Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४३

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४३

" आर्य sss... " श्रेयसा जवळ जवळ जोरात ओरडली... तिच्या बाजूला तिचा आर्य डोळे बंद करून पडला होता... त्याच्या डोक्यातून,  हातातून, पायातून सगळीकडून रक्त येत होते...

त्याच्या शरीरावरून ओघळणारे रक्त तिच्या ड्रेसवर सर्वत्र पडले होते... त्याच्या हाता पायाला सगळीकडे जखमा झाल्या होत्या....

" आर्य sss उठा..... आर्य.... " श्रेयसा जोर जोरात त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागते... पण त्याच्याकडून मात्र काहीही प्रतिक्रिया होत नाही.... श्रेयसा हळूहळू गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते.... कसाबसा गाडीचा दरवाजा उघडला जातो....

श्रेयसा हळू हळू पुढे सरकत गाडीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करते.... ती व्यवस्थित बाहेर येते... तिच्या एका हाताला लागलेले असल्यामुळे त्यातून रक्त येत होते आणि  तिच्या शरीरावरही काही छोट्या-मोठ्या जखमा होत्या....

" आर्य sss..... आर्य...  " ती हळूहळू त्यालाही गाडीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.... गाडीतून बाहेर काढल्यावर त्याच्या गालावर टॅप करत त्याला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु तो मात्र निपचिप पडलेला असतो.... त्याला अशा शांत पडलेलं पाहून तिला मात्र रडू येत होते... त्या ठिकाणी,  त्या सुनसान रात्री काय करावे ते ही सुचत नव्हते....

ती स्वतःचा फोन पाहते तर फोन खाली पडून तुटलेला असतो...  ती आर्य च्या खिशात ठेवलेला फोन बाहेर काढते... त्याचा महागातला फोन असल्यामुळे त्याच्या फोनला एका बाजूला चीर गेलेली असताना देखील तो चालू झाला....

" फोन चालू का होत नाही.... याचा पासवर्ड काय असेल ? काय करू मी... " ती बराच वेळ फोनला चालू करण्याचा प्रयत्न करत होती परंतु पासवर्ड तिच्या लक्षात येत नव्हता... काही वेळाने तिला तो दिवस आठवतो त्या दिवशी ते दोघेही बोलत बसले होते आणि तेव्हाच तिला त्याच्या फोनचा पासवर्ड ही त्याने सांगितला होता.... तिने पटकन तो पासवर्ड आठवून फोन ओपन केला.... तिने फोन चालू करून त्यातून पटकन नंबर शोधायला सुरुवात केली...

आदित्य राज यांचा नंबर पाहिल्यावर तिने पटकन त्या नंबर वर क्लिक करून फोन लावला.... बराच वेळ रिंग जात होती... त्यांनी पुढे येऊन आपल्या मोबाईल कडे पाहिले आणि आर्यव्रत चा नंबर पाहून पटकन मोबाईल उचलून कानाला लावला...

" काय मग.... किती वेळ झाला... घरी येण्याचा विचार आहे की नाही... " आदित्य राज एक नजर घड्याळाकडे पाहून मस्करीच्या स्वरात म्हणाले...

" बा sss बा.... " श्रेयसा चा रडका स्वर त्यांच्या कानाला ऐकू आला तसे ते गोंधळून फोन बाजूला करून एकदा त्याच्यावरचा नंबर पाहून पुन्हा एकदा त्यांनी फोन कानाला लावला...

" श्रेयसा बाळा..... तुम्ही sss काय झालं !  तुमचा आवाज असा का येत आहे ? आणि हा फोन आर्य चा आहे ना... तो कुठे आहे ? " आदित्य राज काळजीने विचारू लागले...

" बाबा ssss आ..... आमच्या गाडीचा....  आक्सी....." श्रेयसा ला इतका त्रास होत होता की तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते....

" बाळा हे बघ शांत हो..... आधी तू शांत हो आणि शांतपणे मला सांग काय झाला आहे ते..... " आदित्य राज तिचा आवाज ऐकून खूपच काळजीत पडले... त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून रेवतीही त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली.....

" काय ओ sss कोणाचा फोन आहे ? " रेवतीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना विचारले....

" तू थांब जरा.... " त्यांनी हात दाखवून तिला थांबवले....

" श्रेया sss बाळा बोल काहीतरी..... कुठे आहात तुम्ही आणि आर्य कुठे आहे ? " आदित्य राज तिला बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाले...

" बाबा.... आम्ही घरी येत होतो, प sss पण मध्येच रस्त्यावर आमच्या गाडीचा एक्सीडेंट..... " श्रेयसा एक एक शब्दावर जोर देत सांगू लागली....

" काय sss कुठे ? आता तुम्ही कुठे आहात ? " आदित्य राज यांचेही अवसान गळून पडले....

" अहो sss काय झाला आहे सांगा ना मला.... ते दोघे कुठे आहेत ? " रेवतीही त्यांचा चेहरा पाहून काळजीने विचारू लागली....

" बाबा आम्ही ते... हायवेच्या रोडवर sss तिकडे  ते.... बाबा इकडे कोणी नाही ओ... आर्य sss बाबा.. " श्रेयसा रडत रडत बडबड करत असते...

" थांब.... थांब .... मी लगेच येतो... तू काळजी करू नकोस... " आदित्य राज जागेवरून बाहेर येतच तिच्यासोबत फोनवर बोलत होते.... ते सरळ घराच्या बाहेर गेले.... त्यांना गाडी जवळ जाताना पाहून त्यांचा ड्रायव्हर ही पटकन पुढे आला....

" अहो sss अहो...... मी पण तुमच्या सोबत येणार... " रेवती पण जवळजवळ पळतच त्यांच्या मागे बाहेर आली होती....

" रेवती तुम्ही शांत व्हा... अजून मला स्पष्टपणे समजले नाही आहे तिकडे नक्की काय झाले आहे ते.... तुम्ही घरीच थांबा... " आदित्य राज तिला शांत करत म्हणाले...

" नाहीsss मी घरी थांबणार नाही... जोपर्यंत त्या दोघांना माझ्या डोळ्यांनी मी व्यवस्थित पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती भेटणार नाही... मी तुमच्यासोबत येणार आणि आता मला तुमचे काहीही ऐकायचे नाही... " रेवती पण हट्टी स्वरात म्हणाली... फोनवरची असे अर्धवट बोलणं ऐकून तिलाही काही समजत नव्हते शिवाय सारखी राहून राहून तिला तिच्या मुलाची आठवण येत होती.... श्रेयसा चा घाबरलेला आवाज ऐकून तर तिच्या मनाला धडकी भरली होती... त्यामुळे कधी एकदा त्यांच्याजवळ जाऊन त्या दोघांनाही आपल्या डोळ्यांनी पाहते असे तिला वाटत होते....

" बस लवकर.... " त्यांना पण तिच्यासोबत वाद घालत बसणे योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी तिला गाडीमध्ये बसायला सांगितले... दुसऱ्या बाजूने रेवती लगेच गाडीत बसली...


" गाडी हायवेच्या रस्त्याला घे लवकर.... " त्यांनी ड्रायव्हरला सांगितले... ड्रायव्हरने गाडी चालू केली गाडी स्पीड मध्ये हायवेच्या रस्त्याच्या दिशेने पळू लागली.....

" बाबा ss आर्य..... आर्य.... बा. बा लवकर या.... आर्य बघा ना... काहीच बोलत नाही.... " श्रेयसा चा रडका आवाज त्यांच्या हृदयाची गती 100 पटीने वाढवत होती....

" बाळा तू रडू नकोस... आम्ही बस थोड्या वेळातच तिकडे पोहोचू.... आपला आर्य खूप स्ट्रॉंग आहे ना.... त्याला काहीही होणार नाही.... " आदित्य राज हे स्वतः आतून खूप घाबरले होते परंतु तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते... त्यांचं बोलणं ऐकून मात्र इकडे रेवती ने ही घाबरून आपल्या हृदयावर हात ठेवला....

" ड्रायव्हर गाडी लवकर पळवा..... " आदित्य राज आता त्यांनाही कधी एकदा आपल्या मुलाला समोर पाहतो असे झाले होते.... पुढच्या पंधरा मिनिटातच गाडी गावामधून बाहेर पडली आणि हायवेच्या रस्त्याला लागली.... आदित्य राज आणि ड्रायव्हर दोघेही दोन्ही बाजूला रस्त्यावर आपली नजर फिरवत होते....

" साहेब , तिकडे बघा एक ट्रक  दिसत आहे..... " ड्रायव्हरने समोर काही अंतरावर दिसणाऱ्या ट्रक कडे पाहून त्यांना सांगितले....

" गाडी थांबवा.... गाडी इकडेच थांबवा... " आदित्य राजने घाबरून त्यात ट्रक कडे पाहत सांगितले... ड्रायव्हर ने ही पटकन ब्रेक मारून गाडी थांबवली... ते सगळे गाडीमधून खाली उतरले...

" श्रेया..... कुठे आहात तुम्ही लोक... आम्ही इकडे हायवे वर आलो आहे .... " आदित्य राज इकडे तिकडे पाहतच तिला फोनवर विचारू लागले...

" बा बा..... बाबा..... " आता तिच्या तोंडातूनही येणारा आवाज कमी होऊ लागला....

" श्रेया..... " इतक्यात रेवती एका बाजूला खाली पाहत जोरात ओरडली,  तशी त्या दोघांचीही नजर त्या दिशेला गेली.... आदित्य राज आणि त्यांचा तो ड्रायव्हर दोघेही खाली दिसणार्‍या उलट्या पडलेल्या त्यांच्या गाडीकडे पाहू लागले...

" अहो sss. ते तिकडे.... " असे बोलत रेवती ने तो खडकाळ रस्ता पकडून पुढे चालायला सुरुवातही केली... आदित्यराजही धावत त्या रस्त्यावरून पुढे चालत होते.... श्रेयसा ने त्या दोघांना आपल्याजवळ येताना पाहिले तशी ती धडकन खाली बसली....

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all