Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३५

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ३५

श्रेयसा एक नजर सगळीकडे पाहून हळूच दरवाजा उघडते आणि बाहेर येते... रात्र असल्यामुळे बाहेरही बऱ्यापैकी अंधार पसरलेला असतो... दरवाजाच्या जवळ असलेला छोटा दिवा पेटत असल्यामुळे आजूबाजूला मंद प्रकाश पसरलेला असतो... श्रेयसा हळूच दरवाजा बंद करून आर्य ज्या ठिकाणी उभा असतो त्या ठिकाणी जाऊ लागते...

आर्यव्रत ची नजर तिच्यावर जाते... आज पहिल्यांदाच त्यांनी दिला अशा कपड्यांमध्ये पाहिलेले असते... खाली फ्लॉवर प्रिंट ची लूज थ्री फोर्थ पॅन्ट आणि बर फिकट गुलाबी रंगाचे हाफ स्लीव्ह चे टी-शर्ट , वरून फिकट निळ्या रंगाच्या ओढणीने तिने स्वतःला कव्हर केले होते... केस मोकळी सोडलेली पण थोडी विस्कटलेली होती, चेहऱ्यावर काहीच मेकअप नव्हता, तरीही ती खूप सुंदर दिसत होती... त्याची तिच्यावर खिळलेली नजर बघून तिच्याच शरीरावर सरसरून काटा उभा राहिला, अचानक हृदयाची धडधड वाढली...

तिच्या चालण्याची गती मंद होते... ती आर्यव्रत समोर जाऊन काही अंतरावर उभे राहते परंतु त्याच्या नजरेला नजर मिळवत नाही... आर्यव्रत ला ही तिचा अवघडले पण लक्षात येते आणि तो आपली नजर तिच्यावरून बाजूला घेतो...

आर्यव्रत आपल्या गाडीचा दरवाजा उघडून आत ठेवलेला लॅपटॉप उचलून घेतो आणि दरवाजा पुन्हा बंद करतो... तो लॅपटॉप गाडीच्या पुढच्या बाजूला ठेवतो आणि उघडून त्यामध्ये काहीतरी करू लागतो...

" आर्यsss बोल तू एवढ्या रात्री इकडे का आला आहेस? " ती त्याच्या बोलण्यावर तिकडे आली तरीही तो  एका शब्दाने काही बोलला नाही म्हणून मग शेवटी तीच त्याला विचारते...

" हे दाखवण्यासाठी... " आर्यव्रत आपल्या लॅपटॉप मध्ये काहीतरी करत तिला उत्तर देतो... तो आपल्या सोबत बोलण्यासाठी इकडे आला असेल असे तिला वाटलेले असते परंतु तो लॅपटॉप मध्ये इशारा करत तिला उत्तर देतो त्यामुळे ती पण गोंधळून एक नजर त्याच्याकडे पाहत त्याच्या जवळ जाऊन लॅपटॉप मध्ये पाहू लागते...

" श्रेया, हा जो सॉफ्टवेअर आहे ना... तो मी स्वतः बनवलेला आहे... मागच्या काही महिन्यापासून मी हा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी खूप मेहनत केली, हा सॉफ्टवेअर व्यवस्थित चालू झाला तर आपण आपल्या गावच्या विकासासाठी खूप काही करू शकतो... या सॉफ्टवेअर मध्ये असे बरेच फीचर्स आहेत... " असे बोलून तो श्रेयसा ला तो सॉफ्टवेअर दाखवत त्याबद्दल सगळी माहिती ही सांगू लागतो...

श्रेयसा ही अगदी लक्षपूर्वक त्याचा बोलणं ऐकत लॅपटॉप मध्ये पाहत असते.... त्याने त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये केलेली प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित मांडणी, काही महत्वाचे मुद्दे, याबद्दल तू तिला व्यवस्थित सगळं समजावून सांगत असतो आणि ती पण लक्ष देऊन सगळं ऐकत असते....

" माझ्या या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झालेच होते की , मधल्या काही दिवसात अचानक थोडा प्रॉब्लेम झाला आणि सॉफ्टवेअर चालू होत नव्हता... मी खूप प्रयत्न केले आहे परंतु व्यर्थ ! तो सॉफ्टवेअर पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यासाठी माझे सगळे प्रयत्न चालू होते... माझा मित्र आणि सह कर्मचारी संजय याने एका सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट ला म्हणजेच प्रदीप ला आमच्या कंपनीमध्ये बोलावले होते...

त्याने माझ्या या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम पाहिला आणि त्याच्यावर सोल्युशन सांगितले... मागच्या काही दिवसात आम्ही दिवस-रात्र मेहनत करून हा सॉफ्टवेअर परत व्यवस्थित केला म्हणूनच मला घरी फारसे लक्ष देता आलं नाही... त्या काळात मी पूर्ण टेन्शनमध्ये होतो त्यामुळे माझ्या वागण्याने कोणाला काही त्रासही होऊ शकतो याचा मी विचार केला नाही... " आर्यव्रत तिला तो सॉफ्टवेअर दाखवत घडलेली गोष्ट ही सांगत असतो...

" हम्म... " श्रेयसा च्या ही हळूहळू सगळी गोष्ट लक्षात येऊ लागते आणि त्याची त्या काळात होणाऱ्या चिडचिडीचे  कारण ही समजते...

" श्रेयसा मी मुद्दामून असे वागलो नव्हतो, फक्त माझे सॉफ्टवेअरच्या टेन्शनमुळे मला काही सुचत नव्हते आणि म्हणून माझी चिडचिड होत होती... दोन दिवसापूर्वी आम्ही तिघांनी मिळून हा सॉफ्टवेअर पुन्हा व्यवस्थित चालू केला आणि त्याची काही चाचणीही केली...

त्या दोघांनी खरच माझी खूप मदत केली म्हणून आज दुपारी मी त्यांना पार्टी देण्यासाठी त्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो... वृषाली म्हणजेच संजयची गर्लफ्रेंड आम्हाला तुमच्या कंपनीच्या गेटवर भेटली... ती पण आमच्या कंपनीमध्ये काम करते त्यामुळे माझी ही बऱ्यापैकी ओळख आहे... ती पण सगळ्यांसोबत अगदी मन मोकळे पणाने वागत असल्यामुळे ती पण आमच्याबरोबर त्या हॉटेलवर लंच करण्यासाठी यायला तयार झाली...

संजय आणि प्रदीप दोघेही तेव्हा आमच्या सोबतच होते... आम्ही गप्पा मारत टेबल जवळ जात असताना अचानक तिचा पाय अडखळला आणि ती पडणार इतक्यात मी फक्त तुला आधार देऊन सावरले... याव्यतिरिक्त तिकडे असे काहीही घडले नाही परंतु त्याचवेळी नेमके तू आमच्या दोघांना पाहिले आणि स्वतःचा गैरसमज करून घेतला.... मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी तुझ्या मागे हॉटेलच्या बाहेरही आलो होतो , पण तू मला कुठेच दिसली नाही...

तू असा काही विचार केला असेल असे मलाही वाटले नव्हते आणि आम्हाला ऑफिसमध्ये परत लवकर जायचं हे होते... त्यांना पार्टीला घेऊन मी आलो होतो त्यामुळे त्यांना तिकडे असंच सोडून मी येऊ शकत नव्हता म्हणून मग आम्ही सगळ्यांनी तिकडे जेवण केले... इतक्यात आम्हाला ऑफिसमधून फोन आला की ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली आहे त्यामुळे मग आम्ही तिकडून सरळ ऑफिसला जाण्यासाठी निघालो...

आजच्या त्या महत्त्वाच्या मिटींगसाठी आमच्या ऑफिसचे होणारही तिकडे उपस्थित होते... मीटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला माझ्या या सॉफ्टवेअर बद्दल विचारले... ते उद्या माझा सॉफ्टवेअर बघण्यासाठी पुन्हा ऑफिसमध्ये येणार आहे , पण मी जेव्हा सॉफ्टवेअर पूर्ण करत होतो तेव्हाच विचार केला होता की या सॉफ्टवेअरचे काम सक्सेसफुली कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्यात आधी मी तुला या सॉफ्टवेअर बद्दल सांगणार हे सगळं दाखवणारा आणि त्यानंतरच होणार समोर हा सॉफ्टवेअर प्रेझेंट करणार... कारण माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस.... " आर्यव्रत आपली लॅपटॉप मधली नजर बाजूला काढून तिच्याकडे पाहत शेवटचं वाक्य म्हणाला....

श्रेयसा ही त्या वाक्याने एकटक त्याच्याकडे पाहू लागली.... त्याच्या बोलण्यावर तिचा मन विश्वास करू लागले आणि त्याला जेव्हा आपली गरज होती तेव्हा आपण त्याची साथ द्यायची सोडून त्याच्यावर अविश्वास दाखवला याचेही तिच्या मनाला वाईट वाटू लागले... तिच्या डोळ्यांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होऊ लागली...

" हो श्रेया, मला सॉफ्टवेअर प्रेसेंट करायचे आहे तुला दाखवायचा होता आणि त्यासाठीच मी तुला खूप फोन केले... कधी एकदा तू फोन उचलते आणि मी तुला या सॉफ्टवेअर बद्दल सांगतो असे वाटत होते, पण तू माझा फोन उचलला नाही... माझ्यावर रागावली होतीस ना.... " आर्यव्रत तिच्या नजरेमध्ये पाहतच तिला प्रश्न विचारतो...

" सॉरी.. आर्य, मsss मी... " श्रेयसा ला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागते आणि आता त्याच्या समोर काय बोलावे तेच सुचत नाही...

" श्रेया sss मला मान्य आहे की,  घरच्यांच्या आग्रहाखातर आपण एका अनिश्चित बंधनामध्ये जबरदस्ती अडकलो गेला आहे परंतु मी कधीच या बंधनामध्ये तुला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही.... तू तुझी माणसं , तुझं घर सोडून हे अनिश्चित बंधन निभवण्यासाठी त्या घरात आलीस, पण माझ्यामुळे कधी तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये याचीच मी नेहमी काळजी घेत होतो...

आपल्याला जर एकाच घरात एकाच रूम मध्ये राहायचे आहे तर या नात्यापेक्षा आपल्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण करून आपण एकमेकांचे मित्र बनून राहिलो तर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न तरी करू शकतो...  या विचारानेच मी मैत्रीचा हात पुढे केला होता , ज्यामुळे तुलाही तिकडे राहायला सोईस्कर वाटेल आणि या नात्याचा त्रास होणार नाही... तरीही नकळतपणे माझ्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्याचा तुला त्रास झाला... " आर्यव्रत हळव्या स्वरात तिच्याकडे पाहून म्हणाला... श्रेयसा ही त्याच्या कडे अधीर मनाने पाहत होती...

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all