Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ५०

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ५०

डॉक्टर त्या दोघांच्या जवळ येऊन उभे राहतात...

" डॉक्टर sss काय झालं? माझा आर्य कसा आहे? " आदित्य राज अधीर मनाने डॉक्टरांकडे पाहून त्यांना विचारतात... त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर बसलेल्या श्रेयसा, रेवती आणि सुरभी त्या तिघी पण डोळे उघडून डॉक्टरांकडे पाहू लागतात.... डॉक्टरांना पाहून त्या तिघी पण घाई गडबडीत उठून त्यांच्याजवळ येतात...

" ऑपरेशन सक्सेसफुल झाला आहे पण.... " डॉक्टर बोलून मध्येच मोठा पॉज घेतात...

" पण काय... बोला डॉक्टर... " आदित्य राज आणि श्रीकांत दोघेपण डॉक्टरांकडे पाहून त्यांना विचारतात...

" ऑपरेशन सक्सेसफुल झाला आहे पण त्यांचा आधीच खूप ब्लड लॉस झाला होता आणि आम्ही जे ब्लड मागवले होते तेही ऑपरेशन मध्ये युज झाले त्यामुळे त्यांच्या डोक्यावरच संकट अजून टळलेल नाही.... पुढचे 24 तास त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे असतील... या 24 तासाच्या आत जर त्यांना शुद्ध आली तर सगळं व्यवस्थित असेल नाहीतर... पुढे काही सांगता येणार नाही... " डॉक्टर का सगळ्यांसाठी पाहून त्यांना सांगत होते...

" नाही डॉक्टर , तुम्ही असे कसे बोलू शकता ? तुम्ही तर बोलला होता ना की , ऑपरेशन केल्यावर माझा मुलगा बरा होईल... " रेवती रडक्या स्वरात डॉक्टरांकडे पाहून त्यांना विचारते....

" बरोबर आहे तुमचं आणि आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करून पाहिले आहेत... आता शेवटी त्यांची बॉडी ते ऑपरेशनला कशी रिस्पॉन्स करते यावरही अवलंबून आहे ना.... " डॉक्टर सगळ्यांकडे पाहून समजावण्याच्या स्वरात म्हणाले...

" आम्ही त्याला बघू शकतो का ? " श्रीकांत शांतपणे विचारतात...

" हो sss आता थोड्या वेळातच त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येईल... त्यानंतर एक एक करून तुम्ही त्याला पाहू शकता... पण लक्षात ठेवा आय सी यु मध्ये एकावेळी एकच जण आत जाऊन पाहू शकते... हे पेशंट साठी चांगल आहे... " डॉक्टर त्यांच्यासोबत बोलून तिकडून निघून जातात...

" तुम्ही कोणीही काही काळजी करू नका... आर्य एकदम ठीक आहेत... फक्त थोडा वेळ आराम करत आहे.... थोड्यावेळाने शेतीवर येतील आणि आपल्या सोबत पहिल्यासारखे बोलतील... " श्रेयसा त्या सगळ्यांकडे पाहून शांत चेहऱ्याने म्हणाली....

" हो... बाळा... आम्हाला माहित आहे.... आपला आर्य एकदम व्यवस्थित आहे पण आता तुलाही रूम मध्ये जाऊन आराम करायला पाहिजे ना... " सुरभी  काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली...

" बाबा मला एकदा आर्य ला बघायचे आहे... " श्रेयसा

" हो बाळा... आत्ताच डॉक्टर बोलून गेले ना की, थोड्या वेळात त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केले जाईल आणि मग आपण त्याला पाहू शकतो... त्याला शिफ्ट केल्यावर आम्ही तुला सांगतो मग तू सांग त्याला बघून ये.... पण त्या आधी चल तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर... " श्रीकांत तिला समजावत तिच्या रूममध्ये घेऊन जातात...  रूम मध्ये गेल्यावर तिला नाश्ता देऊन तिचे मेडिसिन देतात... मेडिसिन खाऊन ती आर्य च्या विचारत झोपून जाते...

आर्यव्रत ला काही वेळातच आयसीयू मध्ये शिफ्ट केले जाते... अजूनही तो शुद्धीवर आलेला नसतो... सगळेजण एक एक करून आत जाऊन त्याला बघून बाहेर येतात... अजूनही कोणाच्या चेहऱ्यावरची काळजी कमी झाली नव्हती कारण पुढचे 24 तास हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे होते....

" तुम्ही श्रेयसा ला घरी घेऊन जाण्याची प्रोसिजर पूर्ण करू शकता.... तिची तब्येत आता बरी आहे... थोडा आराम केला आणि वेळेवर मेडिसिन घेतल्या की , ती पूर्ण ठीक होईल.... " डॉक्टर त्यांच्याकडे येऊन त्यांना सांगतात...

" हो sss मी डिस्चार्ज चे बघतो... " श्रीकांत त्या डॉक्टर कडे पाहून त्यांना सांगतात...

आदित्य राज आणि रेवती दोघेपण बाहेर असलेल्या खुर्चीवर बसलेले असतात... सुरभी श्रेयसा च्या जवळ बसलेली असते आणि श्रीकांत तिच्या डिस्चार्ज ची प्रोसिजर खाली काउंटर वर जाऊन पूर्ण करत असतात....

" श्रेयसा.... " श्रीकांत तिच्या रूम मध्ये येऊन तिच्याकडे पाहतात....

" अजून झोपली आहे... " सुरभी हळू आवाजात उत्तर देते....

" मी तिच्या डिस्चार्ज ची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे आपण आता तिला घरी घेऊन जाऊ शकतो... " श्रीकांत तिच्या जवळ बसत सांगतात...

" मी काय म्हणते, आपण तिला काही दिवसासाठी आपल्या घरी घेऊन जाऊया का ? तुम्ही याबद्दल त्यांच्यासोबत बोलून घेता का ? " सुरभी काळजीने त्यांच्याकडे पाहून हळू आवाजात त्यांना विचारते...

" हो sss माझाही तोच विचार चालू आहे... तसे पण ते दोघेही आर्य च्या काळजीमध्ये असणार... आपण श्रेयसा ला काही दिवसांसाठी आपल्या घरी घेऊन जाऊया...  आम्ही बोलतो आदित्य राज सोबत... " श्रीकांत

सुरभी त्या रूम मध्ये असलेले त्यांचे सामान सगळे एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवते... श्रेयसा चे मेडिसिन ही व्यवस्थित बॅगमध्ये भरते...

श्रीकांत बाहेर आदित्य राज सोबत बोलत त्यांना श्रेयसा ला घरी घेऊन जाण्याबाबत विचारतात... आदित्य राज ही होकार देतात... कारण आता ते दोघेही आपल्या मुलांसाठी ते हॉस्पिटलमध्येच असणार होते, अशावेळी तिची काळजी घेणे ही गरजेचे होते आणि तिच्या आई-वडिलांशिवाय तिची काळजी व्यवस्थित अजून कोण घेणार म्हणून ते पण नाईलाजाने होकार देतात...

श्रेयसा ला जाग येते आणि ती भरलेली बॅग पाहून आपल्या आईकडे पाहू लागते....

" डॉक्टरांनी तुला डिस्चार्ज दिला आहे... तू आत्ता आपल्या घरी येऊ शकते.... घरी जाऊन आराम करायचा आहे... " सुरभी तिला सांगते...

" आर्य sss.. " श्रेयसा

" त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे , पण अजूनही ते शुद्धीवर आले नाहीत... " सुरभी नाराजीच्या स्वरात सांगते...

" मी एकदा त्यांना जाऊन भेटू शकते का ? " श्रेयसा भरलेल्या नजरेने आपल्या आईकडे पाहून विचारते...

" हो sss... " सुरभी पण होकार देते... त्या श्रेयसा ला घेऊन आयसीयू जवळ येतात...

" जा.... आत जाऊन त्याला बघून ये... " सुरभी तिच्याकडे पाहून तिला म्हणाली... श्रेयसा हळूहळू पावल टाकत आय सी यु चा रूम मध्ये आली...

आर्यव्रत तिकडे बेडवर डोळे बंद करून पडला होता... अजूनही त्याच्या छातीवर अनेक ठिकाणी वायरी लावल्या होत्या आणि आजूबाजूला मशीनचा आवाज येत होता... श्रेयसा पुढे येऊन त्याच्या बेडच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसते... त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागते....

" आर्य sss तुम्ही मला सांगितले होते की तुम्हाला या नात्यांमध्ये आता पुढे जायचे आहे... मी पण हे मान्य केले होते... आर्य, जरी आपलं लग्न हे एक अनिश्चित बंधन असले तरीही आता हे बंधन मला पाहिजे आहे आयुष्यभरासाठी !

आर्य मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत... याआधीही मी तुम्हाला हे सांगितले असेल पण आता मी मनापासून याचा अनुभव घेत आहे.... तुम्हाला असे निपचिप पडलेले पाहून असे वाटत आहे जणू माझ्या शरीरातही काही जीव राहिला नाही पण मला माहित आहे माझा आर्य मला असा अर्ध्या रस्त्यात सोडून जाणार नाही... त्याचे माझ्यावर एवढे प्रेम आहे की तो शेवटपर्यंत माझी साथ देईल.....

आर्य sss ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे आणि ही परीक्षा तुम्हाला पास करायची आहे... आर्य तुम्ही आता खूप आराम केला पण आता बास... आता उठा... चला... आपले ठरले होते ना तुम्ही मला तुमच्या सोबत आपल्या घरी घेऊन जाणार होता ना मग आता मी एकटी माझ्या घरी कशी जाऊ शकते...

आर्य sss मी तुम्हाला असे नाही पाहू शकत प्लीज ! उठा, माझ्यासोबत बोला... मला तुमची ही शांती अजिबात सहन होत नाही... बघाना डोळ्यातून अश्रू येत आहेत... मला झालेला त्रास तुम्हाला आवडणार आहे का आर्य ? सांगा ना...

आर्य sss माझी तुमच्यावर खूप प्रेम आहे .... " श्रेयसा रडक्या स्वरात त्याच्या कडे पाहून म्हणाली... डोळ्यात अश्रू आल्यामुळे तिचे डोळे बंद झाले... दुसऱ्या हाताने तिने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत असताना अचानक तिला काहीतरी जाणवले , तशी तिची नजर बाजूला गेली आणि तिचे डोळे मोठे झाले...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all