Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४९

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप येईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४९

" आर्य ला पहाटेच ऑपरेशन थेटर मध्ये घेतले आहे... " आदित्य राज तिच्याकडे पाहून तिला सांगतात...

" काय , मग तुम्ही मला उठवले का नाही... " रेवती

" रेवती तू  झोपली होतीस... कालपासून तुझी होणारी दगदग पाहून सध्या तुलाही आरामाची गरज होती म्हणून उठवले नाही... " आदित्य राज ... ते तिघेपण ऑपरेशन थेटरच्या बाहेरच असतात...

आठच्या दरम्यान श्रेयसा ला ही जाग येते... सुरभी ही नुकतीच उठून तिच्याकडे पाहत असते....

" बाळा , ठीक आहेस ना ? " सुरभी तिचा तो काळजीने भरलेला चेहरा पाहून तिला विचारते....

" हम्म... " श्रेयसा फक्त हुंकार देते... तिची कोणासोबतही बोलण्याची इच्छा नव्हती....

" फ्रेश होणार आहेस का , मी तुला बाथरूम मध्ये घेऊन जाऊ ? " सुरभी तिला आधार देत बा तुमच्या दरवाजे पर्यंत घेऊन जाते आणि दरवाजा बंद करून तिकडे बाहेरच उभी राहते...

" दरवाजा लॉक करू नको... मी इकडेच उभी आहे... काही वाटलं तर आवाज दे... " सुरभी

ती फ्रेश होऊन बाहेर येते.... सुरभीतीला व्यवस्थित पकडून बेडवर बसवते... हॉस्पिटल मधली एक नर्स येऊन तिच्यासाठी नाश्ता देऊन जाते....

" थोड खातेस का म्हणजे बरं वाटेल आणि या सकाळच्या मेडिसिनही घ्यायचे आहेत.... " सुरभी

श्रेयसा काही न बोलता तिकडे ठेवलेला थोडा नाष्टा करते आणि मेडिसिन घेते...

" श्रेया sss बाळा... प्लीज! तू अशी शांत राहू नकोस ग... आमच्या मनाचाही विचार कर... मला माहित आहे तुला आर्य ची काळजी वाटत आहे पण जरा त्याच्या आईवडिलांचा विचार कर... ते बिचारे तुझ्यासाठी खंबीर रूपे आहेत... मग तू असे वागून चालेल का ? आर्य साठी तुलाही खंबीर राहायला पाहिजे आणि त्याच्या आई वडिलांना सावरायला पाहिजे.... तुझ्या जागी आज जर आर्य इकडे असता तर तो असाच खचला असता का ? त्याने सगळ्यांना सावरले नसते का ? " सुरभी हळव्या स्वरात तिच्याकडे पाहून म्हणाली...

आर्यव्रत चे आपल्या आई वडिलांवर किती प्रेम आहे हे तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तो स्वतः खंबीर उभा राहिला असता आणि त्यांनी आपल्या आई-वडिलांना सावरले असते.... ज्या प्रकारे तो त्या घरचा मुलगा आहे तसेच आपणही आता त्या घरची सून आणि लेक आहोत त्यामुळे आपल्यालाही खंबीरपणा दाखवून त्या सगळ्यांना सावरायला पाहिजे.... तिचे मन ही विचार करू लागते....

" आई मला बाहेर जायचे आहे... सगळ्यांना भेटायचे आहे... " श्रेयसा आपला चेहरा व्यवस्थित करत म्हणाली...

" हो sss चल... " तिचा शांत चेहरा पाहून सुरभीलाही बरे वाटते ती पटकन आपल्या जागेवरून उठून तिला आधार देते त्या दोघी पण त्यांच्या रूममधून बाहेर येतात.... बाहेर आयसीयूच्या जवळ त्यांना कोणीही दिसत नाही त्यामुळे ते गोंधळून इकडे तिकडे पाहू लागतात...

श्रीकांत ची नजर त्या दोघींवर जाते तसे ते त्या दोघींना बाहेर आलेले पाहून लगेच पुढे येतात....

" श्रेया... " त्यांच्या आवाजाने त्या दोघी पण वळून त्या दिशेला पाहू लागतात....

" बाबा तुम्ही इकडे काय करत आहात आणि आर्य कुठे आहे ? " श्रेयसा त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते....

" आर्य चे ऑपरेशन चालू आहे... आम्ही सगळे तिकडेच उभा होतो.... " श्रीकांत

" कधी? आर्य आता ऑपरेशन थेटर मध्ये आहे मग तुम्ही आम्हाला सांगितले का नाही... " श्रेयसा त्यांचा हात पकडून पुढे जात विचारते....

" बाळा... पहाटे चार वाजताच डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन साठी आत नेले... मग एवढ्या पहाटे तुम्हाला कसे उठवणार होतो.... तुम्ही दोघी पण शांत झोपल्या होत्या... बाहेर रेवती ताई पण झोपल्या होत्या... आम्ही दोघेच तेव्हा जागे होतो.... " श्रीकांत

श्रेयसा ला समोरून  चालत येताना पाहून आदित्य राज आणि रेवती दोघेपण काळजी ने तिच्या जवळ आले...

" आई बाबा तुम्ही दोघे पण ठीक आहात ना ? " श्रेयसा ने त्या दोघांना जवळ आलेले पाहून प्रेमाने विचारले... तिच्या शब्दांमध्ये असलेला ओलावा पाहून त्या दोघांनाही शांत वाटले...

" हो बाळा आम्ही दोघेही ठीक आहोत... तू ठीक आहेस ना? " त्या दोघांनी प्रेमाने तिला विचारले...

" हो sss मी ठीक आहे आणि मला विश्वास आहे की ,माझा आर्य ही व्यवस्थित असणार... त्याला काहीही होणार नाही... थोड्यावेळाने जेव्हा त्याचे ऑपरेशन पूर्ण होईल आणि डॉक्टर त्याला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतील ना तेव्हा तो आपल्याकडे पाहून, आपले असे काळजीने भरलेले चेहरे पाहून आपली मस्करी करणार आहे... तुम्हाला तर माहित आहे ना त्याला असे चिडवा चिडवी करण्याची किती सवय आहे ती.... " श्रेयसा

" हो बाळा.... " त्या सगळ्यांना तिचा आवाज ऐकून बरे वाटते....

" बाबा त्यांना काय वाटते की ते आपल्याला असा त्रास देतील आणि आपण रडत बसू अजिबात नाही.... आपणही त्यांना दाखवायचे की, आपण किती खंबीर आहे ते अशा छोट्या-मोठ्या कारणाने गळून पडणार नाही....

तुम्हाला माहित आहे ना मध्ये आर्य च्या ऑफिसमध्ये त्यांच्या सॉफ्टवेअरचा किती प्रॉब्लेम झाला होता तरीही ते खचून गेले नाही उलट हिमतीने लढत राहिले आणि अखेर त्यांनी त्यांचा तो सॉफ्टवेअर पुन्हा एकदा व्यवस्थित चालू करून दाखवला...

ते असे खचून न जाता जर एवढी हिंमत दाखवू शकतात तर मग आपणही खचून जायचे नाही हिमतीने उभे राहायचे.... उद्या जर त्यांनी आपल्याला अशा अवस्थेत पाहिले तर त्यांना ते आवडेल का ? " श्रेयसा त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना हिम्मत देण्याचा प्रयत्न करत म्हणाली....

" अगदी बरोबर बोलत आहेस बाळा... आपली अशी अवस्था त्याला अजिबात आवडणार नाही... आपणही आत्ता त्याच्यासारखी हिम्मत दाखवायची... आमची लेक आमच्या सोबत असताना आम्ही पण खचणार नाही... " आदित्य राज तिच्याकडे पाहून आत्मविश्वासाने म्हणाले...

तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून त्या सगळ्यांना खूपच बरं वाटत होते...  नकळतपणे एक आधार मिळाल्यासारखा वाटत होता त्यामुळे आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला होता,  तरीही मनात कुठेतरी भीती घर करून होती....

" आई , ते बघ तिकडे गणपती बाप्पाचे छोटे मंदिर आहे.... मला तिकडे घेऊन चल ना... " श्रेयसा एका दिशेला पाहत म्हणाली ... सुरभी आणि रेवती दोघी पण तिला घेऊन त्या मंदिराजवळ गेले... मंदिराच्या भोवती असलेल्या आवारात त्या तिघी पण बसल्या...

श्रेयसा ने आपले डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करायला सुरुवात केली.... तिची भक्ती पाहून सुरभी आणि रेवती दोघेपण हात जोडून देवाकडे मागणं मागू लागल्या....

" पेशंटला असे बाहेर बसून चालणार नाही , त्यांना आत त्यांच्या रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगा... " एक नर्स श्रेयसा ला तिकडे पाहून श्रीकांत जवळ येऊन म्हणाली....

" खूप मुश्किलीने तिच्या चेहऱ्यावर हा आत्मविश्वास परत आला आहे... मला मान्य आहे तुम्ही तिच्या काळजीने सांगत आहात पण सध्या तिचा नवरा आत मध्ये ऑपरेशन थेटर मध्ये आहे आणि त्याचे ऑपरेशन चालू आहे... अशावेळी तिच्या या भक्तीच्या मध्ये असा खंड पडावा असे आम्हालाही वाटणार नाही... आम्ही तिची काळजी घेऊ पण तिला तिची श्रद्धा पूर्ण करू द्या.... " श्रीकांत त्या नर्स कडे पाहून विनवणीच्या स्वरात म्हणाले... तशी नर्सही त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिकडून निघून गेली...

श्रीकांत आणि आदित्य राज तिकडेच असलेल्या एका खुर्चीवर बसून एक वेळ त्या ऑपरेशन थेटर च्या दिव्याकडे आणि मंदिराच्या जवळ बसलेल्या आपल्या महिला मंडळांकडे पाहत होते....

सकाळचे दहा वाजता आले होते.... आर्यव्रत ला आत्ता ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाऊन सुमारे सहा तासाच्या वर अवधी उलटला होता.... वेळेचा विचार करत असतानाच अचानक ऑपरेशन थेटरचा वरचा दिवा बंद झाला आणि दरवाजा उघडला गेला.... ऑपरेशन थेटर मधून एक डॉक्टर बाहेर आला... त्याच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य पाहून श्रीकांत आणि आदित्य राज घाबरून जागेवर उभे राहिले...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all