डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३४
’ बाल्कनी मधून काही व्यवस्थित दिसतही नाही आहे... ’ आर्यव्रत बोलून आपला मोबाईल खिशामधून बाहेर काढतो आणि तिच्या मोबाईलवर पुन्हा एकदा कॉल करतो...
त्याच्या आठवणीने झोप तर तिलाही लागलेली नसते त्यामुळे बेडवर फक्त इकडून तिकडे वळणे चालू होते... मोबाईलच्या आवाजाने वैतागून तिने मोबाईल कडे पाहिले..
" आर्य.... " श्रेयसा आश्चर्याने त्याचे नाव पाहून एक नजर घड्याकडे पाहते... घड्याळात एक वाजून वीस मिनिटं झालेली असतात...
" हा एवढ्या रात्री फोन करत आहे... नक्की काय झालं... आज मी घरीही फोन केला नाही... फोन आता उचलला पाहिजे.. " श्रेयसा ला आता भीती आणि काळजी वाटू लागते... मध्ये तिला अनन्या ने सांगितलेलं आठवते... तरीही ती तिचे विचार डोक्यातून झटकत पटकन फोन उचलते...
" हॅलो... " श्रेयसा
" फायनली, फोन घ्यायला वेळ मिळाला तर... " आर्यव्रत नाटकी स्वरात म्हणाला...
" काय झालं ? घरी सगळे ठीक आहेत ना ? इतक्या रात्रीचा फोन का केला ? " श्रेयसा काळजीने त्याला एकावर एक प्रश्न विचारते...
" एवढीच काळजी होती तर दुपारपासून जेव्हा मी फोन करत होतो, माझा एकही फोन का घेतला नाही किंवा मला साधा एक रिप्लाय ही दिला नाही... तेव्हा ही काळजी कुठे गेली होती? " आर्यव्रत लटक्या रागात विचारतो...
" आर्य sss मी काय विचारत आहे आणि तू काय उत्तर देत आहेस... " श्रेयसा त्याचं बोलणं ऐकून थोड्या रागात विचारते....
" खरं तेच बोलत आहे... मी किती वेळा तुला कॉल केला तू माझा फोन का नाही घेतला ? " आर्यव्रत
" मला फोन करायची काय गरज होती... तुम्ही तर मस्त तुमच्या त्या मैत्रिणी सोबत नवीन हॉटेलमध्ये एन्जॉय करत होता ना... मग तिकडे तुला माझी आठवण का आली ? " श्रेयसा दुपारचा सीन आठवण करून रागामध्ये त्याला विचारते...
" माझी मैत्रीण , कोण? " आर्यव्रत गडबडून तिलाच विचारतो...
" जिच्या सोबत दुपारी तुम्ही त्या हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी गेला होता... नक्की लंच करण्यासाठी गेला होता ना ? " श्रेयसा उलट आवाजात उत्तर देते...
" श्रेयसाsss तू काय बोलत आहेस, तुला तरी समजत आहे का ? तू माझ्याबद्दल असा विचार तरी कसा करू शकतेस ? " आर्यव्रत चा पारा ही हळूहळू चढू लागतो...
" मग मी तुमच्या दोघांना त्या हॉटेलमध्ये तशा अवस्थेत पाहून अजून काय विचार करायला पाहिजे होता ? सांग ना... " श्रेयसा चिडून म्हणाली....
" श्रेयसा अग ती फक्त माझ्या ऑफिस मधली एक एम्प्लॉई आहे... याच्या व्यतिरिक्त आमच्या दोघांमध्ये तसे काही नाही जसं तू विचार करत आहेस... " आर्यव्रत समजावण्याच्या स्वरात म्हणाला...
" असे असेल तर मग, एका एम्प्लॉयी सोबत त्या हॉटेलमध्ये जाण्याचे कारण काय ? " श्रेयसा
" तेच सांगण्याचा मी कधीपासून तुला प्रयत्न करत आहे अगं मी फक्त माझ्या ऑफिसमधल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींना पार्टी देण्यासाठी तिकडे गेलो होतो आणि ती पण आमच्या सोबत आली होती... " आर्यव्रत
" हो का.... मग तुमच्या दोघांशिवाय मला तिकडे दुसरे कोणीही कसे दिसले नाही... " श्रेयसा चा आवाज थोडा शांत होतो...
" कारण तू आमच्या दोघांशिवाय दुसऱ्या कोणाला पाहण्याचा प्रयत्न केला नाही.... तुला जर काही वाटत होते तर तेव्हाच तिकडे थांबून मला विचारायचे होते... असे रागाने तिकडून निघून जाण्यामध्ये काय अर्थ होता... " आर्यव्रत
" तू तिला ज्या प्रकारे पकडले होते ते मला अजिबात आवडले नाही आणि म्हणूनच मी रागाने तिकडून निघून गेले... " आत्ता श्रेयसा ही त्याच्या बोलण्याचा विचार करू लागते...
" मला तिच्यासोबत तसे पाहून तुला राग का आला ? " आर्यव्रत तिच्याच बोलण्यामध्ये तिला अडकवून विचारतो...
" मला नाही माहित... " माहित असून सुद्धा श्रेयसा त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते...
" खरंच माहित नाही आहे की मला सांगायचे नाही आहे... " आर्यव्रत तिची मस्करी करत विचारतो...
" आर्य sss खूप उशीर झाला आहे आता तुम्ही पण झोपा आणि मलाही झोपू द्या... " श्रेयसा लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली...
" तुला काय ग तुझ्या बेडरूम मध्ये मस्तपैकी झोपून जाशील पण मी असा गाडीवर अजून किती वेळ उभा राहू... " आर्यव्रत
" गाडीवर म्हणजे मला समजले नाही... " श्रेयसा त्याचं बोलणं ऐकून पूर्णपणे गोंधळून जाते...
" आता काय करणार, माझी बायको सकाळपासून माझा फोन उचलत नव्हती म्हटल्यावर तिच्यासोबत बोलण्यासाठी मला जो मार्ग सोपा वाटला मी तो वापरला... " आर्यव्रत आपल्या अटीट्यूड मध्ये म्हणाला...
" कोणता मार्ग ? आर्य कुठे आहेस तू ? " श्रेयसा ही त्याच्या बोलण्याने गडबडून जाते...
" बेडवर बसूनच बोलण्यापेक्षा जर बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली तर तुला स्पष्टपणे समजेल की , मी आत्ता कुठे आहे ? " आर्यव्रत
" आर्य sss तू... " श्रेयसा बोलत थोडे घाईनेच बेड वरून खाली उतरत धावतच बाल्कनी मध्ये येऊन उभी राहते आणि इकडे तिकडे पाहू लागते... तिची नजर खाली उभा असलेल्या आर्यव्रत वर जाते जो त्याच्या गाडीच्या वर उभा राहून तिच्या बाल्कनी मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत असतो... तिला समोर पाहून तो ही एक टक तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागतो...
" ब्युटीफूल... " आपसूकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो...
" आर्य.... इतक्या रात्रीचा तू इकडे काय करत आहेस ? घरातल्या कोणी पाहिले तर काय विचार करतील ? " श्रेयसा त्याला असे समोर पाहून घाबरून जाते...
" मला तुझ्या सोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आता मला स्पष्टपणे सांग की, तू इकडे खाली माझ्या जवळ येणार आहेस की मी घराच्या आत तिकडे तुझ्या रूममध्ये तुझ्या जवळ येऊ ? " आर्यव्रत धमकीच्या स्वरात विचारतो...
" आर्य... प्लीज ! तू आता इकडून जा, आपण उद्या बोलु... " श्रेयसा त्याला तिकडून जाण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करते...
" श्रेयसा... मी तुला स्पष्ट शब्दात विचारले आहे की, तू बाहेर येणार आहेस की मी आत येऊ ? " आर्यव्रत तिचं बोलणं इग्नोर कराच विचारतो...
" आर्य sss आई बाबा घरात आहेत जर त्यांनी तुला यावेळी इकडे पाहिले तर ते काय विचार करतील... माझ ऐक ना , आपण उद्या बोलु... " श्रेयसा तरी ही आपल्या बाल्कनीमध्ये उभी राहून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते...
" श्रेयसा माझा नीट ऐकून घे.... पुढच्या पंधरा मिनिटात जर तू इकडे खाली आली नाही तर मी तुझ्या रूममध्ये येईल पण आज तुझ्यासोबत बोलल्याशिवाय मी इकडून जाणार नाही.... " आर्यव्रत बोलून गाडीवरून खाली उतरून गाडीला टेकून उभा राहतो...
त्याचं वागणं आणि त्याच्या बोलण्याचा औरा पाहून तिला समजून जाते की आज तो आपले काहीही ऐकणार नाही.... त्याच्या हट्ट पुढे शेवटी तिला झुकावे लागते... घरच्यांच्या भीतीमुळे तिलाही काही सुचत नसते...
" ठीक आहे.... म sss मी खाली येते.... " श्रेयसा त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली... आर्यव्रत फोन बंद करून शांत गाडीला टेकून उभा राहतो....
श्रेयसा ने आपल्या घरी असल्यामुळे लूज टी-शर्ट आणि खाली थ्री फोर्थ लूज पॅन्ट घातलेली असते... अशा कपड्यात ती कधीच त्याच्या समोर राहत नव्हती म्हणून तिने एक दुपट्टा घेतला आणि त्याने स्वतःला कव्हर केले.... आपला मोबाईल हातात घेतला आणि हळूच रूमचा दरवाजा उघडला...
बाहेरचे वातावरण शांत होते आणि अंधार पसरलेला होता... ती हळूच आपल्या रूम मधून बाहेर आली आणि आपली नजर आजूबाजूला सगळीकडे फिरवत खाली पायऱ्या उतरत मेन दरवाज्याच्या दिशेने चालू लागली...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा