचा किंवा त्याला त्या मुली सोबत पाहून माझ्या मनाला का त्रास होत आहे ? ’ श्रेयसा स्वतःच्या मनाला प्रश्न करू लागली....
" श्रेया बाळा..... दरवाजा उघड बाळा, किती वेळ अशी स्वतःला कोंडून घेऊन बसणार आहेस ? " सुरभी काळजीने तिच्या रूमच्या बाहेर येऊन आवाज देते... सकाळपर्यंत तर व्यवस्थित होती मग आता अचानक असे काय झाले असेल असा प्रश्न तिच्या मनालाही पडलेला असतो...
श्रेयसा आपले डोळे पुसत जागेवरून उठून उभी राहते आणि दरवाजा उघडते...
" झालं बाळा, तू ठीक आहेस ना ? तुला कोणी काही बोलले का ? अशी का रडत आहेस ? रडून रडून डोळे बघ कसे लाल झाले आहेत... " सुरभी काळजीने तिच्याजवळ येऊन तिला प्रेमाने विचारू लागते...
" आई.... " श्रेयसा आपल्या आईला मिठी मारून अजूनच रडू लागते..
" अग, अशी का रडत आहेस ? काय झाल आहे ते तरी सांग... माझ्या जीवाला किती घोर लागला आहे.... " तिच्या रडण्याने सुरभी अजूनच घाबरून जाते...
" आई मी आता इकडेच राहणार... मी कुठे नाही जाणार... मला त्या घरी नाही जायचं... " श्रेयसा भावनेच्या भरात आर्यव्रत चा विचार करत पटकन बोलून जाते...
" काय? श्रेया बाळा मला सांग तू असे का बोलत आहेस ? तिकडे काही झाले आहे का ? तुला कोणी काही बोलले आहे का ? त्या घरातल्या माणसांनी तुझ्यासोबत काही वाईट व्यवहार केला का? तू ठीक आहेस ना, तुला कुठे काही लागले तर नाही ना ? " सुरभीच्या मनामध्ये नको नको ते विचार येऊ लागतात आणि ते घाबरून श्रेयसा ला सगळीकडे व्यवस्थित पाहू लागते...
" नाही आई.... तिकडची माणसं खरच खूप चांगली आहे मला समजून घेतात पण... " श्रेयसा ला आपण आपल्या आईला भावनेच्या भरात काय बोलून गेलो याची जाणीव होते, तशी ती गडबडून विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागते...
" असे आहे तर मग तुला का तिकडे जायचं नाही ? श्रेया, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ... सांगशील का ? नाही तर मग मला तुझ्या वडिलांना फोन करून घरी बोलवून घ्यावे लागेल, मग तेच तुझ्यासोबत बोलतील... " सुरभी काळजीने पण थोड्या करारी आवाजात विचारते...
" आई, तुम्ही हे लग्न माझ्या मनाच्या विरुद्ध केल आहे... तरीही मी तिकडे त्यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे... ते सगळे हे खूप चांगले आहे मला समजून घेतात पण मला तिकडे तुमची आठवण येते , या घराची आठवण येते... हा माझा बेडरूम आहे... मला लहानपणापासून या बेडरूम मध्ये राहण्याची सवय आहे... या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर कशी काय विसरू शकते... " श्रेयसा आपल्या आईला काही समजू नये म्हणून विषय मोठ्या शिफारतीने बदलते....
" एवढेच ना.... वेडाबाई, किती घाबरले होते मी... थोड्या वेळापूर्वी तुझी अवस्था पाहून तर काही सुचत नव्हतं... असे वाटत होते, आताच्या आता तुझ्या वडिलांना घरी बोलून घ्यावे... तेच काय ते बघून घेतील. .. " सुरभी मोठे मोठे श्वास घेत त्याच्याकडे पाहून तिला म्हणाली...
" आई... मी ठीक आहे तुला उगाचच नको तो विचार करण्याची गरज नाही... " श्रेयसा आपल्या आईची अवस्था पाहून आता तिलाच भीती वाटू लागते...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा