डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४४
" श्रेया sss बाळा... तू ठीक आहेस ना ? " रेवती पटकन तिच्या जवळ जाऊन काळजीने तिच्या कपड्यांकडे पाहत म्हणाली... तिचे कपडे पूर्ण रक्ताने भरले होते त्यामुळे तिच्याकडे पाहून सगळ्यांनाच भीती वाटत होती...
" आई sss आर्य... आर्य.... " श्रेयसा एका दिशेला आपल्या बोटांनी इशारा करत म्हणाली.... तशी त्या सगळ्यांची नजर त्या दिशेला गेली...
" आर्य...... " रेवती त्याला असे निपचिप पडलेले पाहून धावतच त्याच्याजवळ गेली...
" आर्य sss आर्य.... बाळा उठ ना.... हे बघ तुझी आई आली आहे.... उठ ना बाळा... फक्त एकदा डोळे खोलून माझ्याकडे बघ.... " रेवती त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली... रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा मुलगा पाहूनच तिला भीती ने रडू येऊ लागले....
" आर्य..... आर्य..... " आदित्य राज ही त्यांच्याजवळ येऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांना असे भावनेच्या भरात वाहून चालणार नव्हते त्यामुळे त्यांना समजदार ने काम घ्यावे लागले...
आदित्य राज यांनी आपला मोबाईल बाहेर काढला आणि काही फोन फिरवले... काही वेळातच तिकडे ॲम्बुलन्स आणि काही हॉस्पिटलची माणसं आली... हॉस्पिटलच्या माणसांनी पटकन आर्यव्रत ला उचलून व्यवस्थित ॲम्बुलन्स मध्ये ठेवले.... श्रेयसा ला ही आधार देऊन ॲम्बुलन्स मध्ये बसवण्यात आले....
आदित्य राज आणि रेवती ही बसले... आदित्य राज यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी घेऊन ॲम्बुलन्स च्या मागे यायला सांगितले... श्रेयसा आत्ता मात्र आर्यव्रत ला अशा अवस्थेत पाहून एकदम शांत झाली होती...
अर्ध्या तासात त्यांचे ॲम्बुलन्स एका मोठ्या हॉस्पिटलच्या गेटवर येऊन पोहचली... हॉस्पिटलमध्ये आधीच फोन करून सांगितल्यामुळे सगळे डॉक्टर त्यांच्या तयारीत होते...
ॲम्बुलन्स हॉस्पिटलच्या गेटमधून मोठ्या दरवाजाची जवळ आहे आणून थांबवली... दरवाजा उघडला गेला... लगेच स्ट्रेचर घेऊन बाहेर असणाऱ्या नर्स आणि वॉर्ड बॉय ने मिळून आर्यव्रत ला ॲम्बुलन्स मधून बाहेर काढले... त्वरित त्याला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले... ऑपरेशन थेटरच्या जवळच एक डॉक्टरांची टीम उभी होती... त्याला पाहून सगळे डॉक्टर ऑपरेशन थेटर च्या आत गेले...
दोन नर्स श्रेयसा घेऊन दुसऱ्या रूम मध्ये गेल्या... तिकडेही दोन डॉक्टर तिला पाहण्यासाठी बसले होते.... ऑपरेशन थिएटर आणि श्रेयसा ला घेऊन गेलेले रूम या दोघांचा दरवाजा बंद झाला....
आदित्य राज आणि रेवती दोघेपण तिकडे बाहेरच बसून होते... आदित्य राज यांनी श्रीकांतला फोन करून कळवले तसे ते लोक पण हॉस्पिटलसाठी यायला निघाले....
" अहो sss आजचा दिवस किती चांगला होता... आनंदाने भरलेल्या चेहऱ्याने माझा बाळ घरातून बाहेर निघाला होता... त्याच्या कामांमध्येही त्याला यश मिळत होते आणि त्याच्या संसारातही तो पुढे जात होता... कोणाची नजर लागली माझ्या बाळाला आणि त्याच्या संसाराला की, हे सगळं असे होऊन बसले.... माझा आर्य ठीक आहे ना? " रेवती रडतच आदित्य राज यांच्याकडे पाहून त्यांना विचारते...
" आपल्या देवावर विश्वास ठेवा... सगळं काही ठीक होईल.... त्या दोघांसाठी आपल्याला खंबीर राहायला पाहिजे... असे हिम्मत हारून चालणार नाही... " आदित्य राज समजावण्याच्या स्वरात म्हणाले...
ते दोघे पण शांत पने ऑपरेशन थेटर आणि त्याच्या बाजूला असलेल्या रूम कडे पहात तिकडेच बसले होते.... त्यांचा ड्रायव्हर ही तिकडे येऊन बसला होता... काही वेळातच त्यांना समोरून श्रीकांत आणि सुरभी येताना दिसले तसे दोघे पण उठून उभे राहिले.... श्रीकांत आणि सुरभी त्या दोघांना बघून त्यांच्या दिशेने अगदी धावतच आले....
" आदित्य राज... हे सगळं काय झालं ? त्यांच्या गाडीच एक्सीडेंट कसे झाले ? ते दोघेपण आता कुठे आहेत ? " श्रीकांत ने त्यांच्याजवळ येऊन एकावर एक प्रश्न विचारायला सुरुवात केली...
" त्यांच्या गाडीच एक्सीडेंट कसा झाला याबद्दल अजून मला काहीही कल्पना नाही.... त्याची इन्क्वायरी करण्यासाठी मी काही माणसे पाठवली आहे.... " आदित्य राज त्यांच्याकडे पाहून त्यांना शांत स्वरात सांगत होते....
" आर्य आणि श्रेयसा..... ते दोघे कुठे आहेत ? कसे आहेत ? " सुरभी पण त्यांच्याजवळ येऊन एक नजर रेवती कडे पाहून विचारते....
" आर्य शुद्धीवर नव्हता... त्याला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन गेले आहेत.... त्याला भरपूर लागले आहे... " आदित्य राज श्रीकांत कडे पाहून त्यांना सांगत होते....
" श्रेया ला डॉक्टर त्या बाजूच्या रूममध्ये घेऊन जाऊन तिचे चेकअप करत आहे... आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा ती शुद्धीवर होती.... पण लागले का तिला पण ! " रेवती रडक्या स्वरात सुरभी कडे पाहून त्यांनाही सांगू लागली.....
" आज संध्याकाळी घरातून बाहेर जाताना माझी मुलगी किती खुश होती.... त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आता कुठे आपल्या मनातलं गिल्ट कमी होऊ लागले होते की, आपण त्या दोघांचेही लग्न जबरदस्ती लावून दिले आहे... ते दोघेही या नात्याचा स्वीकार करतील की नाही अशी शंका म्हणत होती परंतु आता त्यांना आनंदात बघून बरही वाटत होते... पण मध्येच हे सगळं.... " सुरभी रडतच सगळ्यांकडे पाहून आपल्या मनातली वेदना सांगू लागली......
" सुरभी , शांत व्हा ! मनामध्ये काहीही वाईट विचार आणू नका... " श्रीकांत त्यांना शांत करत म्हणाले... ते चौघे पण बाहेर बसून होते....
श्रेयसा ला ज्या रूममध्ये घेऊन जाण्यात आले त्या रूमचा दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर आले... डॉक्टरांना बाहेर आलेले पाहून ते चौघे पण त्यांच्याजवळ आले....
" काय झालं डॉक्टर ? श्रेयसा कशी आहे ? आम्ही तिला बघू शकतो का ? " आदित्य राज यांनी पुढे येऊन डॉक्टरांना विचारले.....
" ठीक आहेत पण सध्या त्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आहे त्यामुळे त्यांना शुद्धीवर यायला जवळजवळ एक तास लागेल... त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता... " एका डॉक्टरांनी त्यांच्याकडे पाहून त्यांना निश्चिंत करत सांगितले....
" त्यांच्या शरीरावर काही छोट्या जखमा झालेल्या आहेत.... त्यावर आम्ही मलम पट्टी केली आहे परंतु त्या आपल्या होशमध्ये नाहीत... सतत त्यांच्या तोंडात आर्य हे नाव आहे त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आम्हाला बरोबर वाटत नाही... त्यांना शुद्ध आल्यावर तुम्ही एकदा जाऊन त्यांना भेटा... " दुसऱ्या डॉक्टरांनी एक तास चौघांकडे पाहून त्यांना समजावले....
ते चौघेपण त्या रूमच्या दरवाजामध्ये उभे राहून आत असलेल्या श्रेयसा कडे पाहत होते... त्या रूममध्ये असलेल्या बेडवर श्रेयसा शांत झोपली होती... तिच्या एका हाताला सलाईन लावण्यात आली होती... शरीरावर ठिकठिकाणी पट्टी बांधण्यात आली होती....
घरातून बाहेर जाताना तिचा तो हसता चेहरा आठवून आणि आत्ताच आपली मुलगी आपल्यासमोर ज्या अवस्थेत झोपलेली आहे ते पाहून श्रीकांत आणि सुरभी ला खूपच वाईट वाटू लागले...... सुरभीच्या डोळ्यातून सतत अश्रूच्या धारा वाहत होत्या.....
" सुरभी , सावरा स्वतःला.... ती ठीक आहे... तासाभरात तिला शूटिंग येईल तेव्हा तुम्ही तिच्या जवळ जाऊन तिच्या सोबत बोलू शकता.... " श्रीकांत एका हाताने त्यांना आपल्या जवळ घेत समजावण्याच्या स्वरात म्हणाले....
" तुम्ही दोघी पण तिच्या जवळ जाऊन बसा... तिला शुद्ध आली की आम्हाला सांगा.... " आदित्य राज रेवती आणि सुरभी दोघींकडे पाहून म्हणाले.... त्या दोघी पण त्या रूममध्ये असलेल्या खुर्चीवर जाऊन बसल्या... सुरभी आपली खुर्ची तिच्या जवळ घेऊन प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्याजवळ बसली... रेवती पण त्यांच्यापासून काही अंतर लांब पण त्या दोघी मायलेकी कडे पाहत बसल्या होत्या...
" चला आपण बाहेर उभे राहू.... आपला आर्य ही ठीक असणार... काही वेळातच डॉक्टर दरवाजा उघडून बाहेर येतील आणि आपल्याला तसे सांगतील... " श्रीकांत आदित्य राज यांना धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाले... ते दोघेपण ऑपरेशन थेटरच्या दरवाजाचे आहे एकदम समोर असलेल्या खुर्चींवर जाऊन बसले.....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा