Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३३

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ३३

आर्यव्रत बराच वेळ विचार करतो.. यादरम्यान त्याची नजरही सतत फोनवर जात होती परंतु श्रेयसा ने अजूनही त्याला फोन , मेसेज केला नव्हता... खालून आईचा आवाज ऐकू आला तसा तो खाली निघून गेला...

श्रेयसा आणि तिची मैत्रीण अनन्या दोघी पण श्रेयसा च्या घराजवळ येऊन थांबतात...

" श्रेया, मी काय सांगितले होते तुझ्या लक्षात आहे ना ? " अनन्या प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारते....

" हो sss..  " श्रेयसा शांतपणे उत्तर देते...

" श्रेया, एकदा फक्त माझं ऐक आणि आज त्याचा फोन उचलू नको... " अनन्या

" हो ग माझी आई , आता तरी मी घरी जाऊ की नको... " श्रेयसा वैतागून तिच्याकडे पाहून तिला उत्तर देते...

" हो... जा... " अनन्या बोलून तिकडून आपल्या घराच्या दिशेने निघून जाते... श्रेयसा घरात येते त्या तिचे वडीलही येऊन बसलेले असतात...

" काय मग आज मैत्रिणीच्या बराच वेळ गप्पा चालू होत्या... " श्रीकांत तिला येताना पाहून विचारतात...

" हो बाबा... आम्ही थोडावेळ बगीच्या मध्ये जाऊन बसलो होतो... मोकळ्या हवेत... " श्रेयसा त्यांच्याजवळ जाऊन बसते...

" काय ग... तुझा चेहरा का इतका उतरला आहे... बरं नाही वाटत का ? " श्रीकांत तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विचारतात... त्यांचं बोलणं ऐकून ती पटकन सुरभी कडे पाहू लागते... आपल्या आईने त्यांना काही सांगितले तर नाही ना असा विचार तिच्या मनात येऊन जातो...

" दुपारी जास्त वेळ झोप झाली आहे म्हणून कसे वाटत असेल... " श्रेयसा एक नजर आपल्या आईकडे पाहून उत्तर देते...

" ठीक आहे..  आराम करा... " श्रीकांत

श्रेयसा आपल्या वडिलांसोबत थोडा वेळ गप्पा मारत असते... सुरभी सगळ्यांसाठी जेवण वाढते...  तिघे मिळून एकत्र जेवण करतात... जेवण झाल्यावर श्रेयसा आपल्या रूममध्ये येऊन बसते...

आर्यव्रत ही आपल्या आई वडिलांसोबत गप्पा मारून जेवण करून आपल्या रूममध्ये येऊन नुकताच बसलेला असतो... आता त्याला श्रेयसा ची खूपच आठवण येऊ लागते... तू पुन्हा एकदा आपला मोबाईल हातात घेतो आणि तिचा नंबर डायल करतो... फोनची रिंग वाजू लागते... श्रेयसा चे लक्ष फोनवर जाते... ती पटकन फोन आपल्या हातात घेते...

’ नाही sss नको.... अनन्याने सांगितला आहे तर ऐकायला पाहिजे , पण आर्य सारखा सारखा फोन करत आहे त्याचे काही महत्त्वाचे काम असेल तर... ’ श्रेयसा ही त्याच्यासोबत बोलण्यासाठी आतुर झालेली असते परंतु त्याच्यावर असलेल्या रागामुळे तिने स्वतःला थांबवलेले असते...

’ नाही... माझ्याकडे असे काय महत्त्वाचे काम असेल... ’ श्रेयसा फोन कडे पाहून नाराजीच्या स्वरात स्वतःलाच सांगते... फोन वाजून पुन्हा बंद होतो...

आर्यव्रत तो फोन रागाने बेडवर फेकून देतो....

’ एक स्वतःचा फोन ही मुलगी उचलू शकत नाही का ? एवढी अशी कोणत्या कामांमध्ये बिझी असणार आहे की, माझ्यासोबत बोलायचं नाही असं ठरवले आहे... जाऊदे , मला काय करायचं आहे.. मीच का तिला महत्व द्यावे... नाही फोन उचलायचा ना मग नको उचलू दे... मलाही तिची काही गरज नाही... तुझ्यासोबत बोललो नाही तर झोप येणार नाही असे तर नाही ना... ’ आर्यव्रत रागाने बडबड करत आपले कपडे चेंज करण्यासाठी नाईट सूट घेऊन बाथरूम मध्ये निघून जातो... फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बेडवर आडवा होऊन झोपण्याचा प्रयत्न करतो... झोपण्यासाठी जसे तो आपले डोळे बंद करतो त्याच्या डोळ्यासमोर श्रेयसा चा चेहरा येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते...

’ अरे यारsss ही मुलगी तर माझ्या डोक्यावर बसून तांडव करत आहे.... आता तर मस्त कुंभकर्ण सारखी झोपली असेल पण मला मात्र शांतीने झोपू देत नाहीस... जवळ असली तरी त्रास देते आणि आता घरात नाही तरी शांतीने झोपू देत नाही... मनामध्ये सारखे तिचीच विचार येत आहेत, डोळे बंद केले तरी तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत आहे... असे का होत आहे... ’ आर्य ला ही त्याच्या भावना समजत नसतात पण आज नक्कीच काहीतरी त्याच्या अंतर्मनात चालू असते... बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करूनही त्याला झोप काही येत नाही...

तिचा विचार मनातून घालवण्यासाठी तो मोबाईल घेऊन सोशल मीडियावर टाईमपास करू लागतो... बराच वेळ सोशल मीडियावर टाईमपास करून त्यालाही वैताग येतो...

’ यार sss काय करू मी आता... सगळे करून तर पाहिले , पण तिचा विचार आहे की मनातून जाण्याचे नावच घेत नाही... उद्या मला सॉफ्टवेअर ओनरला दाखवायचा आहे आणि त्याआधी मी काहीही करू या सॉफ्टवेअर बद्दल श्रेयसा ला सांगणारही आहे आणि दाखवणारही आहे,  मग मला त्याच्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल... ’ आर्यव्रत आता मात्र आपल्या जिद्द वर अडलेला असतो...  तो घड्याळाकडे पाहतो तर रात्रीचे 12:30 झालेले असतात...

’ आज काहीही झालं तरी मी माझ्या श्रेयसा ला भेटूनच राहणार मग कितीही अडथळे येऊ दे... ’ आर्यव्रत साईड टेबलवर ठेवलेली गाडीची चावी हातामध्ये उचलत बोलून जातो...

" काय sss माझी श्रेयसा.... माझी? हो sss माझीच.... ती फक्त माझी आहे आणि आता ही गोष्ट तिलाही समजायला पाहिजे... " आर्यव्रत आनंदाने आरशामध्ये पाहून बोलतो... आज त्याला त्या दोघांच्या नात्यांमध्ये असलेली भावना आणि त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल असलेले प्रेम समजते, तसा त्याला ही आनंद होतो...

" Ohhh...My dear beautiful wife, your husband will meet you soon..... " आर्यव्रत बोलतच आपल्या गाडीची चावी घेऊन हळूच आपल्या रूम मधून बाहेर पडतो... बाहेर सगळीकडे शांतता पसरलेली असते... त्याच्या आई वडीलही त्यांच्या रूम मध्ये जाऊन झोपलेले असतात आणि घरातली नोकर मंडळी पण आपल्या रूम मध्ये जाऊन झोपलेली असते...

आर्यव्रत हळूच पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये येतो... सगळीकडे आपली नजर फिरवत मेन दरवाजा जवळ येऊन उभा राहतो... एक नजर सगळीकडे फिरवून तो हळूच दरवाजा खोलून बाहेर जातो आणि दरवाजा बंद करतो....

" ओह् मेरी श्रेया sss आ रहा है तेरा पिया... " आर्यव्रत बोलून आपली गाडी चालू करतो आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी फुल स्पीड मध्ये पळवतो... दीड तासाचा रस्ता रात्र असल्यामुळे तो पाहून तासांमध्ये पार करतो आणि तिच्या घरा पासून काही अंतरावर आल्याबरोबर आपली गाडी थांबवतो...

आर्यव्रत आपली गाडी हळूहळू चालवत तिच्या घराच्या गेट पर्यंत घेऊन जातो... गेटवर असलेला वॉचमेन त्याची गाडी पाहून लगेच पुढे येऊन थांबतो...

" सर , आत मध्ये फोन करून कळवू का तुम्ही आले आहात ते ? " वॉचमेन त्याला पाहून लगेच विचारतो...

" नाही sss नको... मी जातो... " आर्यव्रत त्याला पाहून उत्तर देतो...

" ठीक आहे... " वॉचमेन बोलून गेट ओपन करतो... आर्यव्रत हळूहळू आपली गाडी चालवत घराच्या जवळ येऊन थांबवतो...

’ या मॅडमचा बेडरूम नक्की कोणत्या बाजूला असेल ? मागच्या वेळी जेव्हा मी घरी आलो होतो तेव्हा... " आर्यव्रत आठवण्याचा प्रयत्न करतो... तो विचार करून आपली गाडी घराच्या डाव्या बाजूने पुढे घेऊन थोड्या मागच्या साईडला थांबवतो...

’ ही बाल्कनी तिच्या बेडरूमचीच आहे... मागच्या वेळी मी जेव्हा आलो होतो तेव्हा तिच्या रूममध्ये जाऊन बाल्कनी  मध्ये फोनवर बोलत असताना,  त्या बाल्कनी चे निरीक्षणही केले होते आणि खालचे दृश्यही पाहिले होते...  ’ आर्यव्रत त्या बाल्कनी मधून आत पाहण्याचा प्रयत्न करतो... तिची बेडरूम पहिल्या मजल्यावर असल्यामुळे त्याला व्यवस्थित काही दिसत नसते, तरीही तो आपल्या गाडीच्या वर उभा राहून आत काही दिसते का ते पाहू लागतो...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all