Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३२

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ३२

आर्यव्रत आपल्या ऑफिसची मीटिंग अटेंड करतो... त्या मिटींगला त्या कंपनीचे ओनर ही आलेले असतात...

" मिस्टर आर्यव्रत, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर बद्दल मला सांगितले होते... मला असे वाटते की, आता त्या सॉफ्टवेअर चे काम  पूर्ण झाल असेल ना... " ऑनर मीटिंग संपल्यावर त्याच्याकडे पाहून त्याला विचारतात....

" हो सर, त्याचे काम  तर काही दिवसापूर्वीच पूर्ण झाले होते... पण मध्येच अचानक आपल्या ऑफिस ची लाईट गेली आणि त्यामुळे माझ्या सॉफ्टवेअर मध्येही काही बिघाड झाला होता... त्या तांत्रिक बिघाडामुळे सॉफ्टवेअर चालू होत नव्हता म्हणून आम्ही प्रदीपला मदतीसाठी बोलावले होते... याबद्दल आपल्या मॅनेजिंग डायरेक्टरला ही माहित होते... " आर्यव्रत त्यांना आपल्या सॉफ्टवेअर बद्दल सगळे सांगतो...

" हो माझ्या कानावर ही गोष्ट आली होती... पण तुमच्या टॅलेंटवरही तेवढाच भरोसा होता... तुम्ही तुमचा प्रोग्राम व्यवस्थित चालू कराल याची गॅरंटी होती म्हणून मग मी काही विचारले नाही... " ओनर शांतपणे सांगतो...

" हो सर, प्रदीप आणि संजय या दोघांनी माझे सॉफ्टवेअर चालू करण्यामध्ये खूप मदत केली आणि आता तो व्यवस्थित चालू आहे....  आम्ही मागचे दोन-तीन दिवस त्याची चाचणी घेत होतो... आता तो सॉफ्टवेअर सगळ्यांना दाखवण्यासाठी तयार आहे... " आर्यव्रत अगदी निर्धास्तपणे सांगतो...

" ठीक आहे... मग आपण उद्या तुझ्या सॉफ्टवेअर बघायला काही हरकत नाही... मी उद्या दुपारी ऑफिसमध्ये येईल तेव्हा आपण तुझे सॉफ्टवेअर पाहूया आणि मग त्याच्यावर पुढे काय करता येईल हे देखील तेव्हाच ठरवता येईल... " ओनर जागेवरून उठत त्याच्यासोबत हात मिळवणी करत म्हणाला...

" चालेल सर... मी पण तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवण्यासाठी आतुर आहे... " आर्यव्रत ने त्यांच्याशी हात मिळवणी करत आनंदाने उत्तर दिलं.... ओनर डायरेक्टर सोबत काही चर्चा करत तिकडून निघून गेले...

" आर्य.... " आता त्या मीटिंग रूम मध्ये फक्त आर्यव्रत आणि संजय दोघेच होते... सगळे गेल्याबरोबर संजयने आनंदाने त्याच्याकडे पाहिले...

" उद्या माझे स्वप्न पूर्ण होईल... " आर्यव्रत ने आनंदाने त्याला मिठी मारली....

" उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आर्य... उद्या तुझ्या मेहनतीला खरे फळ भेटेल.... " संजय आनंदाने त्याच्याकडे पाहून म्हणाला...  मीटिंग संपेपर्यंत ऑफिसची वेळही होऊन गेली होती आणि बाहेर अंधारही पडू लागला होता.... ते दोघेपण एकमेकांसोबत बोलत मीटिंग रूम मधून बाहेर आले आणि आता आपली बॅग घेण्यासाठी आपापल्या केबिनमध्ये गेले....

’ कधी एकदा ही गोष्ट श्रेयसा ला सांगतो असे झाले आहे... ’ मनामध्ये आनंदाने विचार करतच त्याने आपले सामान बॅग मध्ये भरत दुसऱ्या हातात फोन घेऊन श्रेयसा चा नंबर डायल केला... रिंग जात होती पण समोरून फोन उचलला गेला नाही... 

’ श्रेयसा माझ्यासोबत अशी का वागत आहे ? ती माझा फोन का उचलत नाही... मी आहे की , इतकी महत्त्वाची न्यूज तिला सांगण्यासाठी आतुर झालो आहे आणि तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ? मला न सांगता स्वतःच्या माहेरी जाऊन बसली पण एकदा फोन करून माझ्यासोबत बोलावे असेही तिला वाटत नाही का ? ’ आर्यव्रत चा मूड अचानक बदलला आणि त्याला तिच्या वागण्याचा राग येऊ लागला....

" आर्य, झाले की नाही... की तुझा आजची रात्र इकडेच राहण्याचा विचार आहे.... " संजय बराच वेळ बाहेर त्याची वाट पाहून शेवटी त्याच्या केबिनमध्ये आला...

" झाले... चला... " आर्यव्रत त्याला पाहून गडबडून पटकन फोन खिशात ठेवून आपली बॅग उचलतो आणि त्याच्या मागोमाग चालू लागतो....

" काय रे, थोड्या वेळापूर्वी तुझा मूड इतका चांगला होता आणि आता तुझ्या चेहऱ्यावर असा राग का दिसत आहे... " संजय आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला विचारतो...

" काही नाही.... मी ठीक आहे... " आर्यव्रत आपला चेहरा नॉर्मल करत उत्तर देतो...

" तुला घरी सोडायचे आहे का ? " आर्यव्रत आपल्या गाडीजवळ आल्यावर त्याला विचारतो...

" नाही... आज माझा आणि वृषाली चा बाहेर जाण्याचा प्रोग्राम आहे...  सो तुम्ही जावा... " संजय हसत त्याच्याकडे पाहून त्याला उत्तर देतो...

" ठीक आहे... एन्जॉय युवर नाईट... " आर्यव्रत त्याच्याकडे पाहून एक डोळा ब्लिंक करत गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी चालू करतो... आर्यव्रत आपली गाडी फास्ट चालवत काही वेळातच घरापर्यंत घेऊन पोहोचतो...

" आई sssssss.... " आर्यव्रत घरात आल्याबरोबर आईच्या नावाचा गजर चालू करतो....

" काय रे... असा का ओरडत आहेस? काय झालं? " रेवती त्याच्या आवाजाने घाबरूनच किचन मधून बाहेर येऊन त्याच्याकडे पाहून म्हणाली...

" आई.... आई.... आई... मी आज खूप खूप खुश आहे... " आर्यव्रत आनंदाने आपल्या आईला गोल गोल फिरवत म्हणाला....

" अरे अरे ssss काय करत आहेस , सोड मला.... " रेवती गोल फिरवल्यामुळे अडखळत त्याचा हात सोडत म्हणाली...

" आई... " आर्यव्रत

" अरे तुझ्या आनंदाचे कारण तरी सांगशील की नाही... " रेवतीने आनंदाने त्याच्याकडे पाहून त्याला विचारले... आज खूप दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद पाहून तिलाही बरं वाटत होते...

" आई... मी तुम्हाला माझ्या सॉफ्टवेअर बद्दल सांगितले होते ना... तो सॉफ्टवेअर पूर्ण झाला आहे आणि आमच्या कंपनीचे ओनर उद्या त्या सॉफ्टवेअरची पडताळणी करणार आहे... तो सॉफ्टवेअर जर त्यांना आवडला तर लवकरच त्या सॉफ्टवेअरवर पुढे आपल्या गावच्या विकासाचे काम सुरू होईल... " आर्यव्रत आनंदाने आपल्या आईला सांगू लागतो...

" खरंच! म्हणजे माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण होत आहे... आज तू खरच खूप गोड बातमी दिली...  थांब , मी देवासमोर साखर ठेवून येते... " रेवती पण आनंदाने जागेवरून उठून प्रेमाने त्याच्या केसावरून हात फिरवत त्याच्या माथ्यावर हलके ओठ टेकवतात आणि देवापुढे साखर ठेवण्यासाठी निघून जातात....

रेवती देवापुढे दिवा लावून साखर आणि घरात असलेली मिठाई ठेवतात... मनोभावे देवाची पूजा करून आपल्या मुलांसाठी आशीर्वाद मागतात... एक मिठाईचा तुकडा घेऊन ते आर्यव्रत जवळ येऊन त्यालाही मिठाई भरवतात... आर्य थोडा तुकडा मोडून उरलेला आपल्या हातात घेऊन आपल्या आईला भरवतो...

" आई.... " आर्यव्रत

" हा ss बोल बाळा... " रेवती

" श्रेयसा  घरी परत कधी येणार आहे ? तुला काही माहित आहे का ? " आर्यव्रत

" नाही रे... याबद्दल मी तिला काहीही विचारले नाही,  पण आता माहेरी गेल्यासारखी राहील काही दिवस... " रेवती

" हम्म... " आर्यव्रत

" का रे, इकडे होती तर तिच्याकडे लक्षही दिले नाही आणि आता काय , तिची आठवण येत आहे का ? " रेवती मुद्दामून त्याची मस्करी करत विचारते...

" आई मी कधी  तिच्याकडे लक्ष दिले नाही... हाsss  मागच्या काही दिवसात मी जरा माझ्या कामात बिझी होतो त्यामुळे मला वेळ भेटला नाही... " आर्यव्रत

" इतकीच तिची जर आठवण येत आहे,  तर मग तिला फोन करून विचार ना... कधी येणार ते ? " रेवती

’ तेच तर करत आहे पण तिने फोन उचलला तरच मी तिला पुढे काही विचारू शकेल ना... ’ आर्यव्रत तिचं बोलणं ऐकून मनामध्ये विचार करतो...

" काय रे... कसला विचार करत आहेस ? " रेवती त्याला विचारात हरवलेले  पाहून म्हणाली...

" काही नाही... मी जरा माझ्या रूम मध्ये आहे... तू बाबा आले की मला आवाज दे... " असे बोलून आर्यव्रत आपल्या रूममध्ये निघून जातो...

’ आज दुपारपासून मी तिला फोन करत आहे पण ही महाराणी आहे की माझा फोनही उचलत नाही आणि एक साधा मेसेज करून रिप्लाय ही देत नाही... मी आधीच मनामध्ये विचार केला होता की जेव्हा माझा हा सॉफ्टवेअर पूर्ण होईल तेव्हा ओनरला दाखवण्याच्या आधी मी एकदा श्रेयसा ला दाखवेल आणि तिला या सगळ्याबद्दल सांगेल... पण आता ही मॅडम घरी नाही आणि माझा फोनही उचलत नाही... उद्या ओनर सॉफ्टवेअर बघण्यासाठी ऑफिसमध्ये येणार आहे... आता मी काय करू ? ’ आर्यव्रत आपल्या रूम मध्ये  बसून विचार करू लागतो...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all