Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३१

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ३१

अनन्या आणि श्रेयसा तिच्या आईसमोर नॉर्मल गप्पा मारतात... थोड्या वेळाने त्या दोघी पण उठून आईचा निरोप घेऊन तिकडून बाहेर येतात... त्या दोघी पण गावामध्ये  त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बगीचे मध्ये जाऊन बसतात...

" श्रेयसा... आत्ता सांग मला... " त्या दोघी मिळून बगीच्या मध्ये एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे असतात तिकडेच अनन्या तिला विचारते...

" अनन्या.... तुला तर माझ्या लग्नाबद्दल माहीतच आहे ना... " असे बोलून श्रेयसा तिला तिच्या लग्नापासून ची सगळी कथा सांगते... लग्नानंतर इनामदारांच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून जे काय झालं ते सगळं तिला अगदी व्यवस्थितपणे सांगते.... आर्यव्रत आणि तिच्या मधे पहिल्या दिवशी झालेल्या बोलणं आणि त्यानंतर हळूहळू त्या दोघांच्या नात्यांमध्ये होणारी ओळख याबद्दल ही तिला सांगितले...

" श्रेयसा तू आर्यव्रत च्या प्रेमात पडली आहेस... " अनन्या तिचं सगळं बोलणं ऐकून तिच्याकडे पाहून म्हणाली...

" काय ss? " श्रेयसा आश्चर्याने जवळजवळ ओरडूनच तिला विचारते...

" हो sss श्रेया.... तू त्याच्या प्रेमात पडली आहे... You are in love my dear... " अनन्या आनंदाने तिच्याकडे पाहून म्हणाली...

" नाही अनन्या... असे काही नाही.. कदाचित इतक्या दिवसापासून मी त्याच्यासोबत राहत आहे त्यामुळे मला त्याची सवय झाली असेल पण मला प्रेम झालं... " श्रेयसा विचार करू लागते...

" हो माय डियर... तू स्वतःच विचार कर ना... ही जर फक्त मैत्री असती तर तुला त्याच्या वागण्याचे इतके वाईट वाटले नसते, आज दुपारी त्याला एका दुसऱ्या मुली सोबत पाहून जी तुझी अवस्था झाली होती तिचा विचार कर... फक्त मैत्रीमध्ये तुला काही फरक पडला असता का ? " अनन्या तिच्याकडे पाहून तिला तिच्या मनातल्या भावना सांगण्याचा प्रयत्न करते...

" आर्य मला आवडतात.... मी त्यांच्यावर प्रेम करते... " श्रेयसा इतक्या दिवस त्याच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत आपल्या भावना समजून घेते.... इतके दिवस ती जे आर्यव्रत साठी फील करत होती ते प्रेम होते याची जाणीव झाल्याबरोबर तिच्या चेहऱ्यावर लाजे ची लाली पसरते...

" अनु, पण दुपारी तो,  त्या हॉटेलमध्ये,  त्या मुलीसोबत.... अनु , त्याने मला त्याच्या मनातल्या भावना आधीच स्पष्टपणे सांगितल्या आहेत आणि तो  माझ्यावर प्रेम करत नाही.... " श्रेयसा नाराजीच्या स्वरात म्हणाली...

" श्रेयसा,  तुला आजपर्यंत तुझ्या मनातल्या त्याच्याबद्दल असलेल्या भावना माहीत नव्हत्या... तर तू मग त्याच्या मनात काय चालू आहे याबद्दल कसं काय सांगू शकते ? " अनन्या

" हो, मी सांगू शकते कारण त्या दिवशी जेव्हा मी त्याच्या रूममध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न केला तो बदल त्याला अजिबात आवडला नाही... आणि मी आणलेले काचेचे शोपीस खाली फेकून तोडले आणि त्याच्या अशा वागण्यावर त्यांनी मला सॉरी देखील म्हणले नाही... मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला होता पण त्याने त्याच्याकडे पाहिले देखील नाही... तू माझ्यासोबत मागच्या काही दिवसात इतका वाईट वागत होता त्याने मला स्पष्टपणे इग्नोर केले... एवढा सगळं होऊनही त्याने मला एका शब्दाने सॉरी म्हणाला नाही.... उलट तो त्याच्या त्या मैत्रिणी सोबत हॉटेलमध्ये आला... आता या सगळ्याचा मी काय अर्थ लावू , तूच सांग ना.... " श्रेयसा

" श्रेया, तू बोलत होती ना की, त्याने आज तुला कॉल केला होता पण तू उचलला नाही... " अनन्या प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून त्याला विचारते...

" हो sss... मी घरी आल्यापासून मोबाईल कडे पाहिलंही नाही... मी माझ्याच विचारांमध्ये मग्न होते , तेव्हा कधी मोबाईलवर त्याचा फोन येऊन गेला मला समजले नाही... " श्रेयसा

" आता तू मी काय सांगते ते व्यवस्थित ऐक... " अनन्या काहीसा विचार करत तिला म्हणाली...

" काय? " श्रेयसा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली....

" तुझ्या मनातल्या भावना तुला स्पष्ट झाले आहेत पण तुला आता त्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय फिलिंग आहेत हे जाणून घ्यायचे असेल ना... " अनन्या

" हो.... " श्रेयसा आतुर होऊन तिला विचारते....

" आता एक काम कर... आजच्या दिवस अजिबात त्याच्यासोबत बोलू नको... त्याचा फोन उचलू नको हो, त्याच्या एकाही मेसेजला तू रिप्लाय द्यायचा नाही... " अनन्या एक्साईटेड होऊन सांगू लागते....

" काय? पण असे का ? " श्रेयसा न समजून विचारते...

" श्रेया, तुला मी जे  सांगितले आहे ते नीट ऐक आणि तसेच कर.... मला तरी असंच वाटत आहे की,  आजच्या दिवसात तो तुला नक्की कॉल किंवा मेसेज करून तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेन , पण तू मात्र या गोष्टीवर अडून रहा...  अजिबात त्याचा कॉल उचलणार नाही किंवा त्याच्या मेसेजला एकही रिप्लाय देणार नाही.... समजले ? " अनन्या करारी आवाजात तिला म्हणाली...

" पण अनु,  माझ्या अशा वागण्याने त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय फीलिंग आहे या कशा समजणार ? " श्रेयसा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारते...

" ज्याप्रकारे तुला त्याच्या वागण्याचा त्रास झाला आणि तुला तुझ्या फिलिंग समजल्या....  त्याच प्रकारे तुझ्या वागण्याचा त्यालाही त्रास होईल आणि कदाचित त्यालाही त्याच्या मनात असलेल्या फिलिंग समजतील आणि मग तो तुझ्यासमोर येऊन कबूल करेल की,  त्याचेही तुझ्यावर प्रेम आहे.... " अनन्या


" आणि जर असे काहीही झाले नाही तर किंवा त्याने मला फोन किंवा मेसेज केला नाही तर... " श्रेयसा नाराज होऊन विचारते....

" त्याचे जर तुझ्यावर प्रेम असेल तर तो नक्कीच तुला कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न करेन... " अनन्या तिला सांगतच असते की , तिच्या फोनची रिंग वाजू लागते.... त्या दोघी पण फोनकडे पाहू लागतात... आर्यव्रत चे नाव फोनवर झळकत असते... ते पाहून श्रेयसा आनंदाने फोन पटकन आपल्या हातात घेते...

" नाही श्रेया sss.... तुला मी मगाशी सांगितले ना की त्याचा फोन उचलायचा नाही... " अनन्या पटकन तिच्या हाता मधून फोन खेचून आपल्या हातात घेते...

" पण त्याने फोन का केला ? अगं , त्याचं काही महत्त्वाचे कामही असू शकते ना ... " श्रेयसा आत्ता आर्यव्रत चा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेली असते... आपण त्याच्यावर प्रेम करतो ही भावनाच तिच्या मनाला सुख देऊन जाते आणि त्याच्यासोबत बोलून कधी एकदा त्याला आपल्या मनातली गोष्ट सांगू असे तिला वाटू लागते...

" त्याचे कितीही महत्त्वाचे काम असो पण आज तू त्याचा फोन अजिबात उचलणार नाही... " अनन्या मात्र तिच्या बोलण्यावर ठाम असते....

" अनु, अगं तू अशी का करत आहेस ? " श्रेयसा ला वाईट वाटू लागते,  तोपर्यंत फोन वाजून बंद होतो...

" श्रेया प्लीज! मी जे काय करत आहे ते माझ्या मैत्रिणीसाठी करत आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि  मी जे सांगत आहे ते ऐक.... फक्त एकदा मी जसं सांगते तसे वाग आणि मग बघ, तुझा आर्यव्रत तुझ्यासमोर येऊन त्याच्या मनातल्या फिलिंग सांगेल... तुला प्रपोज करेल..... " अनन्या तिच्याकडे पाहून समजण्याच्या स्वरात म्हणाली....

अनन्यासोबत बोलून श्रेयसा चे मन हलके झाले होते त्यामुळे तिलाही आता थोडे बरं वाटू लागले.... तिच्या मनातल्या भावना तिला क्लियर झाले होत्या त्यामुळे आता तिच्या मनात असलेले प्रेम तिला समजले होते...

" अनु, अंधार पडू लागला आहे... आता आपल्याला घरी जायला पाहिजे... बाबा घरी आले तर उगाच काळजी करत बसतील... " आजूबाजूला पडलेला अंधार पाहून श्रेयसा म्हणाली...

" हो.... चल, पण मी काय सांगितलं आहे ते लक्षात आहे ना... " अनन्या चालताना तिच्याकडे पाहून तिला विचारते....

" हो ग माझी आई,  आज तू सांगितल्याप्रमाणे मी करेल... त्याचा फोन उचलणार नाही की , त्याच्या मेसेजला एक रिप्लाय ही करणार नाही.... " श्रेयसा तिच्या कडे पाहून तिला सांगते....


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all