डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४१
" Excuse me sir... " त्या दोघांच्याही कामावर आवाज पडला तसेच डोकं एकमेकांपासून बाजूला झाले... आर्यव्रत दरवाज्याच्या दिशेने पाहू लागला... त्या हॉटेलचा एक स्टाफ दरवाजाच्या जवळ उभा होता...
" सॉरी सर तुम्हाला डिस्टर्ब केलं पण वेळ खूप झाला आहे आणि तुम्ही सांगितलेली जेवणाची ऑर्डर ही तयार आहे... " तो स्टाफ दिलगिरी व्यक्त करत म्हणाला... त्याचं बोलणं ऐकून आर्यव्रत ने एक नजर घड्याकडे पाहिले तर साडेनऊ वाजून गेले होते... त्यालाही आश्चर्य वाटले की इतका वेळ कसा गेला त्यांचं त्यांना समजलं नाही...
" हो sss तुम्ही जेवण घेऊन या... " आर्यव्रत त्याच्याकडे पाहून म्हणाला तसा तो स्टाफ होकारत मान हलवत तिकडून निघून गेला...
" इतका वेळ कसा निघून गेला समजले नाही ना ? " तो स्टाफ निघून गेल्यावर आर्य तिच्याकडे पाहत हसून म्हणाला...
" हो ना... " श्रेयसा ही हसू लागली...
" ये बस... भूक लागली असेल ना ? " त्याने तिचा हात पकडला आणि तुझी खुर्ची आपल्या खुर्चीच्या बाजूला ठेवून तिला ही जवळ बसवले... ती पण बसली...
" त्यादिवशी तू माझ्या आवडीचा नाश्ता बनवला होतास , पण मी तो खाल्ला नाही ना... त्याचीच भरपाई म्हणून मी आज सगळे पदार्थ तुझ्या आवडीचे बनवायला सांगितले आहे... " आर्यव्रत तिचे गालावर आलेले केस मागे सारत म्हणाला...
हॉटेलमध्ये काम करणारे दोन स्टाफ त्यांची ऑर्डर घेऊन आले आणि त्या टेबल वर व्यवस्थित मांडू लागले... त्यांनी त्या दोघांच्या प्लेटमध्येही वाढायला सुरुवात केली... श्रेयसा ला तिकडे सगळे आपल्या आवडीचे पदार्थ पाहून आश्चर्य वाटले...
" हे सगळे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं ? " श्रेयसा ने आश्चर्याने त्याच्याकडे पाहून त्याला विचारलं...
" ज्या प्रकारे तुला माझी आवड समजू शकते त्याच प्रकारे मलाही तुझी आवड समजू शकते ना... " आर्यव्रत
" म्हणजे तुम्ही माझ्या आई ला विचारलं ? " बोलताना तिचे डोळे मोठे झाले.. त्याने स्वतःहून समोरून आपल्या आईला फोन करून आपल्या आवडीनिवडी बद्दल विचारले ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठी होती...
" तू जसा विचार करत आहे तसे काही घडले नाही... खरंतर मी माझ्या आईला फोन करून तुझ्या आईला तुझ्या आवडी बद्दल विचारायला सांगितले... तिच्याकडून मला समजले... पण मेहनत तर मीच केली ना... हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्या आईला मला किती मस्का मारायला लागला तुला काय सांगू... " तो डोक्यावर हात ठेवत नाटकी स्वरात म्हणाला....
" हा sss हा sss... " त्याचे ते नखरे पाहून तिलाही हसायला आले....
" चला... मॅडम, खूप भूक लागली आहे... जेवायला सुरुवात करायची का ? " आर्यव्रत आपल्या दोन्ही शर्टाच्या बाया फोल्ड करत एक घास हातात घेतो आणि तिच्या तोंडासमोर पकडतो... ती त्याच्याकडे पाहून प्रेमाने आ करते तसा तो तिला घास भरवतो...
" आवडले ? " तो तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विचारतो...
" हो sss छान आहे... " ती उत्तर देते... ते दोघे पण जेवण करतात.... थोड्या वेळात एक हॉटेल स्टाफ तिकडे येतो... त्याच्या ट्रॉलीमध्ये दोन बाऊल असतात... तो त्यांच्यासमोर ती ट्रॉली घेऊन येतो...
" तुम्ही हे इथेच ठेवा, आमचं जेवण झाल्यावर आम्ही घेऊ... " आर्यव्रत त्याच्याकडे पाहून त्याला सांगतो... तसा तो ही तसंच ठेवून निघून जातो...
" आर्य... आता हे सगळं अजून काय आहे ? इकडे जे आहे ते खूप झाले आहे... माझे पोट भरले आहे आता अजून काही खाण्याची इच्छा नाही... " श्रेयसा
" आपण फक्त जेवणच खाल्ला आहे अजून स्वीट डिश मिळाली नाही... " आर्यव्रत तिच्याकडे खट्याळ नजरेने पहात म्हणाला...
" आर्य sss " श्रेयसा लाजून आपली नजर फिरवते....
" अगं मी या स्वीट डिश बद्दल बोलत होतो.... हे बघsss" असे बोलून आर्यव्रत त्या दोन बाऊल मधला एक बाऊल आपल्या हातात घेतो आणि त्याच्यावर असलेले झाकण उघडून तिला दाखवतो...
" अरे वाह sss मुगाचा हलवा.... " ती एक नजर त्या बाऊल कडे पाहात आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली...
" हो sss आणि हे पण आहे.... " असे बोलून आर्यव्रत दुसरा बाऊल ही उघडून तिला दाखवतो...
" गुलाब जामुन... " ती आनंदाने पाहते...
" हो sss या दोन्ही स्वीट डिश तुला आवडतात ना? " आर्यव्रत
" हो sss खूप.. " श्रेयसा आनंदाने त्या बाऊलमध्ये असलेले एक गुलाबजामून आपल्या तोंडात घालत त्याला मम्हणाली...
" अरे sss आता थोड्या वेळापूर्वीच कोणीतरी बोलत होतं की , आता पोट भरलं आहे.... अजून काहीही खायची इच्छा नाही... " आर्यव्रत तिची मस्करी करत तिला विचारतो...
" हो पण तेव्हा मला कुठे माहित होतं की, याच्यामध्ये गुलाब जामुन आणि मूग डाळीचा हलवा असेल ते.... पोट भरलेला असले तरी मी हे दोन्ही पदार्थ खाऊ शकते.... उमsss तुम्ही पण खावा ना खरंच खूप यमी आहेत... " श्रेयसा खात त्याला ही म्हणाली...
" नको.... तुझ्या आवडीच्या स्वीट डिश आहेत मला माझ्या आवडीची स्वीट डिश खायची आहे... " आर्यव्रत खट्याळ नजरेने पाहत म्हणाला...
" मग तुमच्या आवडीची ही मागवायची होती ना... " ती आपल्या खाण्याच्या नादात म्हणाली...
" मला जी स्वीट डिश पाहिजे आहे ती या हॉटेलमध्ये मिळणार नाही... " आर्यव्रत
" मग कुठे भेटेल... " श्रेयसा न समजून विचारते...
" माझ्या स्वीट बायकोकडे... " आर्यव्रत... तशी तीही त्याच्याकडे पाहू लागली....
" आता मी माझ्या बायकोसाठी एवढ सगळं केल आहे... तर माझी ही थोडी अपेक्षा आहे की, तिने ही त्याचा मला छानसा मोबदला द्यावा... " आर्यव्रत
श्रेयसा त्याच्याकडे पाहू लागली...
" आत्ता नाही ग.... आत्ता तू तुझी स्वीट डिश खा... घरी गेल्यावर मात्र मला माझी स्वीट डिश पाहिजे... " आर्यव्रत
" घरी sss पण मी तर माझ्या घरी जाणार ना... " श्रेयसा
" हो sss आज तू पण तुझ्या घरीच येणार आहे आणि तेही माझ्यासोबत... " आर्यव्रत
" पण मी याबद्दल काहीही घरी सांगितले नाही... मग मला फोन करून घरी आई-बाबांना सांगावे लागेल ना... " श्रेयसा
" तुला काही बोलायची गरज नाही... माझ्या आईने फोन करून त्यांना घरी सांगितले असेल... आपण इकडून डायरेक्ट आपल्या घरी जाणार आहोत... तुझे सामान घेऊन येण्यासाठी आईने ड्रायव्हरला पाठवले असेल... " आर्यव्रत
" आर्य sss तुम्ही हे सगळं मॅनेज केलं... " श्रेयसा
" हो sss श्रेया.... ज्या दिवसापासून तू माहेरी जाऊन राहू लागली तेव्हापासूनच मला माझ्या आयुष्यातली तुझी उणीव भासू लागली आणि तेव्हा समजले की, आता मलाही तुझी गरज आहे कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे... " आर्यव्रत
" आर्य ss... " श्रेयसा
त्या दोघांचे जेवण पूर्ण होते... हॉटेलचा स्टाफ येऊन सगळं व्यवस्थित घेऊन जातो...
" चला sss निघायचे... " आर्यव्रत... श्रेयसा त्याचा हात पकडून उभी राहते... दोघे पण त्या हॉटेलमधून बाहेर येतात... बाहेर स्टाफ त्याच्या गाडीची चावी घेऊन तिकडेच उभा असतो... आर्यव्रत चावी घेतो आणि गाडीचा लॉक ओपन करतो... तो दुसऱ्या बाजूने येऊन दरवाजा उघडतो आणि श्रेयसा ला बसण्याचा इशारा करतो...
श्रेयसा गाडी मध्ये जाऊन बसते... आर्यव्रत ही दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो आणि गाडी चालू करतो...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा